Eshan Chetan Tupe retweetledi
Eshan Chetan Tupe
6.7K posts

Eshan Chetan Tupe
@eshan_tupe
🇮🇳 || 🇬🇧 MSc Management, Innovation & Enterprise (Nottingham Business School, NTU.) 🎓 General Secretary, NCP Youth Wing, Pune City.
Pune, Maharashtra Katılım Ekim 2014
328 Takip Edilen1.3K Takipçiler
Eshan Chetan Tupe retweetledi

आज पहाटे सुमारे ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान हडपसर औद्योगिक वसाहतीतील मगरपट्टा सिटी परिसरात, साऊथ गेट आणि वेस्ट गेट यांच्या दरम्यान नवीन मुठा उजवा कालवा फुटल्याची घटना घडली. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर आले असून मगरपट्टा सिटी साऊथ गेट ते हडपसर–मुंढवा रस्ता या परिसरात पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. याबाबत आज विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. करोडो लिटर पाणी वाया गेले. आगामी काळात पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी करण्याचे आपल्यापुढे आव्हान असतानाच अशा प्रकारच्या घटना घडणे ही चिंतेची बाब आहे. याबाबत कुठे हलगर्जीपणा झाला याची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. दुरुस्तीचे काम अधिकारी युद्धपातळीवर करत आहेत यात दुमत नाही मात्र यामुळे बाधित झालेल्या नागरिकांना शासनाने भरपाई द्यावी.
#हडपसर #जलसंपदा
#मुठा_उजवा_कालवा
#पाणी
#विधानसभा
#आमदार_चेतन_विठ्ठल_तुपे
MR
Eshan Chetan Tupe retweetledi

आज पहाटे सुमारे ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान हडपसर औद्योगिक वसाहतीतील मगरपट्टा सिटी परिसरात, साऊथ गेट आणि वेस्ट गेट यांच्या दरम्यान नवीन मुठा उजवा कालवा फुटल्याची घटना घडली. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर आले असून मगरपट्टा सिटी साऊथ गेट ते हडपसर–मुंढवा रस्ता या परिसरात पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली.
घटनेची माहिती मिळताच मी पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधून आढावा घेतला. सकाळी साडेसहा वाजेपर्यंत खडकवासला धरणातून कालव्यात सोडण्यात येणारे पाणी पूर्णपणे बंद करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. साचलेले पाणी वाहून जाण्यास काही तास लागतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
दुपारी साडेबारा वाजता पुन्हा आढावा घेतला असता कालव्यातील पाण्याचा प्रवाह पूर्णतः बंद करण्यात आलेला असून फुटलेल्या भागाची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आल्याचे समजले. कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, ट्रॅफिक विभागाशी समन्वय साधून वाहतूक वळविण्याच्या उपाययोजना करण्यात आल्या असून परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे.
लगतच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पाहणी व आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. याबाबत मनपा हडपसर–मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त श्री. खंदारे, मनपा उपायुक्त श्री. माळी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे श्री. सोनवणे तसेच ईशान तुपे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कीर्तने बाग परिसरात पाणी साचले होते, ते जेट मशीन व पंपांच्या साहाय्याने काढण्यात आले असून स्वच्छतेचे काम सुरू आहे. बाधित नागरिकांना मदत मिळावी यासाठी प्रशासनाकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.




MR
Eshan Chetan Tupe retweetledi

#अर्थसंकल्पीय_अधिवेशन ll
उपमुख्यमंत्री #अजित_पवार यांच्या विमानाचा अपघात कसा झाला याबद्दल लोकांच्या मनात शंका असून याचं सत्य जनतेसमोर आलं पाहिजे असं आमदार @ChetanVTupe म्हणाले.
मात्र प्रशासन आणि पोलीस तपासात हलगर्जीपणा करत आहेत असा आरोप त्यांनी केला.
#MahaBudget2026

MR
Eshan Chetan Tupe retweetledi

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ऊर्जावान आणि तरुण नेतृत्व, खासदार मा. श्री. पार्थ अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्व. अजितदादांनी जपलेला दृष्टिकोन आणि विचार आपण पुढे नेत आहात, ही अभिमानाची बाब आहे. आपल्या कार्याला उत्तरोत्तर यश लाभो आणि समाजासाठी आपण अधिक प्रभावीपणे कार्यरत राहावे, हीच शुभेच्छा.
आपल्याला निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
@parthajitpawar

