'जिंकले की लोकशाही, हरले की ईव्हीएम' हा महाविकास आघाडीचा नेहमीचाच पवित्रा आहे.
निवडणूक येताच संविधान, लोकशाही यांच्या नावाने भावनिक राजकारण करून लोकांची दिशाभूल करायची, हा महाविकास आघाडीचा नेहमीचाच खेळ होऊन बसला आहे.
लोकसभा निवडणुकीत जेव्हा जनमताचा कौल महाविकास आघाडीला मिळाला, तेव्हा तोंडून 'ब्र' सुद्धा न काढणारे महाविकास आघाडीचे नेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येताच पुन्हा एकदा लोकांची दिशाभूल करू पाहत आहेत.
"व्होट चोरी"च्या धादांत खोट्या आरोपाला निवडणूक आयोगाने पुराव्यांसह ठोस उत्तर देऊनसुद्धा वारंवार निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हा केवळ निवडणूक आयोगाचा नव्हे, तर संविधान आणि लोकशाहीचा अपमान आहे.
लोकशाही, संविधान यांच्या या अपमानाचा आणि महाविकास आघाडीच्या याच दुटप्पी राजकारणाचा विरोध करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र भाजपा परिवाराच्या वतीने गिरगाव चौपाटी, मुंबई येथे मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी लोकशाहीचा सन्मान जपण्याचा संदेश देण्यात आला.
या आंदोलनाप्रसंगी भाजपा मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम, भाजपा नेते आणि मंत्री मंगल प्रभात लोढा, भाजपा आमदार संजय उपाध्याय, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा आ. चित्राताई वाघ, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#IndianConstitution#Democracy#RespectTheConstitution#RespectTheMandate#BJPProtest#MookAndolan#Mumbai#GirgaonChowpatty#ConstitutionalValues#BJP#StandForDemocracy#BJP4India#BJP4Maharashtra#RavindraChavan4MahaBJP#AplaRavi
भारतात सहाव्या शतकापासून जहाज बांधणी होत होती. त्याच्या अनेक शतकांनंतर इतर देशांनी तशी जहाज बांधणी सुरू केली. मध्यंतरी भारत जहाज तोडणीमध्ये अग्रेसर झाला आणि आता परत जहाज बांधणीमध्ये वेगाने पुढे जात आहे- पंतप्रधान @narendramodi जी
#PMatIMW2025
बर्जिस देसाई लिखित प्रधानमंत्री मोदी यांचे जीवनचरित्र सांगणारे #ModisMission हे पुस्तक महाराष्ट्राचा अभिमान! देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशित होत आहे हा महाराष्ट्रासाठी एक प्रेरणादायी क्षण आहे
पंतप्रधान मोदीजींचा इतिहास सांगणारं पुस्तक म्हणजेच भारताचं भविष्य सांगणारं पुस्तक आहे. #ModisMission या ऐतिहासिक पुस्तकाच्या प्रकाशन सोहोळ्याचे साक्षीदार व्हा!
आज संध्याकाळी राजभवन मुंबई येथे इतिहास घडणार! पारशी वकील बर्जिस देसाई यांच्या #ModisMission पुस्तकाचे मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जींच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन! मोदीजींच्या प्रेरक प्रवासाची अद्भुत कथा सांगणारं हे पुस्तक नक्की वाचूया…
प्रसिद्ध लेखक आणि वकील बर्जीस देसाई यांचे #ModisMission हे पुस्तक आज राजभवन, मुंबई येथे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दोन्ही मा. उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रकाशित होत आहे. या ऐतिहासिक प्रकाशन सोहळ्याचे साक्षीदार होऊया!
भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते, भारतीय राजकारणातील कुशल रणनीतीकार, अद्वितीय संघटक, देशाचे कणखर गृहमंत्री आदरणीय @AmitShah भाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
@HMOIndia@PIBHomeAffairs#HappyBDayAmitShah
वसुबारस आजपासून दीपावली उत्सव पर्वाची सुरूवात होते. वसुबारस या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. आपल्या कृषिप्रधान देशात गायीला खूप महत्व आहे आणि कामधेनू रुपी गाईच्या पोटी सर्व देवांचा वास असतो , म्हणून या दिवशी गाईची पूजा करण्याची प्रथा आहे. आपणांस व आपल्या परिवारास दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा !!! . . . . . #वसुबारस #vasubaras#diwali2025#dipawali#dipawali2025 #दिवाळी2025