
मालकाला अलगद बाजूला सारून जेंव्हा बटाईदारंच जमिनीचा 7/12 स्वतःच्या नावे करतो, याचं जिवंत उदाहरण.. जे आम्ही वारंवार बोलतोय..
future PM Digaa
12.9K posts

@Digambar373
( फुले शाहू आंबेडकर वी. रा. शिंदे सदावर्ते साहेबांच्या विचाराचा पाईक.) AAP MH23 ( जिंकल्यावर शांत राहायला जमले की आयुष्याचा उत्सव होतो ) preparing for UPSC

मालकाला अलगद बाजूला सारून जेंव्हा बटाईदारंच जमिनीचा 7/12 स्वतःच्या नावे करतो, याचं जिवंत उदाहरण.. जे आम्ही वारंवार बोलतोय..


We stand with Vitthal Kangne Sir जो सरकारचा खरा चेहरा समोर आणेल, त्याचा आवाज दाबला जाईल भाजप सरकारवर टीका करणारे, सुधारणा सुचवणारे आणि सत्य परिस्थिती मांडणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक विठ्ठल कांगणे सर यांचे इंस्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल परखड मत मांडणे आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम ते करत आहेत. तरीही त्यांचे सोशल मीडिया अकाउंट सरकारकडून बंद करण्यात येत आहे इतकी भीती भाजप सरकारला कशाची वाटते? यापूर्वी पुलकित मणी या कॉमेडियनने एक रील बनवली होती, तीही सरकारने हटवली. विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले प्रा. विठ्ठल कांगणे सर यांचे इंस्टाग्राम खाते सरकारकडून बंद करण्यात आले. भोंदू अशोक खरात प्रकरणी प्रा. कांगणे सरांनी सरकारची पोलखोल करणारा व्हिडीओ बनवला होता. त्या कारणावरून त्यांचे सोशल मीडिया खाते बंद करण्यात आले समजले आहे. महाराष्ट्र सरकारने आपलं अपयश लपवण्यासाठी सोशल मीडियावरील खाते बंद करून होणार नाही, खरात प्रकरणात अडकलेल्या सरकार, प्रशासनातील मोठ्या लोकांना गजाआड करावे. सरकारच्या ह्या मुस्कटदाबीचा मी जाहीरपणे निषेध व्यक्त करतो. सरकारच्या ह्या हुकूमशाही विरोधात प्रा. विठ्ठल कांगणे सरांसोबत आहोत.















