




कुरार पोलीस ठाणे - Kurar PS Mumbai
9 posts

@Kurar_PS
कुरार पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official account of Kurar PStn Mumbai. For emergency Dial 100/112.










Today, Hon’ble Chief Minister Shri @Dev_Fadnavis, in the esteemed presence of Minister of State for Home (Urban) Shri @iYogeshRKadam, inaugurated several key initiatives of the @MumbaiPolice:. 1. Parksite Police Station Building: A modern two-storey police station, built on a 6,500 sq. ft. plot provided by BMC’s Encroachment Department, was inaugurated. The new building is equipped with state-of-the-art facilities. 2. Video Conferencing System: Under the Nirbhaya Safe City ITVC initiative, 208 video conferencing systems based on on-premises server technology have been provided to officers from Senior Police Inspectors to Addl. Commissioner of Police across the department. 3. Cyber and Crime Data Labs: As part of the Nirbhaya Scheme, 3 Cyber Labs, 1 Social Media Lab, and 1 Crime Data Lab have been established to strengthen cybercrime investigation and digital intelligence. 4. Deployment of Forensic Vehicles: To comply with BNNS Section 176(3), which mandates on-site forensic examination and videography at crime scenes, 5 Tata Winger Mobile Forensic Units equipped with 29 specialized kits have been launched under the Safe City Project. 5. Launch of Official ‘X’ Handles: To highlight the good work done by the police and ensure timely public communication, all 93 police stations and 13 zonal offices in Mumbai have launched their official ‘X’ handles. 6. Women & Child Support Cell: A dedicated Women and Child Support Cell has been inaugurated under the centrally and state-sponsored Nirbhaya Scheme to enhance the safety and well-being of women at the police station level. 7. Cyber Helpline Awareness Video Launch: A public awareness video was launched to promote the Cyber Helpline 1930 and educate citizens on various types of cyber fraud. 8. Mission Karmayogi Inauguration: Under this training initiative, 500 Master Trainers, who will then train 40,000 police personnel across six phases to enhance professionalism and service delivery. #MumbaiPolice4All @CMOMaharashtra

मा. मुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis यांच्या हस्ते आणि राज्याचे गृह (शहरे) राज्यमंत्री श्री. @iYogeshRKadam यांच्या उपस्थितीत आज @Mumbaipolice विभागातील अनेक महत्त्वाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले: १. पार्क साईट पोलीस ठाणे इमारतीचे उद्घाटन:- याकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडील प्राप्त ६५०० स्क्वेअर फिट भुखंडावर कृती आराखडयातुन सर्व सोईसुविधायुक्त पार्क साईट पोलीस ठाण्याची नवीन दुमजली इमारत उभारण्यात आली आहे. २. व्हिडिओ कॉन्फरन्स प्रणाली :- निर्भया सेफ सिटी अंतर्गत वरिष्ठ/प्रभारी पोलीस निरीक्षक ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सकरिता ऑन प्रिमायसेस, सर्व्हर तंत्रज्ञानावर आधारित सुविधा त्यांचे कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. ३. निर्भया योजनेअंतर्गत सायबर लॅब व क्राईम डेटा लॅब उद्घाटन :- या योजनेअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले असून, त्यापैकी ३ सायबर लॅब, १ सोशल मिडीया लॅब, १ क्राईम डेटा लॅब या स्थापन करण्यात आल्या आहेत. ४. विविध वाहनांचे लोकार्पण :- बीएनएनएस कलम १७६ (३) अन्वये गुन्ह्याच्या घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ञाची भेट आणि प्रक्रियेची व्हिडिओग्राफी आवश्यक असल्याने निर्भया सुरक्षित शहर प्रकल्पांतर्गत ५ टाटा विंगर वाहने ही मोबाइल फॉरेन्सिक युनिट्स २९ विविध किट्स सह तैनात करण्यात येत आहेत. ५. पोलीस ठाणे 'X’ हँडल लोकार्पण :- पोलीस ठाण्यांनी त्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याकरिता सोशल मिडीयावर अकाउंट तयार करण्यात आले आहे. यामध्ये बृहन्मुंबई मधील सर्व १३ परिमंडळ व ९३ पोलीस ठाणे यांचे अधिकृत ' X ' खाते कार्यान्वित करण्यात आले. ६. महिला व बाल सहाय्यता कक्ष लोकार्पण :- शहर महिला सुरक्षितता पुढाकार (निर्भया) योजना ही केंद्र व राज्यशासन पुरस्कृत असून महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस ठाणे स्तरावर राबविण्यात येत आहे. ७. सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० चे जनजागृतीकरिता व्हिडिओ लोकार्पण :- सायबर फसवणूकीच्या विविध प्रकारांची माहिती जनतेपर्यंत पोहचवून जनजागृती करण्यासाठी सायबर जागृती व्हिडीओ चे लोकार्पण करण्यात आले. ८. मिशन कर्मयोगीचे उद्घाटन :- सदर उपक्रमांतर्गत ०६ टप्यांमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार असुन त्याकरीता पोलीस दलातील ५०० अधिकारी व कर्मचारी यांना मास्टर ट्रेनरचे प्रशिक्षण देऊन यांच्या मार्फतीने इतर ४०,००० पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. @CMOMaharashtra
