Ravi Amale retweetledi

राजकारणात असताना जी गोष्ट मोहित कंबोज यांना साध्य झाली नाही ती राजकारणाबाहेर पडून अलगद करून दाखवली आहे.
शिवसेना पक्ष फुटीबद्दल असलेली- नसलेली सगळी सहानभूती आता संपवून टाकली आहे.
तशाही आता तीन वर्ष निवडणुका नाहीत पुढच्या निवडणुकीला पुन्हा ते रडगाणे नकोच.
महाराष्ट्रातल्या एकाही माणसाने यापुढे या घटनेबद्दल एक टक्का देखील सहानुभूती बाळगू नये.
त्याचं ठाकरेंनाच काही पडलं नसेल तर तुम्ही उरावर काही घेण्याची गरज नाही.
विरोधी विचारांशी संवाद असलाच पाहिजे.. राजकीय नेत्यांच्या काही बाबी वैयक्तिक ठेवल्या पाहिजेत.. ही गोष्ट मान्य करूनही यातला फरक लक्षात घेतला पाहिजे.
मोहित कंबोज यांनी मुंबईत निर्माण केलेल्या साम्राज्याला Legitimicy मिळवून देण्यात आदित्य यांनी हातभार लावला आहे.
MR



































