CEO ZP Pune

10.4K posts

CEO ZP Pune banner
CEO ZP Pune

CEO ZP Pune

@PuneZp

Katılım Ocak 2020
0 Takip Edilen11.6K Takipçiler
CEO ZP Pune
CEO ZP Pune@PuneZp·
📍कान्हे (ता.मावळ) विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी मावळ तालुक्यातील कान्हे येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या सामुदायिक बायोगॅस व सेंद्रिय खत प्रकल्पास भेट दिली. घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छ ऊर्जा निर्मितीच्या प्रशासनाने राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, श्री. गजानन पाटील यांनी कौतुक केले.
CEO ZP Pune tweet mediaCEO ZP Pune tweet mediaCEO ZP Pune tweet mediaCEO ZP Pune tweet media
MR
0
0
1
128
CEO ZP Pune
CEO ZP Pune@PuneZp·
विद्यार्थ्यांच्या भविष्याला कौशल्याचे बळ ! पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच विविध कौशल्य आत्मसात व्हावेत यासाठी जिल्हा परिषद प्रशासन मुख्यत्वे प्रयत्नशील आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये "स्किल लॅब्स" निर्माण करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात १०० शाळांमध्ये स्किल लॅब्सची निर्मिती सुरू आहे. या माध्यमातून इयत्ता ६ वी ते ८ वी वर्गातील जवळपास १५००० विद्यार्थ्यांना कौशल्य व अनुभवावर आधारित शिक्षण मिळणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी रोजगारक्षम व्हावेत हेच या धोरणाचे मुख्य ध्येय आहे.
CEO ZP Pune tweet media
MR
0
1
5
204
CEO ZP Pune
CEO ZP Pune@PuneZp·
कॉफी तर मला खूप आवडते... आणि माझी शाळाही 😃 विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या "कॉफी विथ विभागीय आयुक्त आणि सीईओ" या कार्यक्रमाच्या माध्यमातून विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. पिंपळगाव तर्फे महाळुंगे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता ५ वीच्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकल्या कु. सृष्टी मनोजकुमार सरदार हिने अतिशय गोड भाषेत आपले मनोगत व्यक्त केले.
MR
0
1
15
1.7K
CEO ZP Pune
CEO ZP Pune@PuneZp·
📍 पुणे जिल्हा परिषद | महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आज जिल्हा परिषद पुणे येथे माननीय अध्यक्ष श्री. वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री. विवेक वळसे पाटील, जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समिती सभापती श्रीमती दिपाली हुलावळे, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती अंकिता पाटील, समाज कल्याण सभापती श्री. जितेंद्र बडेकर, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती श्री. अमोल नलावडे, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चंद्रकांत वाघमारे, सर्व खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पित सेवा, पारदर्शक प्रशासन आणि ग्रामविकासाचा निर्धार यावेळी दृढ करण्यात आला. #महाराष्ट्रदिन #PuneZP
CEO ZP Pune tweet mediaCEO ZP Pune tweet mediaCEO ZP Pune tweet mediaCEO ZP Pune tweet media
MR
0
0
4
196
CEO ZP Pune
CEO ZP Pune@PuneZp·
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! समृद्ध, सक्षम आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी जिल्हा परिषद पुणे सदैव कार्यरत. चला, विकासाच्या या प्रवासात सहभागी होऊया! #महाराष्ट्रदिन #PuneZP
CEO ZP Pune tweet media
MR
0
0
2
109
CEO ZP Pune
CEO ZP Pune@PuneZp·
पुणे जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेला आधुनिक रूप देणारी भागीदारी ! विद्यार्थ्यांना कौशल्याधारित व अनुभवाधारित शिक्षण देण्याच्या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेत ‘स्किल लॅब’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामध्ये Advik Hi-Tech यांच्या सहकार्याने पुढील तीन वर्षांत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये 100 स्किल लॅब उभारण्यात येणार आहेत. याबाबत आज जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री. विवेक वळसे पाटील यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. हा उपक्रम National Education Policy 2020 च्या तत्त्वांशी सुसंगत असा, शालेय शिक्षणामध्ये कौशल्याधारित शिक्षण समाविष्ट करण्याचा एक प्रयत्न आहे. “पुणे जिल्हा परिषद प्रशासनाकडून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ला अनुसरून कौशल्याधारित शिक्षणावर विशेष भर देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता प्रत्यक्ष कामाचा अनुभव देणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच इयत्ता ६ वी पासून विद्यार्थ्यांना Skill Based शिक्षण देण्यासाठी, यात किमान ५०% विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी पुणे जिल्हा परिषद प्रशासन प्रयत्नशील आहे. ‘स्किल लॅब’ उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगारक्षम कौशल्ये आत्मसात करण्याची मोठी संधी मिळेल.” अशी भावना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. हा सामंजस्य करार करतेवेळी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री. विवेक वळसे पाटील, सदस्य श्रीमती प्राजक्ता दुर्गाडे, Advik Hi-Teck चे व्यवस्थापकीय संचालक श्री. आदित्य भारतीय उपस्थित होते.
