पुस्तकं आणि बरच काही 📖

6K posts

पुस्तकं आणि बरच काही 📖 banner
पुस्तकं आणि बरच काही 📖

पुस्तकं आणि बरच काही 📖

@PABKTweets

वाचनाच्या नवीन पिढ्या रुजवण्यासाठी शब्दांचे वृक्षारोपण करणारे व्यासपीठ…📖 #पुस्तकआणिबरचकाही : https://t.co/RHviCCghvr

साहित्यविश्व Katılım Mayıs 2022
78 Takip Edilen4.6K Takipçiler
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweetledi
|ग्रं|थो|पा|स|क|
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) Twenty-two years after Ayatollah Khomeini's ascent to power in Iran, many aspects of his 1979 Islamic revolution remain obscure if not baffling. For instance, in November 1978 an offer was made to him in his Paris exile to return to Iran with international guarantees of freedom of speech and action. He refused and demanded the departure of the Shah. Americans put pressure on the monarch to leave the country. Khomeini arrived in Tehran in early February 1979, and he immediately demanded the return of the Shah and his trial before an Islamic tribunal! No one could give a valid explanation of this contradiction in Khomeini's conduct and demands. Many other mysteries in the unfolding of the revolution and the policies of the Islamic republic which replaced the monarchy have gone unexplained up to now. Scholars and experts in the West have offered the usual explanations for the Islamic revolution-corruption, deepening gaps between the rich and the poor, rapid industrialization, sky-rocketing inflation, westernizing policies that offended traditions, lack of democratic institutions, authoritarian rule, and on and on. But such characteristics which exist in other Muslim countries, especially in the Arab world, fail to clairify the particularities of the Iranian revolution. Indeed, as Ambassador Hoveyda points out, Iran is not an Arab country. It has kept alive its ancient mythological heritage which is not Islamic. It is an Indo-European nation with a recorded history of three thousand years! To understand the real causes of the 1979 revolution one must refer to the deep-rooted beliefs of Iranians and to their very rich mythology. One must also take into account the kind of Islam-shiism-Iranians have created and nurtured. In fact, Iran is a powerful example of how mythologies remain alive and can account for the conduct of a whole nation. Hoveyda shows the influence of myths in history-in-the-making. Indeed, he has found in the Iranian revolution many points that can be clarified only by the impact of old mythology and mindsets. He provides a very original explanation of the events that led to the fall of the Shah and the ascent of Khomeini, changing the political and diplomatic situation in the Middle East, the Persian Gulf, and the Caspian Sea region. As such it will be of great interest to scholars, students, researchers, and foreign policy makers involved with the Middle East and Islamic fundamentalism. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
|ग्रं|थो|पा|स|क| tweet media
English
0
2
3
158
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweetledi
जमिर लांडगे
@letsreadindia @granthopasak @PABKTweets #mustreadbook #वाचायलालागतंय #पुस्तक #वाचन #नादपुस्तकांचा #वेडपुस्तकांचे #वाचतराहूयाशिकतराहूया #मराठी #अमीना #मोहम्मदउमर #उदयभिडे
जमिर लांडगे tweet media
QME
1
4
8
232
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweetledi
