Uday Samant
8.6K posts

Uday Samant
@samant_uday
Cabinet Minister for Industries & Marathi Language, Government of Maharashtra | Deputy Leader, Shiv Sena | MLA, Ratnagiri-Sangameshwar Constituency
Mumbai Katılım Temmuz 2019
39 Takip Edilen351.8K Takipçiler

लेखक श्री. राजू बाविस्कर यांच्या “काळ्यानिळ्या रेषा” या आत्मकथेला वर्ष २०२५ साठीचा प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे, ही अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे.
आपल्या जीवनातील वास्तववादी संघर्ष लेखकाने या साहित्य कृतीतून अतिशय प्रभावीरीत्या चितारला आहे.
प्रतिभावान लेखक राजू बाविस्कर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी खूप शुभेच्छा ...!

MR

शिवसेना सांगली जिल्हा समन्वयक, संघटक श्री.गौरवजी नायकवडी यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन व नागरी सत्कार सोहळा शुक्रवार, दिनांक १३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजता हुतात्मा चौक, वाळवा येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला उपस्थित राहून श्री.गौरवजी नायकवडी यांचे अभीष्टचिंतन केले. नागरी सत्कार सोहळ्यात नुकत्याच झालेल्या वाळवा व बावची जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा मान्यवरांसह सत्कार करुन, त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.
या सोहळ्याला शिराळा नगराध्यक्ष श्री.पृथ्वीसिंग नाईक, सहसंपर्क प्रमुख श्री.रावसाहेब घेवारे, जिल्हाप्रमुख श्री.आनंदराव बापू पवार, जिल्हाप्रमुख श्री. संजय बापू विभूते, जिल्हाप्रमुख श्री.बजरंग पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.भीमराव माने, शांतिनिकेतन विद्यापीठाचे अध्यक्ष श्री.गौतम पाटील, वाळवा सरपंच श्री.संदेश कांबे, जिल्हा परिषद सदस्य श्री.संताजी मेटकरी, तालुकाप्रमुख श्री.नंदकिशोर नीळकंठ, उपजिल्हाप्रमुख श्री.प्रदीपकाका माने, युवासेना जिल्हा प्रमुख श्री.ऋषिकेश पाटील यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व नवनिर्वाचित सदस्य, सांगली जिल्हा शिवसेनेचे पदाधिकारी, नागरिक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#sangali #sangalikar




MR

प्रशासकीय कामाच्या व्यापातून विरंगुळा मिळावा आणि कर्मचारी-पदाधिकाऱ्यांमधील समन्वय वाढावा या उद्देशाने दरवर्षी होणारे जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी व कर्मचा-यांचे दोन दिवसीय ३० वे वार्षिक स्नेहसंमेलन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिषद भवन, रत्नागिरी येथे झाले. आज दोन दिवसीय कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळांच्या स्पर्धांच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला उपस्थित राहून, विजेत्यांना पारितोषिक प्रदान करुन, त्यांचे अभिनंदन केले.
या सोहळ्याला व्यासपीठावर जिल्हाधिकारी श्री.मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.परीक्षित यादव, जिल्हापरिषद सदस्य विलास चाळके, महेश उर्फ बाबू म्हाप, प्रकाश रसाळ, गुहागर सभापती प्रणव पोळेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुका प्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.




MR

ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित मराठी साहित्यातील अग्रगण्य कवी, लेखक आणि नाटककार विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !
आपल्या प्रभावी लेखणीच्या सामर्थ्याने त्यांनी मराठी साहित्याला नवे वैभव प्राप्त करून दिले आणि मराठी भाषेचा सन्मान जगभर वाढवला. त्यांच्या कविता, नाटके आणि साहित्यकृती आजही समाजाला प्रेरणा देणाऱ्या आहेत. त्यांचे विचार आणि साहित्य पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहतील.
#कुसुमाग्रज
#मराठीभाषा
#मराठी