CEO ZP Pune tweet mediaCEO ZP Pune tweet media
MR
1
0
4
112
CEO ZP Pune
CEO ZP Pune@PuneZp·
📍 कौन्सिल हॉल, पुणे : कॉफी विथ विभागीय आयुक्त व सीईओ ! पुणे जिल्हा परिषद व ओपन लिंक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "कॉफी विथ विभागीय आयुक्त व सीईओ" या कार्यक्रमाच्या माध्यमातून विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कारही करण्यात आला. या संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अतिशय मुक्तपणे अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्तम शिक्षणाबद्दल सर्वच विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चंद्रकांत वाघमारे, ओपन लिंक फाउंडेशनच्या राज्य समन्वयक आदिती वाकलकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
CEO ZP Pune tweet mediaCEO ZP Pune tweet media
MR
0
0
3
178
CEO ZP Pune
CEO ZP Pune@PuneZp·
📍 यशदा (पुणे) : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन ! सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य पदी निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचे ३ दिवसीय प्रशिक्षण शिबिर यशदा (पुणे) येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबिराच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी उपस्थित सर्व सदस्यांना "जिल्हा परिषदेकडे नाविन्यपूर्ण योजना व योजनांची अंमलबजावणी" या विषयावर मार्गदर्शन केले. पुणे जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था व आरोग्यवस्था भक्कम करण्यासाठी, एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी, प्रत्येक गावात स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी, घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी विविध योजना व उपक्रम राबवले जातात. सर्व नवनिर्वाचित सदस्यांमार्फत या योजना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचतील हा विश्वास श्री. गजानन पाटील यांनी व्यक्त केला.
CEO ZP Pune tweet mediaCEO ZP Pune tweet mediaCEO ZP Pune tweet mediaCEO ZP Pune tweet media
MR
1
0
3
134
CEO ZP Pune
CEO ZP Pune@PuneZp·
📍 यशदा (पुणे) : जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचे प्रशिक्षण शिबिर ! पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी निवड झालेल्या सर्व नवनियुक्त सदस्यांसाठी यशदा, पुणे येथे ३ दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री श्री. जयकुमार गोरे यांच्या हस्ते या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. वीरधवल जगदाळे, यशदाचे महासंचालक श्री. सुहास दिवसे, श्री. शेखर गायकवाड, श्री. मल्लिनाथ कलशेट्टी, राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानाचे संचालक श्री. गिरीश भालेराव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक श्रीमती शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. श्रीकांत खरात यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. @Jaykumar_Gore @gajananpatilIAS
CEO ZP Pune tweet mediaCEO ZP Pune tweet mediaCEO ZP Pune tweet mediaCEO ZP Pune tweet media
MR
0
0
1
152
CEO ZP Pune
CEO ZP Pune@PuneZp·
📍वडगाव आनंद (ता. जुन्नर) पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद येथे ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत क्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा त्यांनी आढावा घेतला. तसेच, ग्रामपंचायतच्या माध्यमातून नागरिकांना मिळणाऱ्या विविध सेवांचाही आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
CEO ZP Pune tweet mediaCEO ZP Pune tweet mediaCEO ZP Pune tweet mediaCEO ZP Pune tweet media
MR
0
0
3
224
CEO ZP Pune
CEO ZP Pune@PuneZp·
📍 वडगाव आनंद (ता. जुन्नर) पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भेट दिली. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहात स्वागत केले. श्री. गजानन पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत विद्यार्थी व शिक्षकांसोबत संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाळेत उपलब्ध असलेल्या सुविधा, स्वच्छतेच्या सुविधा इत्यादी बाबींचा आढावा घेत त्यांनी शिक्षकांना आवश्यक सूचना दिल्या.
CEO ZP Pune tweet media
MR
0
0
0
154
CEO ZP Pune
CEO ZP Pune@PuneZp·
📍ओतूर (ता.जुन्नर) पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट देऊन पाहणी केली. शाळेची व शाळेच्या परिसराची स्वच्छता, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा इत्यादी बाबींचा आढावा त्यांनी घेतला. श्री. गजानन पाटील यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत व शिक्षकांसोबत संवाद साधला. विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी संबंधित शिक्षकांना आवश्यक सूचना दिल्या. @gajananpatilIAS
CEO ZP Pune tweet mediaCEO ZP Pune tweet mediaCEO ZP Pune tweet mediaCEO ZP Pune tweet media