|ग्रं|थो|पा|स|क|
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) गेल्या दशकात अनेक देशांमध्ये गृहयुद्धं भडकली. गावांवर, शहरांवर बॉम्बहल्ले झाले, तर कुठे भीषण नैसर्गिक संकट आली... तिथल्या माणसांना जीव वाचवण्यासाठी अंगावरच्या कपड्यांनिशी देश सोडावा लागला... आणि मग सुरू झालं एक नष्टचर्य... तापलेल्या वाळवंटातून, हाडं गोठवणाऱ्या थंडीतून, दाट जंगलांतून, खवळलेल्या समुद्रातून माणसं जिवाच्या आकांताने निघाली. वाटेत किती मेली, परागंदा झाली याची गणतीच नव्हती. उरलेल्यांच्या वाट्याला रेफ्युजी कॅम्प्समधलं किडा-मुंगीचं जिणं आलं... आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिकेतले लाखो लोक असे देशोधडीला लागले... या गोष्टी आहेत त्यांच्या ससेहोलपटीच्या... आपल्याला आणि आपल्या मुलाबाळांना सुरक्षित जगता यावं या साध्या इच्छेपोटी माणसाने सोसलेल्या अनन्वित हालअपेष्टांच्या, टोकाच्या परिस्थितीतही तग धरून राहण्याच्या... आणि त्यांचं जगणं सुसह्य करण्यासाठी धडपडणाऱ्यांच्या सुद्धा... विश्वाला व्यापून असलेल्या रेफ्युजी प्रश्नाचा मानवी चेहरा समोर आणणारं पुस्तक. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
|ग्रं|थो|पा|स|क| tweet media
MR
3
10
40
1.1K
पुस्तकं आणि बरच काही 📖
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
|ग्रं|थो|पा|स|क|@granthopasak

#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) #जयसिंगरावपवार #आदरांजली 💐 सांगली जिल्ह्यातील तडसर गावातील एका शेतकऱ्याचा मुलगा कोल्हापुरात शिकायला येतो आणि शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून इतिहास संशोधक-प्राध्यापक-लेखक होतो. इतिहास क्षेत्राबरोबरच सामाजिक, राजकीय क्षेत्रातील दिग्गजांशी त्याचा परिचय होतो आणि यशस्वीपणे त्याचं जीवन घडत जातं. हा जीवनप्रवास आहे नामवंत ज्येष्ठ इतिहास-संशोधक डॉ. जयसिंगरावपवार यांचा. या आत्मचरित्रातून त्यांचं शालेय, महाविद्यालयीन, कौटुंबिक जीवन उलगडतं. त्यांचा संशोधनाचा, लेखनाचा, प्राध्यापकीचा प्रवास तपशिलाने उद्धृत केलेला दिसतो. त्या-त्या वेळच्या महत्त्वाच्या घटना (उदा. जेम्स लेन प्रकरण, दादाजी कोंडदेव प्रकरण इ.) काही ठिकाणी तपशिलाने तर काही ठिकाणी संक्षिप्तपणे नोंदवल्या आहेत. फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीने प्रेरित या व्यक्तिमत्त्वाच्या या आत्मचरित्रातून सामाजिक, राजकीय परिस्थतीही उलगडते. त्यामुळे हे आत्मचरित्र म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरावा. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐

हिन्दी
0
0
4
110
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweetledi
|ग्रं|थो|पा|स|क|
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) "... कारण आकर्षक वाटणारं जगातलं एक अद्भुत सत्य आम्हाला सापडलं होतं. ते हातातून निसटू नये म्हणून आम्ही एकमेकांना सावध करत होतो... मानवी इतिहासातला नवा साक्षात्कार आम्हाला झाला होता आणि त्याच्या प्रकाशात आम्ही न्हाऊन निघालो होतो... नव्या युगाची सुरुवात आता नक्की होणार, अशी आम्हाला मनातून खात्री वाटू लागली होती. ...ऐन तारुण्यातली बंडखोरीची ऊर्मी, त्याला पुरोगामी जीवनपद्धतीची बैठक... आणि जोडीला समविचारी तरुण मित्रांचा गट... अशी सर्व पार्श्वभूमी असल्याामुळे आम्ही त्या काळात स्वतःला इतरांपेक्षा खूप वेगळे समजत होतो..." #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
|ग्रं|थो|पा|स|क| tweet media
MR
0
6
22
1.1K
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweetledi
जमिर लांडगे
@letsreadindia @granthopasak @PABKTweets #mustreadbook #वाचायलालागतंय #पुस्तक #वाचन #नादपुस्तकांचा #वेडपुस्तकांचे #वाचतराहूयाशिकतराहूया #मराठी #उम्मेकुलसुम #कुलसुमपारेख उम्मे कुलसुम ही कुलसुम पारेख यांची मूळ कादंबरी प्रमोद मुजुमदार यांनी मराठीत अनुवादित केली आहे.