MR

मेळघाट संघर्ष यात्रेच्या निमित्ताने मेळघाटातील आरोग्य, पाणी पुरवठा आणि इतर समस्या प्रामुख्याने समोर आल्या आहे. शासन स्तरावरून या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. या सर्व उपाययोजना तातडीने अंमलात आणण्यात याव्यात, यासाठी येत्या आठवड्यात बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन मेळघाट संघर्ष यात्रेच्या समारोप प्रसंगी दिले.
बच्चू कडू यांच्या नेतृत्वात कर्जमुक्ती आठवण व मेळघाट संघर्ष यात्रेचा समारोप आज चिखलदरा येथे करण्यात आला. या यात्रेच्या निमित्ताने आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या समवेत भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून आंदोलकांशी संवाद साधला. मेळघाटमधील प्रश्नांची जाण असून येत्या काळात विशेष बैठक बोलविण्यात येईल. यामध्ये आरोग्य, पाणीपुरवठा, सिडको, स्कायवॉक आदी सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात येईल. यात धोरणात्मक अडचण निर्माण झाल्यास मुख्यमंत्र्यांकडेही दाद मागण्यात येईल. सध्या शेतकऱ्यांचे सरकार असून शेतकऱ्यांना न्याय मागण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. सरकारकडून सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी दिले.
राज्य शासनाने दोन लाख रुपयांची केलेली कर्जमुक्ती ही बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे झाली आहे. कर्जमुक्तीचा निर्णय आंदोलनामुळे झाला आहे. या कर्जमुक्तीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठपुरावा करून 30 जूनपर्यंत अहवाल घेतला आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केल्याने कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. पदयात्रेच्या निमित्ताने आदिवासींचे विविध प्रश्न समोर आले आहे. या सर्व प्रश्नांची दखल शासनाने घेतली असून यानंतर याबाबीसाठी पुन्हा आंदोलन करावे लागणार नाही. शासनाच्या योजना राबवताना त्रुटी आढळल्यास यात लक्ष घालून त्याची पूर्तता येत्या काळात करण्यात येईल.
मंत्री प्रकाश आबिटकर यांनी चुरणी येथील उपजिल्हा रुग्णालय आणि 30 खाटांवरून 50 खाटांचे रुग्णालय करण्यासंदर्भात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. त्यासोबतच या ठिकाणी सेवा देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी स्वतंत्र बजेट देण्यात येईल. राज्य शासनाने सिकलसेलमुक्त अभियान हाती घेतले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने तपासणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. आंदोलनाच्या निमित्ताने मेळघाटातील विविध समस्या समोर आल्या आहेत. या समस्यांवर योग्य उपाययोजना करून कार्यवाही करण्यात येईल.
यावेळी बच्चू कडू यांनी चिखलदरा आणि मेळघाट परिसरातील विविध समस्यांची माहिती माहिती दिली.




MR

जिंदाल स्टीलचे अध्यक्ष आणि ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीचे संस्थापक कुलगुरु उद्योगपती नवीन जिंदल आज आपला जन्मदिवस. त्यानिमित्त आपले मनःपूर्वक अभीष्टचिंतन!
@naveenjindalbjp

MR

🇮🇳 टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय!
टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा तब्बल ९६ धावांनी पराभव करत तिसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले.
भारतीय खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, संघभावना आणि उत्कृष्ट खेळ यामुळे भारताच्या क्रीडा इतिहासात आणखी एक सुवर्णपान जोडले गेले आहे.
फलंदाजीत संजू सॅमसन ,अभिषेक शर्मा, आणि ईशान किशन यांनी खेळलेली धडाकेबाज आणि संयमी खेळी संघासाठी अत्यंत मोलाची ठरली. तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी अचूक आणि भेदक गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाला जखडून ठेवले. त्यांच्या कामगिरीमुळे भारताच्या विजयाचा पाया अधिक भक्कम झाला.
विश्वचषकावर तिसऱ्यांदा नाव कोरत भारताने जागतिक क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे. या दिमाखदार विजयाबद्दल भारतीय संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि देशातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीचे मनःपूर्वक अभिनंदन!
हा विजय प्रत्येक देशवासीयाच्या अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. १४० कोटी भारतीयांच्या स्वप्नांना आणि विश्वासाला आज या विजयानं नवी उंची दिली आहे.
देशासाठी हा खरोखरच अभिमानाचा सुवर्णक्षण आहे! 🇮🇳🏏
#T20WorldCup2026final
#T20WorldCup26




MR

तेलंगणाचे राज्यपाल मा. जिष्णू देव वर्मा जी यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
प्रशासकीय अनुभव, समृद्ध राजकीय कारकीर्द आणि कला-साहित्याची जाण यांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो.
त्रिपुरा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. राजकारणासोबतच कला, क्रीडा आणि साहित्य क्षेत्राशी असलेले त्यांचे नाते विशेष उल्लेखनीय आहे. कवी आणि लेखक म्हणून साहित्यविश्वात त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून क्रीडा क्षेत्रातही त्यांनी विविध संघटनांमध्ये नेतृत्व केले आहे.
महाराष्ट्रासारख्या सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या राज्याला त्यांच्या अनुभव समृद्ध मार्गदर्शनाचा निश्चितच लाभ होईल. सामाजिक, शैक्षणिक आणि विकासाच्या विविध उपक्रमांना नवसंजीवनी मिळेल तसेच केंद्र आणि राज्य यांच्यातील समन्वय अधिक बळकट होईल, असा विश्वास आहे.
नवीन जबाबदारी स्वीकारल्याबद्दल मा. जिष्णू देव वर्मा जी यांचे पुनश्च मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या यशस्वी, प्रभावी आणि जनहितकारी कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा.
#Maharashtra #Governor #JishnuDevVarma #LokBhavanMaharashtra
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @Jishnu_Devvarma

MR

माझे विधिमंडळातील सहकारी शालेय शिक्षणमंत्री श्री.दादाजी भुसे आज आपला जन्मदिवस. त्यानिमित्त आपले हार्दिक अभीष्टचिंतन!
@dadajibhuse

MR









