Sabitlenmiş Tweet
Adarsh Kasar
16.7K posts

Adarsh Kasar
@KasarAdarsh
Jai Maharashtra | Cricket 🏏 | Politics
Katılım Nisan 2019
97 Takip Edilen506 Takipçiler
Adarsh Kasar retweetledi

हिंदीची लिपी देवनागरी; मराठी सारखीच.
तरी परप्रांतीयांना मराठी शिकायला का नको?
परकीय देशाची भाषा आहे का काय ती?
मी भारतीय@Core_punekar
हिंदी भाषा का नको? परकीय देशाची भाषा आहे का काय ती
MR
Adarsh Kasar retweetledi
Adarsh Kasar retweetledi
Adarsh Kasar retweetledi

अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून, शब्दशः गरगरल्यासारखं झालं. अवघ्या काही दिवसांपूर्वी १९ मार्च २०२६ ला आमच्या पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यातून, महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आहे आणि या महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसं या देशाला दिली आहेत याचं सादरीकरण केलं होतं. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत गाडगेबाबांपर्यंतचा ते अगदी आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांनी मराठी मनाची कशी मशागत केली हे दाखवलं होतं. आणि त्याच महाराष्ट्रात जेंव्हा अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेंव्हा खरंच, 'कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र' हा प्रश्न पडतो.
ज्या महाराष्ट्रात राज्यकर्ते संताचा आशीर्वाद घ्यायचे, जिथे लोकमान्य टिळकांसारखे नेते भगवद्गीतेचा अर्थ लावणारा 'गीतारहस्य' सारखा ग्रंथ लिहायचे, ज्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेते आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यात संवाद असायचा, त्या महाराष्ट्रातले नेते तर्काला तिलांजली देऊन कुठलं तरी अजब 'तीर्थ' प्राशन करण्यासाठी अशोक खरातसारख्याच्या भजनी लागतात हे भीषण आहे.
महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि एकूणच विवेकाचा आवाज उठवला जायचा आणि त्यामुळेच डिसेंबर २०१३ ला महाराष्ट्र विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित झालं होतं. त्यावेळेस ज्या आमदारांनी हे विधेयक पारित केलं असेल त्यातले अनेक जण आजदेखील आमदार असतील आणि त्यातले अनेक जणं या प्रकरणात अडकले असतील. हा किती दुर्दैवी विरोधाभास आहे आणि महाराष्ट्राचं किती अधःपतन झालं आहे याचं हे द्योतक आहे.
हा खरात स्त्रियांचं शोषण करतोय, ते झालं तरी चालेल, पण त्याच्या बदल्यात कुठल्यातरी शक्तीने तो आपलं भलं करेल असा अजब विश्वास आणि यासाठी लागणारा कोडगेपणा हे दोन्ही या राज्यात कुठून आला आहे हेच कळत नाही.
आधी आमदार खासदारकीची तिकिटं मिळवण्याची धडपड. मग जिंकून येण्यासाठी वाट्टेल ते, मग मंत्रिपद. ते नाही मिळालं तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात भरण्यासाठी आणि शक्यतो निष्ठा विकण्यासाठीची धडपड. मग त्यातून मंत्रिपद मिळालं की झालं, मग पुन्हा ते टिकाव म्हणून धडपड. आणि सत्ताधारी रोज नवीन कोणाला तरी आत घेतच असतात तो जर आला तर माझं काय याची घोर चिंता. यातच महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय भावविश्व अडकलं आहे.
आणि या असल्या पोकळ चिंतांमध्ये हे इतके गुंतले आहेत की खरात काय किंवा अजून कोणी आलं आणि त्याने चमत्काराची खात्री दिली की त्याच्या भजनी लागायला हे मोकळे. त्यात हल्ली महाराष्ट्रात काही अधिकारी हे मंत्र्यांचे सगळ्या प्रकारचे सल्लागार आणि नियोजनकार झाले आहेत. त्या अधिकाऱ्यांना पण कसंही करून सत्तेला चिकटून रहायचं आहे.
या सगळ्याचा महाराष्ट्राच्या समाजमनावर काय परिणाम होतोय याचा विचार आतातरी होणार आहे का ? माध्यमं सध्या खरात प्रकरणाचा रोज पाठपुरावा करत आहेत हे चांगलं आहे पण म्हणून त्यांनी जनतेला पुन्हा एकदा आपण कोण होतो याचं दर्शन घडवायला हवं असं मला मनापासून वाटतं. गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून मी हा महाराष्ट्र कोणी घडवला आहे याचं दर्शन मुद्दामून करवलं होतं, ती माझी समज काय आहे हे दाखवण्यासाठी नाही. तर आत्ताच्या तरुण पिढीला हे कळावं म्हणून. माझ्यापरीने हे काम मी करत राहणार आहेच.
पण महाराष्ट्रातील जनतेने विचार करावा. हे असले लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देणार आहात. महाराष्ट्रातील गावागावांत आजही कीर्तनं होतात, ज्ञानेश्वरीचं पठण होतं, आजही या राज्यात तर्काचा आवाज मोठा आहे. पण जर तुम्ही या असल्या नाठाळांना आपले नेते मानणार असाल तर महाराष्ट्राचं काही खरं नाही हे नक्की.
राज्याचे मुख्यंमत्री आणि गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, हे प्रकरण आम्हीच शोधून काढलं आणि याचा तपास सुरु केला आहे.
जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरत आहे, तेंव्हा हे सगळं घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही म्हणून दोषी धरायचं ? माझ्या तर कानावर असं पण येतंय की कोणाच्या तरी महत्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. याचा अर्थ असा की एकदा का समोरच्याने शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुरघोड्या थांबवल्या की हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाईल.
माझी माध्यमांना विनंती आहे की तुम्ही या असल्या धोबीपछाड राजकारणाचा भाग होऊ नका. या असल्या बुवाबाबांना शोधून काढा. त्यांची कृत्य उघडकीस आणा. इतकंच नाही तर खरातला कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण शांत होऊ देऊ नका.
MR
Adarsh Kasar retweetledi
Adarsh Kasar retweetledi