जमिर लांडगे tweet media
MR
1
3
7
255
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweetledi
Mahendra Kolate | महेंद्र कोलते
बिढार ❤️ दोनेक वर्षांपूर्वी कोसला वाचली त्यानंतर आत्ता बिढार वाचुन संपवल नेमाडेंच.पहिल्यांदा कोसला वाचताना ते समजायला वाचायला खुप जड गेलं होतं.कंटाळवाण वाटलं होत.परत कोसला दुसऱ्यांदा वाचली तेव्हा हे खुप वेगळं आपल्या हाती लागलंय याची जाणीव झाली n/1
Mahendra Kolate | महेंद्र कोलते tweet media
MR
1
8
49
2.9K
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweetledi
|ग्रं|थो|पा|स|क|
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) थोर रशियन तत्त्वचिंतक टॉलस्टॉय याची Resurrection ही महत्त्वाची आणि अखेरची कादंबरी. वि. वा. शिरवाडकरांनी हे कथाबीज घेऊन 'चंद्र जिथे उगवत नाही' या नाटकाची रचना केली. यातून एका सामान्य स्त्रीच्या आयुष्यातील प्रचंड चढउतारांचे, त्यातील नियतीचे खेळ आणि मानवी मूल्ये यांचा मनोवेधक आलेख वाचकासमोर मांडला आहे. ही केवळ नियतीचे हेलकावे सहन करणारी प्रेमकहाणी नाही, तर पापपुण्याच्या कल्पनांचा पुनर्विचार करायला लावणारी, म्हटले तर नीतिकथा आहे. याची नायिका रूपा ही शिरवाडकरांच्या श्रेष्ठ व्यक्तिरेखांपैकी एक आहे. यात नाट्यप्रयोगाविषयी नाट्यकर्मी विनय आपटे आणि मधु कांबीकर यांनी लिहिलेली टिपणे दिली आहेत. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
|ग्रं|थो|पा|स|क| tweet media
MR
0
5
21
852
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweetledi
|ग्रं|थो|पा|स|क|
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) ✍🏻 प्रा. सुरेश द्वादशीवार इंदिरा गांधी आणि जयप्रकाश नारायण या आणीबाणीतील दोन प्रमुख नेत्यांचे चरित्र, चारित्र्य, स्वभाव, जवळीक, दुरावा आणि महत्त्वाकांक्षांचे द्वंद्व या साऱ्यांची ही विस्तृत कहाणी आहे. सत्ता आणि महात्म्य यातील चढाओढीची ही अभूतपूर्व गाथा आहे. व्यक्तिगत संबंधातला संशयास्पद गोडवा आणि राजकारणातील टोकाचा दुरावा यांची ही गोष्ट आहे. आणीबाणीचे समर्थन कुणी करणार नाही. मात्र ती लावली जाण्यामागची कारणे महत्त्वाची आहेत. राजकीय भ्रष्टाचार आणि बांगला विजयामुळे इंदिरा गांधींना मिळालेली राष्ट्रीय व जागतिक मान्यता आणि त्यावर उफाळलेला त्यांच्या स्वपक्षीय नेत्यांचा रोष या गोष्टी येथे लक्षात घ्याव्या अशा आहेत. महागाई व बेरोजगारीचे संकट, बँकांच्या राष्ट्रीयीकरणाने संतापलेले देशभरचे भांडवलदार आणि म्हातारपणाकडे झुकलेल्या काँग्रेसमधील पुढाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षा या गोष्टीही यात महत्त्वाच्या ठराव्यात. 