MR
Eshan Chetan Tupe retweetledi

विधानसभेत बोलताना हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी या नव्याने पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावाच्या विकासासाठी विशेष निधीची ठाम मागणी केली.
मांजरी हे वेगाने विकसित होणारे क्षेत्र असून येथील लोकसंख्या सुमारे दोन लाखांच्या आसपास आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत आवश्यक त्या मूलभूत सुविधा अद्याप अपुऱ्या आहेत, ही वस्तुस्थिती सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
या भागातील अनेक गल्ल्या १ किलोमीटरपर्यंत लांब असून, मोठ्या व सुसज्ज रस्त्यांची नितांत गरज आहे. त्याचबरोबर ड्रेनेज लाईनची उभारणी, वीज सुविधेची सुधारणा आणि इतर पायाभूत सुविधांसाठीही मोठ्या प्रमाणात कामे करणे आवश्यक आहे.
या सर्व विकासकामांसाठी पुरेसा आणि स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी ठोस मागणी शासनाकडे केली. मांजरी परिसराचा सर्वांगीण विकास करून नागरिकांना आवश्यक सुविधा मिळवून देण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत राहीन!
#मांजरी
#हडपसर
#पुणे_मनपा
#विकासकामे
#विधानसभा
#जनतेचा_आवाज
#उत्कृष्ट_संसदपटू
#आमदार_चेतन_विठ्ठल_तुपे
MR
Eshan Chetan Tupe retweetledi

विधानसभेत अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यांवर झालेल्या चर्चेत मी सहभाग घेतला. या चर्चेदरम्यान पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. आमचे नेतृत्व, दिवंगत आदरणीय अजितदादा पवार यांनी या गावांतील नागरिकांना मूलभूत सुविधांचा शब्द दिला होता. रस्ते, वीज, पाणी यांसारख्या आवश्यक सुविधा सक्षमपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही गावे पुणे मनपात समाविष्ट करण्यात आली.
मात्र वास्तव परिस्थिती अशी आहे की, गावे समाविष्ट होऊन बराच काळ लोटला असतानाही आजही या भागात अपेक्षित सुविधा पोहोचलेल्या नाहीत. अनेक ठिकाणी विकासाच्या योजनादेखील प्रत्यक्षात आलेल्या नाहीत. उलट या भागातील नागरिकांना पूर्वीपेक्षा जवळपास सातपट कर भरावा लागत आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. माझ्या मतदारसंघातील साडेसतरा नळी, केशवनगर आणि मांजरी या समाविष्ट गावांमधील नागरिकांनी सातत्याने या संदर्भात तक्रारी केल्या आहेत. मूलभूत सुविधा न देता वाढीव कर आकारणे हे अन्यायकारक आहे. तो कर सातपट न ठेवता दुप्पट असावा, म्हणूनच विधानसभेत मी स्पष्टपणे मागणी केली की, ज्या वेळी या भागांना पुणे शहरासारख्या सर्व सुविधा उपलब्ध होतील, त्या वेळीच वाढीव कर लागू करण्यात यावा. तसेच स्व.अजितदादा पवार यांनी या गावांतील नागरिकांना दिलेला शब्द शासनाने पूर्ण करावा आणि जनतेच्या भावनांची दखल घ्यावी.
नागरिकांच्या हक्काच्या प्रश्नांसाठी आवाज उठवत राहणे हीच आपली जबाबदारी आहे, आणि यासाठी मी कायम प्रयत्नशील राहीन.
#समाविष्ट_गावे
#पुणे_मनपा
#विधानसभा
#आमदार_चेतन_विठ्ठल_तुपे
#हडपसर_विधानसभा
MR
Eshan Chetan Tupe retweetledi

काल संध्याकाळी सिंचन विभागाकडून अचानक कालव्यात पाणी सोडण्यात आल्यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी, गोपाळपट्टी आणि घुले वस्ती परिसरात पाणी घरांमध्ये शिरले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक सरपंच अण्णा दारवटकर तसेच अजित घुले यांनी तात्काळ कळवले आणि संबंधित अधिकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले.
सध्या बाधित नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन शाळांमध्ये करण्यात आले आहे. मात्र, या सर्व कुटुंबांचे लवकरात लवकर कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावे तसेच झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावेत, यासाठी आज विधानसभेत विशेष सूचनेद्वारे अध्यक्षांकडे माझी ठाम मागणी मांडली आहे.
आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. गरिबांचे संसार उघड्यावर आले आहे त्यांना न्याय मिळावा हीच माझी आग्रही मागणी आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी, ही अपेक्षा.
#मांजरी
#कॅनॉल
#पुनर्वसन
MR
Eshan Chetan Tupe retweetledi

अहमदाबाद येथे झालेल्या T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर शानदार विजय मिळवत विश्वचषकावर आपले नाव कोरले. उत्कृष्ट फलंदाजी, भेदक गोलंदाजी आणि संघभावनेच्या जोरावर भारताने हा ऐतिहासिक विजय संपादन केला.
या दिमाखदार कामगिरीमुळे संपूर्ण देशाचा अभिमान उंचावला आहे. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
भारतीय क्रिकेटचा तिरंगा जगभरात अभिमानाने फडकत राहो, हीच शुभेच्छा. 🇮🇳🏏
#TeamIndia #T20WorldCup
#Champions #INDvsNZ
#proudmoment