राजसाहेब ठाकरे ओरडून ओरडून ढोंगी भाजपला हेच सांगत आहेत की महाराजांचा पुतळा बांधण्यापेक्षा त्यांचे जेवढे गड किल्ले आहेत ते आधी सारखे करा!
"भाजप ते गुजरात मध्ये करू शकते पण महाराष्ट्रात महाराजांचे गड किल्ले आधी सारखे करू शकत नाही".
#Mumbai #Marathi
Gujarat Plus@gujarat_plus_
Historic Bhujiya Kotho in Jamnagar Reopens After Restoration 🔥🔥 Before After
MR
Adarsh Kasar retweetledi

तोच ठाकरी बाणा!
पुढील ३ वर्ष निवडणूक नाही, राजसाहेब काय बोलणार, विषय नाही, मैदान भरेल का? असे अनेक प्रश्न सकाळ पासून कानावर येत होते!
"शेवटी राज ठाकरे आहे तो"
रेकॉर्ड ब्रेक मैदान भरून, मराठी म्हणजे कोण आणि काय हे जगाला मेळाव्यातून सांगितले!
वैचारिक सभा 🔥
#RajThackeray

MR
Adarsh Kasar retweetledi
Adarsh Kasar retweetledi
Adarsh Kasar retweetledi

लोक राज ठाकरेंना पुन्हा पुन्हा निवडणुकीत हरवत राहतात, तरीही तो माणूस पुन्हा पुन्हा महाराष्ट्रासाठी नवीन काहीतरी घेऊन येतो.
आजही maharashtra-next.in आणलंय. ❤️
#RajThackeray
MR
Adarsh Kasar retweetledi
Adarsh Kasar retweetledi

