Rahul Kalate

3.4K posts

Rahul Kalate banner
Rahul Kalate

Rahul Kalate

@Rahul_Kalate

समाजसेवक । नगरसेवक, पिंपरी चिंचवड महापालिका

Katılım Şubat 2017
36 Takip Edilen704 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Rahul Kalate
Rahul Kalate@Rahul_Kalate·
पिंपरी-चिंचवड शहराची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी पवना बंद पाईपलाईन प्रकल्पाला निधी आणि गती द्यावी असे निवेदन आज मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना मुंबईत भेटून दिले. facebook.com/share/p/1Brz4o… @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra #PimpriChinchwad #WaterForAll #RahulKalate
Rahul Kalate tweet media
MR
0
1
3
263
Rahul Kalate
Rahul Kalate@Rahul_Kalate·
मजबूत रस्ते, वेगवान विकास! विकासाच्या वाटेवरील प्रत्येक अडथळा दूर करण्याचा संकल्प! वाकड आणि पुनावळेतील विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाहीचे निर्देश.... @BJP4Maharashtra [Wakad, Punawale, Road Development, Pimpri Chinchwad, PCMC, Rahul Kalate]
MR
0
0
0
10
Rahul Kalate
Rahul Kalate@Rahul_Kalate·
📍 पुनावळे पुनावळेतील इरा सोसायटीपासून सियोना सोसायटीजवळ महामार्गाला जोडणाऱ्या प्रस्तावित रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणींचा आढावा घेतला. यावेळी ड्रेनेज व्यवस्था, पावसाळी पाणी वाहिनी तसेच रस्त्याशी संबंधित विविध समस्यांची सविस्तर माहिती घेतली. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर लवकरात लवकर योग्य उपाययोजना करून आवश्यक कामांना गती देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या तसेच परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि स्थानिक प्रश्न समजून घेतले. विकासकामे करताना स्थानिकांच्या हिताला प्राधान्य देत सर्वसमावेशक निर्णय घेण्यात येत असून, यावेळी श्री संजयदादा ढवळे, श्री निलेश ढवळे, श्री प्रशांत ढवळे, श्री शुभम भुजबळ, श्री जालिंदर काटे यांच्यासह स्थापत्य आणि नगररचना विभागाचे महापालिका अधिकारी उपस्थित होते. @BJP4Maharashtra [Punawale, Infrastructure, Road Development, Pimpri Chinchwad, Maharashtra, Rahul Kalate]
Rahul Kalate tweet mediaRahul Kalate tweet mediaRahul Kalate tweet mediaRahul Kalate tweet media
MR
0
0
1
19
Rahul Kalate
Rahul Kalate@Rahul_Kalate·
आपल्या कामाच्या धडाक्याने भारताच्या पायाभूत सुविधांचा चेहरामोहरा बदलणारे लोकप्रिय नेते केंद्रीय रस्ते विकास मंत्री मा. नितीनजी गडकरी साहेब यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! रस्ते, महामार्ग आणि प्रगतीच्या नवनवीन वाटा निर्माण करणाऱ्या, त्यांच्यातील कार्यकुशल नेतृत्वाला उदंड आयुष्य लाभो. तसेच देशसेवेचे आपले कार्य असेच अखंड चालत राहो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना! @nitin_gadkari
Rahul Kalate tweet media
MR
1
0
1
30
Rahul Kalate
Rahul Kalate@Rahul_Kalate·
समाजाच्या उद्धारासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीच्या प्रवासात सावलीसारखी सोबत देणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! [ Ramabai Ambedkar, Rahul Kalate ]
Rahul Kalate tweet media
MR
0
0
0
17
Rahul Kalate
Rahul Kalate@Rahul_Kalate·
विकासकामांची पाहणी..! 📍 पुनावळे ओव्हाळ वस्ती येथे सुरु असलेल्या विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे भागात सुरु असलेली सर्व कामे जलदगतीने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश याप्रसंगी संबंधी अधिकाऱ्यांना दिले. वस्ती अंतर्गत येणारे छोटे रस्ते, स्ट्रीट लाइट, ड्रेनेज लाइन, पावसाळी पाण्याच्या लाइन संदर्भात कामे सुरु करण्यात आली आहेत. बहुतांश कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर असून या सर्व कामांचा आढावा घेतला. येत्या काही दिवसात पावसाळा सुरु होईल, अशावेळी या कामांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे कामाच्या दर्जामध्ये कसलीही तडजोड न करता, सर्व कामे पावसाच्या अगोदर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी माजी नगरसेवक श्री. शेखरजी ओव्हाळ आणि संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. @BJP4Maharashtra [Devlopment Work, Punawale, PCMC, Pimpari Chinchwad, Rahul Kalate]
Rahul Kalate tweet mediaRahul Kalate tweet mediaRahul Kalate tweet mediaRahul Kalate tweet media
MR
0
0
1
12
Rahul Kalate
Rahul Kalate@Rahul_Kalate·