MR
Eshan Chetan Tupe retweetledi

महिला आज सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत, पुढे येत आहेत, ही आश्वासक बाब आहे. संधी मिळाली की त्या खडतर आव्हानांना सामोरे जात यशस्वी होतात हे जगाने पाहिले आहे. महिला सक्षम झाल्या तरच खऱ्या अर्थाने समानतेचं पर्व सुरु होईल. त्यांच्या पंखांना बळ देऊया. जागतिक महिला दिनाच्या सर्व महिला भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा.
#InternationalWomensDay

MR
Eshan Chetan Tupe retweetledi

आपले लाडके नेते, आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पार्थिवावर ज्या भूमीत ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले त्या पवित्र जागी जाऊन आज स्वर्गीय दादांच्या प्रतिमेला फुल वाहून दादांना अभिवादन केले.
दादा, या बारामतीच्या मातीतून तुम्ही आपली कारकिर्द सुरू केली आणि एका उच्च शिखरावर नेऊन ठेवली. बारामती मध्ये आपण केलेल्या विकास कामांच्या अनेक खुणा सतत दिसत राहतात, त्यामुळे पावलोपावली आपले स्मरण होत राहते. दादा, लोकांचे प्रश्न सोडवत असताना, लोकांसाठी काम करत असताना तुमचा आदर्श कायम डोळ्यासमोर असतो. तुम्ही आमच्या स्मरणात कायमस्वरूपी असाल.
तुमचाच, चेतन



MR
Eshan Chetan Tupe retweetledi
Eshan Chetan Tupe retweetledi
Eshan Chetan Tupe retweetledi

राज्यपालांच्या अभिभाषणावर आज विधानसभेत बोलण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी महत्त्वाची आणि जबाबदारीची बाब होती. मात्र या क्षणी मनात एक भावनिक पोकळीही जाणवली. आमचे मार्गदर्शक, नेतृत्व आणि आधारवड आदरणीय अजितदादा पवार आज आपल्यात नाहीत. प्रत्येक अधिवेशनात त्यांच्या सूचनांमधून, अनुभवातून आणि दूरदृष्टीतून आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळत होती. आज त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवली. दादांच्या स्मृतींना मनःपूर्वक विनम्र अभिवादन.
राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणात महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट रोडमॅप मांडलेला दिसून आला. उद्योग, पायाभूत सुविधा, शेती, शिक्षण, आरोग्य, रोजगारनिर्मिती आणि सामाजिक न्याय या सर्व क्षेत्रांमध्ये राज्याने केलेल्या प्रगतीचे प्रतिबिंब या भाषणातून उमटले. महाराष्ट्र हे देशाच्या आर्थिक प्रगतीचे ग्रोथ इंजिन असून ही ओळख अधिक मजबूत करण्यासाठी शासनाची वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट जाणवले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राज्य विकासाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करत आहे. राज्यातील प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचवणे, संधींचे समान वितरण करणे आणि भविष्यातील सक्षम महाराष्ट्र घडवणे हा आमचा सामूहिक संकल्प आहे.
राज्याचा दरडोई उत्पन्न तिप्पट करण्याचे ध्येय, तसेच देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा १८ टक्क्यांपर्यंत नेण्याचा संकल्प ही केवळ आकडेवारी नसून राज्याच्या आर्थिक सामर्थ्याची दिशा दर्शवणारी उद्दिष्टे आहेत. या उद्दिष्टपूर्तीसाठी शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सर्वजण समन्वयाने व कटिबद्धतेने काम करत राहू, याची ग्वाही यावेळी दिली.
#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६
#विधानसभा
@Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
MR
Eshan Chetan Tupe retweetledi

आज विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या सत्रात मी बीड जिल्ह्यात ३० लाख झाडे लागवड झाल्याच्या दाव्याबाबत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. शासनाकडून या उपक्रमातील सुमारे ९० टक्के झाडे जिवंत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे.
लागवड झालेल्या झाडांची नेमकी संख्या किती, त्यामधील विविध प्रजातींचे प्रमाण काय, तसेच मोठ्या प्रमाणावर तुतीची रोपे लावण्यात आल्याच्या चर्चेबाबत स्पष्ट माहिती काय आहे, हे मी शासनाकडे विचारले. अनेक ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये वृक्षारोपणासाठी आणलेली रोपे वापराविना पडून असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या मोहिमेच्या नियोजन व अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
तसेच लागवड केलेल्या रोपांच्या संगोपनासाठी पाणी, संरक्षण व देखभालीची कोणती ठोस यंत्रणा उभारण्यात आली आहे का, संबंधित विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी व पडताळणी केली जाणार आहे का, आणि या संपूर्ण उपक्रमाची पारदर्शक माहिती जनतेसमोर मांडली जाणार का याबाबतही मी सरकारकडून उत्तर मागितले.
वृक्षलागवड ही केवळ आकडेवारीचा विषय नसून पर्यावरणाच्या भविष्याशी संबंधित जबाबदारी आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील या उपक्रमामागील संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट व्हावी आणि योग्य ती कार्यवाही व्हावी, ही माझी ठाम भूमिका आहे. यावर मंत्री मा. गणेश नाईक साहेबांनी सविस्तर उत्तर दिले. त्यांचे आभार.!
#प्रश्नोत्तरे
#वृक्षारोपण
#बीड
#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६
MR
Eshan Chetan Tupe retweetledi

