Sanjay Kaudge - संजय कौडगे retweetledi

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी नवे ऑनलाईन पोर्टल सुरू
सर्वसामान्य रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या अर्ज प्रक्रियेसाठी नवीन ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आले असून, दि. ७ एप्रिल २०२६ पासून जुनी पद्धत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. यापुढे सर्व अर्ज फक्त ऑनलाईन माध्यमातूनच स्वीकारले जाणार आहेत.
रुग्णालयांनी आपला अधिकृत ई-मेल आयडी नोंदवून युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करणे तसेच E-KYC प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे.
रुग्णांना वेळेवर मदत मिळण्यासाठी संबंधितांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, जेणेकरून कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.
सर्वसामान्य नागरिकांना तत्काळ आणि सुलभ पद्धतीने मदत मिळावी यांकरिता घेतलेल्या या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि लोकाभिमुख निर्णयासाठी मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांचे मनःपूर्वक आभार.
@PMOIndia @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR
#Maharashtra #ChiefMinisterReliefFund #DigitalGovernance #HealthcareSupport #RevenueMinister #ChandrashekharBawankule

MR




















