Nainesh Pravin Shah retweetledi

चारकोप सेक्टर ८ येथे सुरू असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या कोस्टल रोडवरून पोईसर चर्चपर्यंत एलिव्हेटेड रोड तसेच नवीन ब्रिज उभारण्यात येणार असून त्याद्वारे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ला बोरिवली पूर्वेतील ९० फिट रोडशी जोडले जाणार आहे.
या नव्या प्रकल्पामुळे सध्याच्या जनरल करिअप्पा ब्रिजला समांतर पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असून पूर्व-पश्चिम रहदारी अधिक जलद आणि सुकर होईल. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरणार आहे.
महापालिकेचे सहायक आयुक्त श्री. प्रफुल्ल तांबे आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत या कामाची प्राथमिक पाहणी आणि चाचपणी करण्यात आली. पुढील ४ वर्षांत हा पर्यायी मार्ग बोरिवलीकरांसाठी मोठा दिलासा ठरेल.
या परिसरात वारंवार होणारे अपघात लक्षात घेता ओव्हरब्रिज किंवा सबवे उभारणीसंदर्भातही प्राथमिक पाहणी करण्यात आली असून लिंक रोड सुरक्षितपणे ओलांडण्यासाठी किमान ३ ठिकाणी पादचारी मार्गाचे प्रस्ताव देण्यात आले आहेत.
#SanjayUpadhyay #Borivali #BJP #Development #Infrastructure #CoastalRoad #SiteInspection
MR
