'आणीबाणी हा नाइलाज आहे हे स्वतः इंदिरा गांधींनीच म्हटले आणि 'सरकारविरोधी आंदोलन करण्यात आपली चूक झाली' ही जयप्रकाशांनी विनोबांजवळ दिलेली कबुली साऱ्या घटनांवर वेगळा प्रकाश टाकणारी आहे. त्याच वेळी संघाचे सरसंघचालक देवरस यांनी इंदिरा गांधींना दोन पत्रे लिहून मागितलेली माफी; एकनाथ रानडे, दत्तोपंत ठेंगडी आणि भाऊराव देवरस यांनी संजय गांधींजवळ लिहून दिलेले 'शरणपत्र' (डॉक्युमेंट ऑफ सरेंडर) हेही यातच पाहावे असे आहे. मी स्वतः आणीबाणीत १४ महिने तुरुंगात होतो आणि वाजपेयींसारखा विरोधी नेता दीर्घ काळपर्यंत पॅरोलवर कसा राहिला, ही गोष्ट तेव्हाही आम्हा राजबंद्यांना कळली होती! या साऱ्या प्रश्नांमागे असलेली या दोन नेत्यांच्या मानसिकतेची आरंभापासूनची घडण, त्यांनी अनुभवलेल्या राजकीय आपदा व त्यासोबतच मिळवलेली अमाप लोकप्रियताही श्रीमंत माने यांनी प्रदीर्घ स्वरूपात लिहिली आहे. विसाव्या शतकाचा संक्षिप्त राजकीय इतिहास ठरावा, असे हे लिखाण आहे. त्यातल्या प्रत्येक विधानाची प्रमाणे त्यासोबत आहेत. त्यामुळे ती विश्वसनीय ठरणारीही आहेत. तात्पर्य, आणीबाणीबाबत प्रकाशित व अप्रकाशित, जाहिरात केलेल्या व दडवलेल्या सगळ्या घटनांचा यातील तपशील वाचकांना अभ्यासनीय वाटावा व या घटनाक्रमांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देणारा आहे. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
|ग्रं|थो|पा|स|क| tweet media
MR
1
8
26
783
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweetledi
❤️ मिलिटरी मॅन ❣️
आजपासून वाचायला सुरुवात #नरेंद्रदाभोळकर
❤️ मिलिटरी मॅन ❣️ tweet media
MR
0
10
105
1.4K
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweetledi
पुस्तकायन 📚
विठोबा मिसिंग इन पंढरपूर - परंपरा, प्रश्न आणि समकाल यांचा धाडसी संगम।! विठ्ठल - रखुमाई समस्त महाराष्ट्राचं श्रद्धास्थान.. गेली २८ युगं पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर विठ्ठल उभा आहे अशी विठ्ठलाची मिथककथा एवढ्यावर येऊन थांबते. विठोबा विटेवर स्थिरावल्यावर पुढे काय झालं? #पांडुरंग 🔽
पुस्तकायन 📚 tweet media
MR
1
6
59
1.9K
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweetledi
प्रविण कलंत्री 📚
ब्रम्हकन्या लेखक - डेमियन लुईस/झोया फान अनुवाद - श्रध्दा भोबड द लिटिल डाॅटर या पुस्तकाचा हा अनुवाद. ही गोष्ट आहे ब्रम्हदेशातील कारेन जमातीच्या पोमू सित उर्फ झोया या मुलीची. वयाच्या दुसऱ्या वर्षी तिने मृत्युला हुलकावणी दिली होती. 👇 @LetsReadIndia @PABKTweets @zoyaphan
प्रविण कलंत्री 📚 tweet media
MR
1
6
19
736
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweetledi
Rashmi Madankar
Rashmi Madankar@RashmiMadankar·
#कायांतर कादंबरीला अमरावतीचा सूर्यकांतादेवी रामचंद्र पोटे उत्कृष्ट #कादंबरी #पुरस्कार घोषित... #मराठीसाहित्य #मराठीपुस्तके #तृतीयपंथी #LGBTQAI #चरित्रात्मक #वास्तववादी
Rashmi Madankar tweet media
MR
2
2
6
298
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweetledi
❤️ मिलिटरी मॅन ❣️