सस्नेह जय महाराष्ट्र,
आज १९ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र नेक्स्ट हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. १९ मार्च या तारखेचं अजून एक वैशिट्य म्हणजे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतरची पहिली सभा याच तारखेला झाली होती. त्या सभेत मी महाराष्ट्राचा विकास आराखडा घेऊन येईन असं आश्वासन दिलं होतं. पुढे २०१४ ला अत्यंत विस्तृत आणि प्रगल्भ असा महाराष्ट्राचा विकास आराखडा आम्ही सादर केला. जे पत्रकार २००८ ते २०१४ या काळात, ‘ काय कधी येणार तुमचा विकास आरखडा' हा प्रश्न अत्यंत कुत्सित पद्धतीने विचारत होते त्या पत्रकारांनी ना तो कधी वाचला, ना सत्ताधाऱ्यांनी त्यातून फारसा बोध घेतला. असो.
तो विकास आराखडा सादर करताना, 'विकासाला सौंदर्यदृष्टीची जोड' का असायला हवी या बद्दलचं माझं विवेचन मी एका चित्रफितीतून मांडलं होतं. त्यावेळच्या परिस्थितीवरचं ते माझं भाष्य होतं. पण २०१४ ते २०२५ या ११ वर्षांच्या काळात महाराष्ट्र अजूनच बकाल झाला. विकास म्हणजे रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या झाली आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता, तितक्या हजार कोटींचा रस्ता, त्याची उदघाट्न यातच सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले. आणि याच्या जोडीला अजून एक पेव फुटलं आहे ते म्हणजे विविध योजनांतून नागरिकांना काही ना काही मोफत द्यायचं. नागरिकांना कधीच काही मोफत नको असतं, त्यांना चांगलं आयुष्य हवं असतं. पण हे भानच सुटलं आहे. यात २०२६-२७ चा राज्याचा अर्थसंकल्पात सरकारनेच कबुली दिली आहे की राज्यावर कर्जाचा बोजा हा ११ लाख कोटींचा आहे. हे सगळं का घडलं कारण नियोजनशून्यता. विकास ही विचारशील प्रक्रिया याचं भान सुटल्याने हे सगळं घडलं.
या सगळ्यावर विचार करताना, आम्ही असं ठरवलं की पुन्हा एकदा महाराष्ट्राचा एक नवा विकास आराखडा आणूया. पण यावेळेस फक्त तज्ज्ञांचे मत न घेता त्यात जनसहभाग असावा. म्हणून हे संकेतस्थळ विकसित केलं आहे. अनेक मुख्य शीर्षक आणि उप-शीर्षकं याच्यात महाराष्ट्राच्या विकासाचा विचार किती सर्वांगीण व्हावा याची मांडणी केली आहे. लोकांच्या मनातील उत्तम कल्पना आणि अर्थात तज्ज्ञांची मतं याचा मेळ घालत आम्ही पुन्हा एक बृहद विकास आराखडा घेऊन येणार आहोत. आणि तो सरकारला राबवण्यासाठी भाग पाडणार आहोत.
एकूणच सरकारांची श्रवणशक्ती कमी झाली असल्यामुळे तुमचा आवाज त्यांच्या कानांवर पडत असेल असं वाटत नाही. तुमच्या आवाजाचे, तुमच्या अपेक्षांचे, तुमच्या मतांचे आम्ही वाहक होऊ. तुम्ही इथे तुम्हाला ज्या विषयांत तुमच्या कल्पना द्यायच्या आहेत त्या निवडा, त्यावर लिहा. तुमची कल्पना योग्य असेल तर तुमच्या नावासकट ती व्यवस्थेला कळवली जाईल.
महाराष्ट्र नेस्टच्या वेबसाईटची लिंक खाली जोडत आहे.
महाराष्ट्राच्या विकासाच्या तुमच्या कल्पना जरूर कळवा.
Maharashtra-next.in
MR
Adarsh Kasar retweetledi
Adarsh Kasar retweetledi

Let the Gudi lead us into brighter days ahead! 🥳
Wishing you a prosperous Gudi Padwa
#WhistlePodu #Yellove

English
Adarsh Kasar retweetledi
Adarsh Kasar retweetledi
Adarsh Kasar retweetledi
Adarsh Kasar retweetledi

#OTD in 2012
The legendary Sachin Tendulkar became the first player ever to achieve the unprecedented feat of 1️⃣0️⃣0️⃣ international centuries 👏🫡
#TeamIndia | @sachin_rt

English

















