मालवणी माणूस ❤️😎 retweetledi

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय !(१)
हा सिनेमा जेव्हा पाहिला, तेव्हा सुरुवातीपासूनच कथा, मांडणी, सादरीकरण सगळं आवडत गेलं पण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत जेव्हा महेश मांजरेकर यांना पाहिलं तेव्हा मात्र सुग्रास अन्नात मिठाचा खडा कचकन लागावा तशी भावना झाली.
प्रेक्षक म्हणून ती पात्रनिवड मला अजिबातच रूचली नव्हती/नाही.
किती तो अट्टहास छत्रपतींना ओंगळवाणं दाखवायचा!
आणि आता रितेश देशमुख.
हिंदू धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी हिंदवी स्वराज्याची शपथ महाराजांनी घेतली आणि ती पूर्णत्वास नेली.
आता त्यांची भूमिका 'धर्माचं आम्ही बघतो...' असं निवडणुकीच्या वेळी जाहीर सभेत बोलणारा काँग्रेसचा रितेश देशमुख करणार. नाही पटलं. अजिबातच नाही पटलं.
'काँग्रेस आणि हिंदू' ही व्याख्या मी या ठिकाणी वेगळी सांगायची गरज नाही,
नाही का !
त्याप्रमाणेच 'महाराजांचा आब' ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाहीच. जनमानसाच्या भावना त्यात गुंतलेल्या आहेत हे लक्षात घेणं गरजेचंच आहे.
असो.
" तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे, चित्ती असू द्यावे समाधान..." ही शिकवण ध्यानी ठेवणे हेच बरे .
--शिवानी गोखले
#छत्रपतीशिवाजीमहाराज की जय 🙏🙏🚩


MR

















