PHD Maha Health IEC Official

277 posts

PHD Maha Health IEC Official banner
PHD Maha Health IEC Official

PHD Maha Health IEC Official

@PHDMahaHealth

Official X Handle of State Health Information, Education and Communication Bureau Pune

Arogya Bhavan, Pune เข้าร่วม Ocak 2026
1 กำลังติดตาม23 ผู้ติดตาม
PHD Maha Health IEC Official
जागतिक होमिओपॅथी दिन शाश्वत आरोग्यासाठी होमिओपॅथी - नैसर्गिक उपचार, सुरक्षित परिणाम आणि संपूर्ण आरोग्याचा मार्ग #WorldHomeopathyDay #HealthForAll #PublicHealth
PHD Maha Health IEC Official tweet media
MR
0
1
1
7
PHD Maha Health IEC Official
बालकांच्या असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण व मानसिक आरोग्य बळकटीसाठी महत्त्वपूर्ण करार #मुंबई, दि. ८ : राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (एमओयू) केले आहेत. बालकांमधील असंसर्गजन्य आजारांवर (एनसीडी) नियंत्रण तसेच मानसिक आरोग्य क्षेत्रात समुदायाधारित सेवा बळकट करण्यासाठी हे करार करण्यात आले. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक डॉ. कादंबरी बलकवडे, उपसचिव विलास बेंद्रे तसेच एम्स, नागपूर आणि एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ, पुणेचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. पहिला करार एम्स, नागपूर बालरोग विभागासोबत करण्यात आला असून, राज्यातील जिल्हा रुग्णालयांमध्ये चाइल्डहुड एनसीडी क्लिनिक्स स्थापन व कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या उपक्रमातून टाईप-१ मधुमेह, जन्मजात हृदयरोग, दमा, स्थूलता, सिकलसेल, मानसिक आरोग्य आणि विकासात्मक विकार यांसारख्या आजारांचे प्रतिबंध, लवकर निदान आणि प्रभावी उपचार सुनिश्चित करण्यात येणार आहेत. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मानकीकृत उपचार पद्धती, डेटा संकलन प्रणाली आणि तज्ज्ञ मार्गदर्शन यावर विशेष भर दिला जाणार आहे. डॉ प्रशांत जोशी, एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक, डॉ मीनाक्षी गिरीश, बालरोग प्रमुख यावेळी उपस्थित होते. दुसरा करार एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ, पुणे यांच्यासोबत करण्यात आला असून, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये केअरगिव्हर-लेड सेल्फ हेल्प ग्रुप्स (एसएचजी)च्या माध्यमातून मानसिक आरोग्य सेवा अधिक व्यापक करण्याचा उद्देश आहे. ऑफलाइन आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना आधार देणे, जनजागृती वाढवणे आणि मानसिक आजारांबाबतचा कलंक कमी करणे यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम (डीएमएचपी) सोबत समन्वय साधून राबवला जाणार आहे. एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थचे संस्थापक-संचालक, डॉ. प्रा. अनिल वर्तक, उपाध्यक्ष प्राची बर्वे, सचिव स्मिताताई गोडसे, खजिनदार मंजिरी चव्हाण, आजीवन सदस्य संध्या वर्तक यावेळी उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकारातून करण्यात आलेले हे दोन्ही करार पुढील तीन वर्षांसाठी कार्यान्वित असणार आहेत. या करारांमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेत गुणवत्ता, उपलब्धता आणि सर्वसमावेशकता वाढवण्यास मोठी चालना मिळणार आहे. @abitkar_prakash #PublicHealth #ChildHealth #NCDPrevention #MentalHealthMatters #HealthcareStrengthening #CommunityHealth #EarlyDiagnosis #HealthForAll #HealthcareInnovation #MaharashtraHealth
PHD Maha Health IEC Official tweet mediaPHD Maha Health IEC Official tweet mediaPHD Maha Health IEC Official tweet mediaPHD Maha Health IEC Official tweet media
MR
0
0
0
7
PHD Maha Health IEC Official
PHD Maha Health IEC Official@PHDMahaHealth·
“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियान यशस्वी करण्यासाठी झोकून काम करा – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर छत्रपती संभाजीनगर विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेला उत्साही प्रतिसाद छत्रपती संभाजीनगर, दि. 9 एप्रिल : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” हे राज्याच्या ग्रामीण आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे अभियान असून त्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वांनी झोकून देऊन काम करावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज येथे केले. लोकसहभागातून आरोग्याचा जागर घडवून या अभियानाचे चळवळीत रुपांतर करणे हेच या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगर येथील एम.