
अजितदादांच्या अपघाती निधनानंतर झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणूकीत विक्रमी मतांनी विजयी झाल्याबद्दल सुनेत्रावहिनी पवार (@SunetraA_Pawar) यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
या निवडणुकीला दादांच्या आठवणींची किनार होती. बारामतीच्या जनतेने वहिनींना विधानसभेत पाठविताना दादांवरील आपले प्रेम प्रकट केले आहे. त्यांचे हे प्रेम आम्हा सर्वांसाठी अनमोल ठेवा आहे.
बारामतीच्या जनतेने वहिनींना विधिमंडळात पाठवून त्यांच्यासाठी काम करण्याची संधी प्रदान केली याबद्दल त्यांचे मनापासून आभार.

MR










