राज्यातील शेतकऱ्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमत्ता (एआय) सारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर गरजेचा आहे. कृषी हॅकाथॉनच्या माध्यमातून राज्यातील युवा संशोधक, स्टार्टअप्स, कृषितज्ज्ञ आणि शेतकरी बांधवांना एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतीसंबंधी समस्या सोडवण्याचा प्रयत्न खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या, संस्थांच्या मदतीनं शासन स्तरावर करण्यात येणार आहे. या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल. कृषी हॅकॅथॉन स्पर्धेच्या माध्यमातून नवकल्पक संशोधकांना संधी देण्याबरोबरच राज्यातील कृषी क्षेत्राला प्रगतीची आश्वासक दिशा मिळेल, असा विश्वास आहे.
देशातील पहिल्या ॲग्री हॅकथॉन स्पर्धेच्या नियोजनाबाबत बैठक पार पडली. याचबरोबर स्मार्ट हार्वेस्टिंग सोल्यूशन्स या तंत्रज्ञानाचं सादरीकरण देखील करण्यात आलं. त्यासंबंधित अधिकाऱ्यांकडून आवश्यक ती माहिती जाणून घेतली.
आ.श्री. राजेश विटेकर आणि श्री. चंद्रकांत दायमा यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. पक्ष भक्कम करण्यात सगळेजण प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य निभावतील, असा विश्वास व्यक्त करतो.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साप्ताहिक आढावा बैठक आज मान्यवर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी प्रत्येकाच्या मतदासंघातील विकास कामांची माहिती जाणून घेतली. त्याचप्रमाणे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील आवश्यक त्या मुद्द्यांवर मार्गदर्शन केलं.
📍देवगिरी, मुंबई
@mahancpspeaks#NCP#Maharashtra
उत्कृष्ट प्रशासक,कुशल रणनीतीकार तसेच केलेल्या नियोजनाची अचूकपणे अंमलबजावणी करणारे युवा नेतृत्व पार्थदादा पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर पडद्यामागून संपूर्ण संघटनात्मक जबाबदारी पार्थदादांनी आपल्या खांद्यावर घेतली.
(१)