आय.टी. इंजिनीअरिंग कॉलेजच्या मंथन सभागृहात आयोजित विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते ते बोलत होते. या कार्यशाळेत तेरा जिल्ह्यांतील आरोग्य विभागाचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ, अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार प्रदीप जैसवाल, आमदार प्रा. रमेश बोरनारे, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील, एमआयटीचे संचालक मनीष शर्मा, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रविंद्रन, शहरी आयुक्त डॉ. सुनील भोकरे, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारे, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व परिमंडळातील उपसंचालक, जिल्हा आरोग्य शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी तसेच सरपंच,पंचायत समिती सभापती व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने या कार्यशाळेला उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री आबिटकर म्हणाले की, “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” हे केवळ अभियान नसून लोकसहभागातून उभी राहणारी एक व्यापक आरोग्य चळवळ आहे. या अभियानामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणार असून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा घरपोच उपलब्ध होणार आहेत. उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे हे या अभियानाचे वैशिष्ट्य असून, प्रत्येक नागरिकाने आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारल्यास आजारांचे प्रमाण कमी होऊ शकते. यासाठी गावागावांत जनजागृती करणे आणि तपासण्यांची संख्या वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, राज्यातील एकही नागरिक सरकारी आरोग्य योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आता प्राथमिक आरोग्य केंद्रांसह सर्व रुग्णालयांमध्ये लागू करण्यात आली असून या योजनेची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. आरोग्य विभागामार्फत ईसीजी, डायलिसिस, स्टेमी प्रकल्प यांसारख्या अनेक सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गाव स्तरावरील सर्व समित्या अस्तित्वात येण्यासाठी शासन आदेश लवकरच निघणार असून, या आदेशान्वये गाव स्तरावरील त्याचप्रमाणे उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा आरोग्य समित्यांची स्थापना करण्यात येईल आणि या सर्व समित्या लवकरच कार्यान्वित होतील. त्याची माहिती लोकांपर्यंत पोहचविणे आवश्यक असून त्यासाठी प्रभावी जनप्रबोधन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. “प्रत्येक गावामध्ये एकाही व्यक्तीची आरोग्य तपासणी सुटू नये, यासाठी आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांनी घरभेटी वाढवाव्यात. कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर वेळीच तपासणीद्वारे नियंत्रण मिळवता येऊ शकते,” असेही त्यांनी सांगितले. तसेच छत्रपती संभाजीनगरमधील निधीअभावी प्रलंबित रुग्णालयांची सर्व कामे लवकर पूर्ण करण्यात येतील आणि लोकांच्या सेवेत ती रुग्णालये लवकरच येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले की, ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव” हे अभियान ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून, हे अभियान आपले स्वतःचे आहे अशा भावनेने प्रत्येकाने काम केले तर हे अभियान निश्चितच यशस्वी होईल. सरकारी रुग्णालयांची परिस्थिती आता बदलत असून खासगी रुग्णालयाला लाजवेल अशा प्रकारच्या सुविधा आता सरकारी रुग्णालयात उपलब्ध होत आहेत. आपण सर्वांनी मिळून एकजुटीने काम केले तर आरोग्य क्षेत्रात चांगले काम होईल. आजची ही कार्यशाळा संवाद साधण्यासाठी आहे. त्यामुळे गावांमधून आलेल्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या काही सूचना असल्यास निश्चित मांडाव्यात आणि आरोग्य विभागाचा नावलौकिक वाढेल अशी कामगिरी करावी. Full News on FB
PHD Maha Health IEC Official tweet mediaPHD Maha Health IEC Official tweet mediaPHD Maha Health IEC Official tweet mediaPHD Maha Health IEC Official tweet media
MR
0
0
1
16
PHD Maha Health IEC Official
PHD Maha Health IEC Official@PHDMahaHealth·
“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियानाच्या छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कार्यशाळेचे उदघाटन एम.आय.टी. इंजिनीअरिंग कॉलेजच्या मंथन सभागृहात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आज करण्यात आले. या कार्यशाळेत १३ जिल्ह्यांतील आरोग्य विभागाचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. @abitkar_prakash #माझंगाव_आरोग्यसंपन्नगाव #छत्रपतीसंभाजीनगर #विभागीयकार्यशाशाळा