MR
0
0
0
126
CEO ZP Pune
CEO ZP Pune@PuneZp·
देशाच्या विकासाचा राजमार्ग.. "ग्रामविकास" ! राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी "ग्राम स्वराज" ही संकल्पना मांडून देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रत्येक गावाला स्वयंपूर्ण बनवण्याचा संदेश दिला. हा संदेश जपत पुणे जिल्ह्यातील प्रत्येक गावाला शिक्षण, कृषी, उद्योग, रोजगार अशा बाबतींत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी, प्रत्येक गावाचा सर्वांगीण व संतुलित विकास साधण्यासाठी पुणे जिल्हा परिषद प्रशासन कटिबद्ध आहे ! #राष्ट्रीय_पंचायतराज_दिन
CEO ZP Pune tweet media
MR
0
0
1
63
CEO ZP Pune
CEO ZP Pune@PuneZp·
राष्ट्रीय पोषण पंधरवडा : जिल्हा परिषद प्रशासनाची उज्वल कामगिरी ! संपूर्ण देशात राबवण्यात आलेल्या "राष्ट्रीय पोषण पंधरवडा" या उपक्रमात पुणे जिल्हा परिषद प्रशासनाने अतिशय उज्ज्वल कामगिरी केली. या कामगिरीच्या बळावर पुणे जिल्हा देशात द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. मशाल फेरी, पाककृती स्पर्धा, पोषण रॅली, माता बालक आरोग्य मार्गदर्शन शिबिर, आहार प्रात्यक्षिके, गृहभेटी अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषद प्रशासनाने राष्ट्रीय पोषण पंधरवडा साजरा केला. या उपक्रमाला जिल्ह्यातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत सहभाग घेतला. @gajananpatilIAS
CEO ZP Pune tweet media
MR
1
0
1
72
CEO ZP Pune
CEO ZP Pune@PuneZp·
सृष्टीला आकार देणारी पृथ्वी म्हणजे मानवासह सर्वच जीवांच्या जगण्याचा, अस्तित्वाचा आधार आहे. सृष्टीचा हा आधार अधिक संपन्न करण्यासाठी, वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन, जलस्रोतांचे संवर्धन, सांडपाणी प्रक्रिया अशा विविध माध्यमांतून वसुंधरेचे स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी पुणे जिल्हा परिषद प्रशासन कटिबद्ध आहे, या प्रयत्नांत आपणही सक्रियपणे सहभागी व्हावे ही विनंती !
CEO ZP Pune tweet media
MR
0
0
3
103
CEO ZP Pune
CEO ZP Pune@PuneZp·
📍 भरणेवाडी (ता.इंदापूर) : STEM लॅबचे उद्घाटन ! इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत STEM (Science, Technology, Engineering, Mathematics) लॅबची निर्मिती करण्यात आली आहे. "पुणे मॉडेल स्कूल" या पुणे जिल्हा परिषदेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत या लॅबची निर्मिती करण्यात आली आहे. STEM लॅबच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणिताचे उत्तम विज्ञान मिळावे हा या उपक्रमाचा हेतू आहे. या लॅबच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे कृषिमंत्री श्री. दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. वीरधव जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
CEO ZP Pune tweet mediaCEO ZP Pune tweet media
MR
0
1
2
175
CEO ZP Pune
CEO ZP Pune@PuneZp·
📍 विद्यार्थिनींच्या शिक्षणाला सायकलचे बळ ! विद्यार्थिनींचे शिक्षण थांबू नये या ध्येयाने पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने "सायकल बँक" ही अभिनव योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत आज इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे १५०० विद्यार्थिनींना मोफत सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी राज्याचे कृषिमंत्री श्री. दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. वीरधवल जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. @bharanemamaNCP @gajananpatilIAS
CEO ZP Pune tweet media
MR
0
1
2
139
CEO ZP Pune
CEO ZP Pune@PuneZp·
📍 लासूर्णे (ता. इंदापूर) पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील लासूर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांची, स्वच्छतेची, उपलब्ध औषधे व लसींच्या साठ्याची पाहणी केली. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून पंचक्रोशीतील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळत असल्याबद्दल संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांचे श्री. गजानन पाटील यांनी कौतुक केले. तसेच, अधिक लोकाभिमुख सेवा देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
CEO ZP Pune tweet mediaCEO ZP Pune tweet mediaCEO ZP Pune tweet media
MR
0
0
3
188
CEO ZP Pune
CEO ZP Pune@PuneZp·
📍 सणसर (ता. इंदापूर) पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील सणसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांची, स्वच्छतेची, उपलब्ध औषधे व लसींच्या साठ्याची पाहणी केली. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून पंचक्रोशीतील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळत असल्याबद्दल संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांचे श्री. गजानन पाटील यांनी कौतुक केले. तसेच, अधिक लोकाभिमुख सेवा देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. @gajananpatilIAS
CEO ZP Pune tweet mediaCEO ZP Pune tweet mediaCEO ZP Pune tweet mediaCEO ZP Pune tweet media
MR
0
1
3
206