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. आज विधिमंडळ परिसरात राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्यासमवेत सभागृहाच्या कामकाजासाठी उपस्थित आहे.
#अर्थसंकल्प_अधिवेशन
#मुंबई
@SunetraA_Pawar



MR
Eshan Chetan Tupe retweetledi

आमदार श्री. शेखर निकम यांची मुलगी तसेच रविंद्र शिंदे यांचा मुलगा यांच्या शुभ विवाहप्रसंगी माझ्यावतीने उपस्थित राहून माझे चिरंजीव ईशान चेतन तुपे यांनी आमच्या परिवारातर्फे शुभेच्छा दिल्या.
चिपळूण मधील सावर्डे येथील गोविंदराव निकम स्मारकामधील 'स्मृतिगंध' सभागृहात झालेल्या या सोहळ्यात वधूवरांचे अभिनंदन केले व त्यांच्या भावी वैवाहिक वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
#शुभविवाह
#शुभेच्छा
#सदिच्छा




MR
Eshan Chetan Tupe retweetledi
Eshan Chetan Tupe retweetledi

आदरणीय स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हडपसरकर मोठ्या संख्येने एकवटले होते. प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती, दादांच्या जाण्याचं दुःख अजूनही शब्दांत मांडता न येणारं आहे.
अजितदादा हे केवळ एक नेता नव्हते. ते योग्य वेळी मार्ग दाखवणारे, कठीण क्षणी आधार देणारे आणि जनतेच्या विश्वासावर अखंड उभे राहणारे लोकनेते होते. शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवणारा असा नेता आपण गमावला आहे, ही जाणीव आजही मनाला स्वीकारता येत नाही.
श्रद्धांजली सभेत उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. दादांच्या आठवणी जाग्या होत होत्या. त्यांनी घेतलेले ठाम निर्णय, जनतेसाठी झटताना दाखवलेली तळमळ आणि प्रत्येक जबाबदारीकडे पाहण्याची त्यांची भूमिका मनात पुन्हा पुन्हा उमटत होती.
ही सभा केवळ दुःख व्यक्त करण्यापुरती नव्हती. दादांनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहण्याचा, त्यांच्या विचारांना जपण्याचा आणि त्यांनी जनतेसाठी दिलेल्या योगदानाला सदैव स्मरणात ठेवण्याचा तो क्षण होता. आदरणीय दादा, तुमची उणीव कधीही भरून न निघणारी आहे. तुम्ही दिलेले विचार आणि दाखवलेली दिशा आम्हाला कायम मार्गदर्शक ठरेल.
भावपूर्ण श्रद्धांजली.
#अजितदादा
@mahancpspeaks @SunetraA_Pawar




MR
Eshan Chetan Tupe retweetledi

काल पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष कार्यालयात आदरणीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना मन भरून आले.
सामान्य कार्यकर्त्याला आपलेसे करणारे, प्रत्येकाच्या सुख-दुःखात उभे राहणारे, आधार देणारे ते नेते होते. दादा म्हणजे फक्त नेता नव्हते... कठीण काळात “आपण एकटे नाही” ही भावना देणारा आवाज होते.
त्यांच्या आठवणींनी डोळे भरून आले. ते देहरूपी उपस्थित नसले, तरी त्यांनी दिलेला आत्मविश्वास, दाखवलेला मार्ग आणि जनतेसाठी जगण्याची शिकवण नेहमी सोबत आहे. दादा गेले नाहीत…
ते विचारांत, कार्यात आणि आमच्या प्रत्येक पावलात कायम जिवंत आहेत.
भावपूर्ण श्रद्धांजली दादा!
#उपमुख्यमंत्री_कै_अजितदादा_पवार_
#भावपूर्ण_श्रद्धांजली
#नेतृत्व
#राष्ट्रवादी_काँग्रेस_पार्टी
#पुणे
#आमदार_चेतन_विठ्ठल_तुपे




MR