PHD Maha Health IEC Official tweet mediaPHD Maha Health IEC Official tweet mediaPHD Maha Health IEC Official tweet mediaPHD Maha Health IEC Official tweet media
MR
0
0
1
21
PHD Maha Health IEC Official
गडचिरोली येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त अघोरी व अनिष्ट प्रथांविरुद्ध जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन व आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रभावी उपक्रम राबविण्यात आले. #arogyadoot #healthcampaign #PublicHealth #gadchiroli
PHD Maha Health IEC Official tweet media
MR
0
0
0
17
PHD Maha Health IEC Official
#वृत्तपत्र_विशेष “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियानाचा शुभारंभ @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @abitkar_prakash @MeghnaBordikar #माझंगाव_आरोग्यसंपन्नगाव #जागतिकआरोग्यदिन #७एप्रिल #सार्वजनिकआरोग्यविभाग #महाराष्ट्रशासन
PHD Maha Health IEC Official tweet mediaPHD Maha Health IEC Official tweet mediaPHD Maha Health IEC Official tweet media
MR
0
0
0
19
PHD Maha Health IEC Official
ग्रामीण रुग्णालयाची कमिटी, उपजिल्हा रुग्णालयाची कमिटी, जिल्हा रुग्णालयाची कमिटी अशा विविध कमिट्यांना तेथील लोकप्रतिनिधींच्या विचाराने आपण कार्यान्वित करणार आहोत. जेणेकरून पुढील १५ दिवसांत साधारणतः ५ लाख लोक आरोग्यसेवेशी प्रभावीपणे जोडले जातील. - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर 📍नागपूर २ एप्रिल २०२६ @abitkar_prakash #prakashabitkar #healthminister #ruralhealthcare #inclusivehealthcare #communityhealth
MR
0
0
0
26
PHD Maha Health IEC Official
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे शुभारंभ करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह राज्याच्या मंत्रिमंडळातील सर्व विभागाचे मंत्री यावेळी उपस्थित होते. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी या अभियानाविषयी मंत्रिमंडळाला माहिती दिली. त्यानंतर अभियानाविषयी माहिती देण्यात देणाऱ्या व्हिडिओ आणि पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @abitkar_prakash @MeghnaBordikar #माझंगाव_आरोग्यसंपन्नगाव #शुभारंभ #सार्वजनिकआरोग्यविभाग #महाराष्ट्रशासन
MR
0
0
1
25
PHD Maha Health IEC Official
“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यव्यापी शुभारंभ उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई, दि. ७ एप्रिल : जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह राज्याच्या मंत्रिमंडळातील सर्व विभागाचे मंत्री यावेळी उपस्थित होते. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी या अभियानाविषयी मंत्रिमंडळाला माहिती दिली. त्यानंतर अभियानाविषयी माहिती देण्यात देणाऱ्या व्हिडिओ आणि पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. राज्य शासनाने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, रोगमुक्त आणि स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. लोकसहभागातून ही मोहीम व्यापक आरोग्य चळवळ म्हणून उभी राहावी, हा शासनाचा मानस असून, गावपातळीपासून राज्यस्तरापर्यंत आरोग्य सेवांचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे. या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देणे. स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, पोषण, तसेच संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांवर नियंत्रण यांसारख्या मूलभूत घटकांवर लक्ष केंद्रित करून ग्रामीण नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. माता-बाल आरोग्य, मानसिक आरोग्य आणि बदलत्या जीवनशैलीशी निगडित आजारांनाही या मोहिमेत विशेष स्थान देण्यात आले आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, विभाग, जिल्हा आणि ग्रामपंचायत स्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली असून, ठरावीक निकषांनुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना “आरोग्यसंपन्न गाव” म्हणून गौरविण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असून, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच आरोग्य संस्थांना 65.25 कोटी रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” हे अभियान केवळ योजना नसून एक लोकचळवळ आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्याचा स्तर उंचावून निरोगी, सशक्त आणि समृद्ध समाज घडविण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचा विश्वास यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केला आहे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @abitkar_prakash @MeghnaBordikar #माझंगाव_आरोग्यसंपन्नगाव #शुभारंभ #सार्वजनिकआरोग्यविभाग #महाराष्ट्रशासन
