
गर्जा महाराष्ट्र माझा ...
▶️ सम्राट अशोकाच्या वसई (सोपारा) जवळ सापडलेल्या शिलालेखात महाराष्ट्राचा उल्लेख आढळतो. तिथून बौद्ध धर्म श्रीलंकेत गेला.
▶️ महाराष्ट्री नावाची पहिली ओळख मिळवून देणारा पहिला शककर्ता राजा गौतमीपुत्र सातकर्णी.
सातवाहनांच्या काळात अजिंठा वेरुळची लेणी खोदली गेली.
▶️ श्री देवी आद्यशक्ती जगदंबिका महाराष्ट्र धर्म रक्षिका तुम्हा सुप्रसन्न असो !
▪️महिकावतीची बखर (इ.स. १४४८, मुंबई)
▶️ महाराष्ट्र धर्मासाठी मराठे सरदारांना एकीची हाक देणारा आणि मराठीला राजभाषेचा दर्जा देणारा अहमदनगरच्या निजामाचा प्रधान मलिक अंबर.
▶️ अठरा पगड मावळ्यांना एकत्र करुन मराठी राज्य स्थापून महाराष्ट्र धर्म वाढवणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज.
▶️ १ मे १९६० रोजी साथी एसेम जोशी, आचार्य अत्रे, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, शाहीर अमरशेख, प्रबोधनकार ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला.
यशवंतराव चव्हाणांनी अमृत कलश आणला.
महाराष्ट्राचे ते पहिले मुख्यमंत्री झाले.
#महाराष्ट्रदिन #कामगारदिन #1मे #महाराष्ट्र

MR

















