Ramdas Kadam - रामदास कदम
1.8K posts

Ramdas Kadam - रामदास कदम
@iramdaskadam
Shivsena | Ex. Cabinet Minister (Environment) Govt of Maharashtra | Ex- MLC
Mumbai, India Katılım Ağustos 2016
54 Takip Edilen26.4K Takipçiler

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष आर.पी.आय. (A) मा.ना. रामदासजी आठवले साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
@RamdasAthawale

MR

सुख, समृद्धी, निरोगी आयुष्य घेऊन येवो ख्रिसमसची ही रात्र
एकत्र येऊन नाताळ सण साजरा करण्याचे निरंतर राहो हे सत्र!
नाताळ सणाच्या मंगलमय शुभेच्छा!
#MerryChristmasEveryone

MR

संत गाडगेबाबा म्हणजे समाज परिवर्तनाचे युगपुरुष. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या विचारांवर मार्गक्रमण करूया आणि समाजसेवेची प्रतिज्ञा घेऊया..
#Punyatithi #SantGadgeBaba

MR

खेड तालुक्याच्या साखरोली गावातील म्हादेवाडी येथील ग्रामस्थ व महिला मंडळाने शिवसेना पक्षप्रमुख सन्मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या नेतृत्वात आणि माझ्या मार्गदर्शनाखाली व श्री. योगेशदादा कदम यांच्यामार्फत मतदारसंघात होत असलेल्या विकास कामांनी प्रेरित होऊन स्वखुशीने शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
तसेच आम्ही समस्त ग्रामस्थ गावाच्या विकासासाठी शिवसेनेत नेहमीच कटिबद्ध राहू अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. दरम्यान सर्वांचे पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येत्या 20 तारखेला सर्वांनी श्री. योगेशदादांना धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले.
यावेळी सुरेश म्हादे, विनोद पाटील, सिताराम मुकताक, गणपत भावे, बारकू म्हादे, किसन पड्याळ, बबन तांबट, प्रभाकर चव्हाण, श्रेयस पाटील, शेवंती पाटील, अनिता म्हादे,प्रियंका बाळू म्हादे, पार्वती गोविंद मुळनाक, लक्ष्मी गंगाराम मुळनाक,आनंदी हरी पाटील, शेवंती हरी म्हादे, विद्या विनोद पाटील, दिशा उमेश मुळनाक, दिशा उमेश मुळनाक, मीनाक्षी अरविंद भावे, प्रतिभा प्रभाकर चव्हाण,रवीना रामचंद्र पाटील, शेवंती म्हादे आदींनी प्रवेश केला.


MR

मांडवे बौद्धवाडी येथील उबाठा गटातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सचिन तांबे, बबन तांबे, अनंत पवार, राकेश पवार, प्रमोद सावंत आणि प्रदीप सावंत आदींनी प्रवेश केला. दरम्यान सर्वांशी संवाद साधला आणि निष्ठेने व जोमाने यापुढे सर्वांनी एकत्र मिळून काम करूया व आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना महायुतीचे उमेदवार श्री. योगेश कदम यांना साथ देऊन पुन्हा एकदा दापोली विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवून विकासाची वाटचाल करूया असे आवाहन केले.

MR

केलंय काम भारी..
आता पुढची तयारी..
@mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @Shivsenaofc @BJP4Maharashtra @mahancpspeaks


MR

आज दापोली तालुक्यातील आसूद वडाची वाडी येथील ग्रामस्थांनी माझ्या उपस्थितीत उबाठा गटामधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी सर्वांचे पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दरम्यान सर्वांशी संवाद साधून योग्य ते मार्गदर्शन केले व आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. योगेश कदम यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी आपले बहुमूल्य योगदान द्यावे असे आवाहन केले. यावेळी उपस्थित सर्वांनी शिवसेना आणि योगेश कदम यांच्या नावाच्या घोषणा दिल्या आणि प्रचंड मतांनी योगेश दादांना निवडून आणत दापोली मतदारसंघावर भगवा फडकवू असे स्पष्ट केले.


MR

आज खेड तालुक्यातील चाकाळे येथील सहारा मैत्री ग्रुप, जगदीशनगर येथील ग्रामस्थ व महिला मंडळाने शिवसेना पक्षप्रमुख सन्मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये तसेच माझ्या मार्गदर्शनामध्ये आणि श्री. योगेश कदम यांच्यामार्फत मतदारसंघामध्ये होत असलेल्या विकासकामांनी प्रेरित होऊन स्वखुशीने उबाठा गटामधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी संदिप जाधव, विजय भातोषे, संदेश कदम, संतोष सकपाळ, बाळकृष्ण चव्हाण, मनीष कदम, शिवराज कदम, समीर चाळके, नंदकुमार चव्हाण, मुरलीधर कदम, विराज जाधव, विघ्नेश भातोषे महिला महिला मंडळातील शुभांगी भातोषे, सुजाता कदम, शर्मिला कदम, नम्रता चाळके, सोनाली कदम, निकिता चव्हाण, अक्षता जाधव, पवित्रा भातोषे, पुष्पा कदम, गुलाब कदम, कविता सकपाळ, सानिका सकपाळ आदींनी प्रवेश केला.
यावेळी प्रवेशकर्त्यांनी गावाच्या विकासासाठी सदैव शिवसेनेत राहून आपले योगदान देऊ असे स्पष्ट केले. दरम्यान सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले आणि योग्य ते मार्गदर्शन करून आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना महायुतीचे उमेदवार श्री. योगेश कदम यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.


MR

आज उबाठा गटाचे खेड शहर प्रमुख श्री. दर्शन महाजन यांनी जामगे येथे शिवसेना नेते आदरणीय श्री. रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
याप्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख श्री. कुंदन सातपुते, जिल्हाप्रमुख श्री. शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख श्री. सचिन धाडवे, माजी सभापती श्री. अरुण कदम, शहरातील पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक श्री. संजय मोदी, श्री. राजेश बुटाला, श्री. मिनार चिखले, श्री. सतीश चिकणे, महिला आघाडी प्रमुख सौ. माधवी बुटाला यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्री. रामदासभाई कदम यांनी श्री. दर्शन महाजन यांचे शिवसेनेत स्वागत करून पक्ष बळकटी करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. तसेच त्यांना पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.
दरम्यान उपस्थितांनी देखील जोरदार घोषणाबाजी करत आगामी निवडणुकीत दापोली विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा भगवाच फडकावण्याचा संकल्प केला. तसेच या दरम्यान मतदारसंघातील माझे काम पाहून प्रभावित झालेल्या असंख्य तरुणांना शिवसेनेत घेऊन येणार असल्याचे आश्वासन श्री. दर्शन महाजन यांनी दिले.


MR