ज्याला मित्र असतात,तो ' पुण्य' वान चिंतन 📖 तून डॉ. आ. ह. साळुंखे
❤️ मिलिटरी मॅन ❣️ tweet media
MR
0
18
163
4.3K
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweetledi
Pranav Sakhadeo
Pranav Sakhadeo@sakhadeo_pranav·
esakal.com/saptarang/http… सकाळ वृत्तपत्रातील सप्तरंग पुरवणीतल्या अधलंमधलं सदरातील आजचा लेख - जिथे भेटायचो आपण (कवितेची ओळ - वैभव देशमुख या मित्राची) #sakal #marathi #literature
Pranav Sakhadeo tweet media
MR
0
1
13
415
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweetledi
❤️ मिलिटरी मॅन ❣️
प्रत्येक बाबतीत आपलंच खरं असा हट चालवणं स्वाभाविकच आहे पण या प्रक्रियेत सत्य आणि ज्ञान यांच्यापेक्षा अहंकारला महत्त्व येते. चिंतन📖तून डॉ. आ. ह. साळुंखे
❤️ मिलिटरी मॅन ❣️ tweet media
MR
0
3
25
631
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweetledi
|ग्रं|थो|पा|स|क|
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊)  जातव्यवस्थेवर उपरोधात्मक लिहिणाऱ्या तंजावूरच्या मराठा घराण्यातील राजपुत्रापासून ते हिंदू मंदिरातील मस्लीम देवतेपर्यंत... एक गणिका, जी योद्धा-राणी बनली, तिच्यापासून ते ग्रामोफोनवर गाणाऱ्या गणिकेपर्यंत, स्तनविहीन स्त्रीपासून ते तीन स्तन असलेल्या देवीपर्यंत आणि पवित्र संस्कृतची भक्ती करणाऱ्या ब्रिटिश माणसापासून ते व्हिक्टोरिया महाराणीपर्यंत... या पुस्तकातले विविध विषयांवरील निबंध भारताच्या भूतकाळाकडे बघण्याची एक खिडकीच उघडतात. त्या खिडकीतून दिसणारे समृद्ध जग पाहून आपण थक्कच होतो. आणि विचार करू लागतो की, यातील कितीतरी गोष्टी आपण विसरूनच गेलो आहोत आणि कितीतरी गोष्टी आपण जाणूनबुजून पुसून टाकल्या आहेत. या निबंधांचे वाचन करताना आपण भारताच्या कहाणीत बुडून जातो. ज्या स्त्री-पुरुषांचे जीवन नाट्य आणि वेगवेगळ्या कृत्यांनी ओसंडून वाहते आहे, अशांच्या अनुभवांवर मनन-चिंतन करू लागतो. रेल्वे येथे कशी आली, भारतीय फुटबॉलचा इतिहास काय होता, ते यातून आपल्याला कळते. सर्वांनी ज्याचा तिरस्कार केला त्या लॉर्ड कर्झनने भारतातील ऐतिहासिक वास्तूंच्या जतनासाठी प्रयत्न केले होते, हे यातून आपल्याला कळते. जयपूरच्या महाराजांच्या फोटोग्राफीच्या कौशल्याची कहाणीही यातच समजते. समतोल विचारांच्या मनू पिल्लई यांच्यासारख्या इतिहासकार आणि कथनकाराच्या हातात आल्यावर या कहाण्यांतील स्त्री-पुरुष आपल्याला 'तेव्हा काय होतं' हे दाखवतात आणि 'काय असू शकलं असतं' हेही सांगतात. तसं करताकरता एकीकडे ते वर्तमान काळातील चिंता आणि दृष्टिकोन यांविषयीही भाष्य करतात, हे फारच विलक्षण वाटते. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे  #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी  #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
|ग्रं|थो|पा|स|क| tweet media
MR
2
13
66
3K