
Omkar Ratate
103 posts



#कनिष्ठ_अभियंता (स्थापत्य गट ब) च्या रखडलेल्या नियुक्त्यांच्या संदर्भात मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांची भेट घेऊन हा विषय निकाली काढण्याची विनंती केली.त्यांनी देखील त्वरित जलसंपदा विभागाच्या सचिवांशी संपर्क करून सद्यस्थिती जाणून घेतली.या विषयाची सुनावणी ११ सप्टेबर रोजी असून त्यासाठी अत्यंत नामांकित वकील विद्यार्थ्यांची बाजू मांडणार असून विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल लागण्यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.न्यायालयाच्या निकालानंतर त्वरित नियुक्त्या देण्याबाबत देखील त्यांनी आश्वासित केले आहे. न्यायालयाचा निकाल विद्यार्थ्यांच्या बाजूनेच लागणार असा विश्वास आहे.गेल्या अधिवेशनात देखील मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री साहेबांशी याविषयी चर्चा केली असून मी स्वता या विषयी वैयक्तिक लक्ष ठेवून आहे.त्यामुळे सद्या सुरु असलेला पाउस व उपोषणात विद्यार्थिनी भगिनींची असलेली संख्या बघता आपण हे उपोषण त्वरित मागे घ्यावे अशी आपला मोठा भाऊ विनंती करतो.






























जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट ब या पदासाठी जुलै २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहीरातीनुसार झालेल्या परीक्षेतील उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा आदेश जलसंपदा विभागाला देण्याची विनंती उपमुख्यमंत्री अजितदादा यांना केली. तसंच महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक पदाच्या भरतीसाठी SEBC to EWS विकल्प दिलेल्या मराठा समाजातील २८२ गुणवत्ताधारक उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याची विनंतीही केली. याशिवाय महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा २०१९ च्या परीक्षेत SEBC To EWS विकल्प निवडलेल्या मराठा समाजातील ९४ उमेदवारांना अद्याप नियुक्त्या दिलेल्या नाहीत. ही बाबही मा. अजितदादा यांच्या निदर्शनास आणून दिली असता याध्येही लक्ष घालण्याचं त्यांनी मान्य केलं. @AjitPawarSpeaks