PHD Maha Health IEC Official tweet mediaPHD Maha Health IEC Official tweet media
MR
0
0
0
24
PHD Maha Health IEC Official
७ एप्रिल- जागतिक आरोग्य दिन एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी! राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्यदायी शुभेच्छा ! #WorldHealthDay #HealthyLifestyle #PublicHealth #HealthForAll #FitIndia #HealthyMaharashtra #CommunityHealth
PHD Maha Health IEC Official tweet media
MR
0
0
1
19
PHD Maha Health IEC Official
७ एप्रिल २०२६ : जागतिक आरोग्य दिन "एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी" दहा मिनिटात निदान, तात्काळ हृदय उपचार स्टेमी प्रकल्प रुग्णांसाठी आधार @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @abitkar_prakash @MeghnaBordikar @MahaDGIPR @tricoghealth #WorldHealthDay #7april #CardiacCare #diagnostics #PublicHealth #STEMI
PHD Maha Health IEC Official tweet media
MR
0
1
0
23
PHD Maha Health IEC Official
७ एप्रिल – जागतिक आरोग्य दिन एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी! निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी विज्ञानाधारित उपाय, जनजागृती आणि प्रत्येकाचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक आहे. चला, आजच्या दिवशी आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प करूया आणि उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येऊया. #WorldHealthDay #HealthyLiving #HealthySociety #ScienceForHealth #HealthyFuture
PHD Maha Health IEC Official tweet media
MR
0
0
1
19
PHD Maha Health IEC Official
चला, आरोग्यपूर्ण भविष्यासाठी एकत्र संकल्प करूया! “माझं गाव – आरोग्यसंपन्न गाव” या अभियानातून निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करून सक्षम व सुदृढ महाराष्ट्र घडविण्यास हातभार लावूया. जागतिक आरोग्य दिनानिमित्त सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा! @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @abitkar_prakash @MeghnaBordikar #WorldHealthDay #HealthyVillage #HealthyLifestyle #PublicHealth #HealthForAll #FitIndia #PreventiveCare #WellnessJourney #HealthyMaharashtra #CommunityHealth
PHD Maha Health IEC Official tweet media
MR
0
1
1
29
PHD Maha Health IEC Official
#माझंगाव_आरोग्यसंपन्नगाव राज्यातील नागरिकांना दर्जेदार व मोफत आरोग्य सेवा गावपातळीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आरोग्य विभाग सातत्याने कार्यरत आहे. ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ ही केवळ योजना नसून लोकसहभागातून सशक्त व निरोगी महाराष्ट्र घडविण्याची व्यापक लोकचळवळ आहे. प्रतिबंधात्मक उपाय, निरोगी जीवनशैलीचा प्रसार आणि तळागाळातील जनजागृती यावर विशेष भर देण्यात येत आहे. @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @abitkar_prakash @MeghnaBordikar
MR
0
0
1
30
PHD Maha Health IEC Official
गोंदिया जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी बालकांचे पोषण आहार व मुलींचे रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना राज्याचे टास्क फोर्स कुपोषण निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. दिपक सावंत यांनी दिल्या याबद्दल माध्यमांनी दिलेले वृत्त... Dr. Deepak Sawant #malnutrition #malnutritionawareness #dietfood #NewspaperHeadlines #mediacoverage
PHD Maha Health IEC Official tweet mediaPHD Maha Health IEC Official tweet media
MR
0
0
0
43
PHD Maha Health IEC Official
उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयांनी एका महिन्यात 'प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना' सुरू करावी : आरोग्यमंत्री @abitkar_prakash #PMJAY #MJPJAY #HealthServices #mediacoverage #NewspaperHeadlines
PHD Maha Health IEC Official tweet media
MR
0
1
0
24