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विद्युत विभागातील कर्मचारी महासंघाचे मा. कार्यकारणी सदस्य श्री. बाळासाहेब नारायण साठे (पाटील) यांच्या सेवापूर्ती समारंभास उपस्थित राहून, त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी कर्मचारी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करत महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पुढील आयुष्यास उत्तम आरोग्य, आनंद व यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! [PCMC, Pimpri Chinchwad, Electric Department, Karmachari Mahasangh, सेवापूर्ती समारंभ, कर्मचारी महासंघ, Rahul Kalate]
Rahul Kalate tweet mediaRahul Kalate tweet mediaRahul Kalate tweet mediaRahul Kalate tweet media
MR
0
0
0
15
Rahul Kalate
Rahul Kalate@Rahul_Kalate·
#मंत्रिमंडळ_निर्णय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय… 🗓️ २६ मे २०२६ | 📍 मंत्रालय, मुंबई @Dev_Fadnavis @CMOMaharashtra [Cabinet Decision, BJP4Maharashtra, Mumbai, Maharashtra, Devendra Fadnavis, Rahul Kalate]
Rahul Kalate tweet media
0
0
0
13
Rahul Kalate
Rahul Kalate@Rahul_Kalate·
वाकड हद्दीतील हायवेच्या सर्विस रोडच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला आज प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, टिप-टॉप हॉटेल ते भूमकर चौक या महत्त्वाच्या मार्गावरील सर्विस रोडच्या कामाचे नारळ वाढवून भूमिपूजन केले. पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणातून विकासाचा वेग अधिक गतिमान होत असून, या कामामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास, नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होण्यास मदत होणार आहे. यावेळी माझे सहकारी नगरसेवक श्री कुणाल वाव्हळकर, सौ. श्रुती वाकडकर, NHAI चे अधिकारी श्री विनोद पाटील, महापालिकेचे (ड) प्रभाग कनिष्ठ अभियंता श्री विवेक ताकवले, BRTS चे अधिकारी श्री चंद्रकांत मोरे उपस्थित होते. 📍 वाकड @BJP4Maharashtra [Wakad, PCMC, Pimpri Chinchwad, Infrastructure Development, Development, Maharashtra, Rahul Kalate]
Rahul Kalate tweet mediaRahul Kalate tweet mediaRahul Kalate tweet mediaRahul Kalate tweet media
MR
0
0
2
20
Rahul Kalate
Rahul Kalate@Rahul_Kalate·
२६ मे २०१४… भारताच्या लोकशाहीसाठी एक निर्णायक क्षण! 🇮🇳 ‘प्रधानसेवक’ म्हणून सेवा, सुशासन आणि जनकल्याणाच्या प्रेरणादायी १२ वर्षांचा गौरवशाली प्रवास! देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी २०१४ साली जेव्हा पहिल्यांदा देशाची धुरा स्वीकारली, तो दिवस भारताच्या नवचैतन्याचा, नवसंकल्पाचा आणि आत्मविश्वासाच्या पुनर्जागरणाचा ऐतिहासिक क्षण होता. या दिवशी कोट्यवधी भारतीयांनी एका अशा नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला, ज्याने भारताला सामर्थ्यवान, आत्मनिर्भर, गौरवशाली आणि विकसित राष्ट्र म्हणून जगाच्या अग्रस्थानी नेण्याचा दृढ संकल्प केला. “विकास आणि विरासत” या विचाराला केंद्रस्थानी ठेवत आधुनिक प्रगतीसोबतच भारताच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक गौरवाचे जतन आणि पुनर्स्थापना करण्याचे कार्य मागील १२ वर्षांच्या काळात घडले. @narendramodi @BJP4India [12Years Of Seva, Modi Hai To Mumkin Hai, Bharat, Maharashtra, Rahul Kalate] #glorious12years #राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती
MR
0
0
0
3
Rahul Kalate retweetledi
Ravindra Chavan
Ravindra Chavan@RaviDadaChavan·
राष्ट्र निर्माण, संस्कृतीचे संवर्धन, सुरक्षितता आणि प्रत्येक नागरिकाचा विकास... गेल्या १२ वर्षांत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भारताने प्रत्येक क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे. आजचा दिवस नव्या, समर्थ, आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या तपपूर्तीचा ऐतिहासिक दिवस आहे. #Glorious12Years #राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती
MR
1
36
208
1.7K
Rahul Kalate
Rahul Kalate@Rahul_Kalate·
१२ वर्षे सेवा, सुशासन आणि जनकल्याणाचा अखंड प्रवास! पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विकास, आत्मनिर्भरता आणि जागतिक प्रतिष्ठेच्या दिशेने ऐतिहासिक वाटचाल केली आहे. गरीब कल्याणापासून ते आधुनिक पायाभूत सुविधांपर्यंत, प्रत्येक क्षेत्रात नवा भारत घडताना दिसत आहे. “विकसित भारत” या संकल्पनेला साकार करण्यासाठी गेली १२ वर्षे समर्पितपणे कार्य करणाऱ्या या नेतृत्वाला सलाम! @narendramodi @BJP4India @BJP4Maharashtra [12Years of Modi Government, Modi Hai To Mumkin Hai, Viksit Bharat, New India, Narendra Modi, India, Maharashtra, Rahul Kalate]
MR
0
0
0
3
Rahul Kalate
Rahul Kalate@Rahul_Kalate·
अकोल्याचे खासदार श्री. अनुपजी धोत्रे यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आपल्या नेतृत्वाखाली मतदारसंघाचा विकास असाच वेगाने होत राहो, हीच सदिच्छा. @AnupSDhotre
Rahul Kalate tweet media
MR
0
0
0
7
Rahul Kalate
Rahul Kalate@Rahul_Kalate·
📍वाकड ‘JINA Gold | Diamond | 92.5 Silver’ यांच्या नवीन शोरूमच्या भव्य उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून, श्रीमती राधा श्रवण गुप्ता यांच्यासह नवीन व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. लोकप्रिय अभिनेत्री मृणालजी कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेला हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. उद्योजकता, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन देणारे असे उपक्रम निश्चितच आपल्या परिसराच्या विकासाला नवी दिशा देणारे आहेत. [JINA Jewellery, Grand Opening, Pimpri Chinchwad, Wakad, Tathawade, Punawale, PCMC, Rahul Kalate]
Rahul Kalate tweet mediaRahul Kalate tweet mediaRahul Kalate tweet mediaRahul Kalate tweet media
MR
0
0
0
20
Rahul Kalate
Rahul Kalate@Rahul_Kalate·
वाकड 📍 दत्त मंदिर रोडवरील उत्कर्ष चौक ते टीप-टॉप हॉटेलजवळ अंडरपासला जोडणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाला आज प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रत्यक्ष उपस्थित राहून दत्त मंदिर रोड विकास अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. नवीन रस्ता होतोय त्यावेळी दोन्ही रस्त्यांना जोडणारा कॉर्नर, चौकाचे डिझाईन यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. परिसरातील विकासकामे दर्जेदार पद्धतीने आणि वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधत पाठपुरावा सुरू आहे. @BJP4Maharashtra [Wakad, Pimpri Chinchwad, Road Inspection, Development Work, Rahul Kalate, BRT, Datta Mandir Road]
Rahul Kalate tweet mediaRahul Kalate tweet mediaRahul Kalate tweet mediaRahul Kalate tweet media
MR
0
0
1
22
Rahul Kalate retweetledi
भाजपा महाराष्ट्र
जो देश एकेकाळी सर्व युद्धसामुग्री आयात करत होता तोच देश आत्मनिर्भर भारत संकल्पनेनुसार स्वतः ती तयार करत आहे आणि त्याची निर्यातही करत आहे.- मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी #Maharashtra #Shirdi #NibeGroup
MR
2
27
64
763
Rahul Kalate
Rahul Kalate@Rahul_Kalate·
📍जनसंवाद | २३ मे २०२६ आज वाकड येथील जनसंपर्क कार्यालयात परिसरातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत, त्यांच्या विविध समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या. नागरिकांनी दैनंदिन जीवनाशी संबंधित नागरी अडचणी, मूलभूत सुविधांबाबतचे प्रश्न तसेच प्रभागातील विविध विषय मनमोकळेपणाने मांडले. राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे मार्गदर्शक मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या लोकाभिमुख आणि विकासकेंद्री नेतृत्वातून प्रेरणा घेत, नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाची संवेदनशीलतेने दखल घेऊन संबंधित प्रशासकीय विभागांशी समन्वय साधत तातडीने आवश्यक कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही यावेळी दिली. तसेच प्रत्येक समस्या पूर्णतः मार्गी लागेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करून नागरिकांना न्याय देण्याचा निर्धार व्यक्त केला. @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJP4Maharashtra [JanSamvad, Public Meeting, Wakad, Punawale, Tathawade, PCMC, Pimpri Chinchwad, BJP, Rahul Kalate]
Rahul Kalate tweet mediaRahul Kalate tweet mediaRahul Kalate tweet mediaRahul Kalate tweet media
MR
0
0
0
9
Rahul Kalate
Rahul Kalate@Rahul_Kalate·
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. नितीन नबीनजी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या सक्षम आणि प्रभावी नेतृत्वातून संघटन अधिक बळकट होत राहो, जनसेवेच्या कार्याला नवी ऊर्जा मिळो आणि आपणास निरोगी, दीर्घायुषी व यशस्वी आयुष्य लाभो, हीच सदिच्छा! @NitinNabin
Rahul Kalate tweet media
MR
0
0
0
13