MLA.DEVENDRA RAJESH KOTHE BJP
1.5K posts

MLA.DEVENDRA RAJESH KOTHE BJP
@devendrakothe
Member Of Legislative Assembly Maharashtra .249 Solapur City Central Assembley
Solapur, India Sumali Nisan 2011
67 Sinusundan587 Mga Tagasunod

महाराष्ट्र दिनानिमित्त ‘मुंबई–पुणे मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे उद्घाटन मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाने साकारलेला हा प्रकल्प राज्याच्या प्रगतीला नवी गती देणारा ठरणार आहे.
#MissingLink #MumbaiPune #MissingLinkProject #DevendraFadnavis #BJP
@Dev_Fadnavis
@RaviDadaChavan
@cbawankule
@Jaykumar_Gore
@BJP4Maharashtra
MR

राज्याचे स्मशान भूमी समितीवर माझी निवड झाल्यानंतर आज पहिली बैठक संपन्न झाली
राज्यातील स्मशानभूमींची सद्यस्थिती, त्यांचे अद्ययावतीकरण व परिसर सुशोभीकरणाबाबत सखोल अभ्यास करून आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी राज्यस्तरीय अभ्यास समिती गठीत करण्याबाबत आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत हिंदू समाजातील दहनभूमी व दफनभूमी या विषयावर अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ग्रामीण भागातील सामाजिक सलोखा व परिस्थिती सुधारण्यासाठी सर्व हिंदू स्मशानभूमी सर्व जातीच्या नागरिकांसाठी खुल्या करण्याच्या दृष्टीने आढावा घेऊन ठोस उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत.अभ्यास समिती राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी करणार असून, त्या आधारे निष्कर्ष काढून अहवाल सादर केला जाणार आहे.
यावेळी राज्यात जिथेही विकासकामांची मागणी केली जाईल, त्या ठिकाणी प्रथम स्मशानभूमी उभारणीस प्राधान्य देण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश ग्रामविकास मंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी दिले. तसेच प्रत्येक गावात सर्व समाज घटकांसाठी एक मुख्य सार्वजनिक स्मशानभूमी असणे आवश्यक असल्याचे नमूद केले. स्मशानभूमीमध्ये पाणी, वीज, वृक्षलागवड, छत, आरसीसी बांधकाम, बसण्यासाठी बाकडे, अप्रोच रोड/पोहच रस्ता तसेच महिला, पुरुषांसाठी शौचालय अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला.
या बैठकीस मंत्री जयकुमार भाऊ गोरे,प्रधान सचिव (ग्रामविकास) एकनाथ डवले, आमदार देवेंद्र कोठे, श्री. अशोक राणे, श्री. ऋषिकेश सकनूर, ॲड. गुरदीप सिंह अहलुवालिया, श्रीमती अश्विनी चव्हाण, श्री. जयवंत तांबे तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
📍मंत्रालय मुंबई -२९ एप्रिल २०२६
@Dev_Fadnavis
@RaviDadaChavan
@Jaykumar_Gore




MR

महाराष्ट्र विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा !
ज्यांच्यासाठी भाजपा सर्वस्व, त्यांच्यासाठी देवाभाऊ नेहमीच दक्ष...
@BJP4India
@BJP4Maharashtra

MR

मुंबई पुणे Missing Link प्रकल्प 1 मे, महाराष्ट्र दिनी वाहतुकीसाठी खुला!
राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा आणि गती देणाऱ्या मुख्यमंत्री इन्फ्रामॅन देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मनःपूर्वक आभार.
घाट विभागातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांची तीव्रता आणि प्रवासातील वेळेचा अपव्यय या दीर्घकालीन समस्यांवर शाश्वत उपाय म्हणून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात आला आहे. आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून उभारलेले बोगदे व उड्डाणपूल यामुळे हा मार्ग अधिक सुरक्षित, गतिमान आणि प्रवासी अनुकूल ठरणार आहे. या प्रकल्पामुळे निश्चितच राज्याच्या आर्थिक आणि भौगोलिक कनेक्टिव्हिटीला अधिक बळकटी मिळेल
@Dev_Fadnavis
@RaviDadaChavan
@cbawankule
@PandeRajeshBJP
@Jaykumar_Gore
MR

#विजयी_मेळावा #कृतज्ञता_सोहळा
हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते, सोलापूर महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा आणि भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न झाला.!
या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य, नगरसेवक, सभापती ,नगराध्यक्ष आणि महापौर, यांचा सत्कार करून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सोलापूर शहर- जिल्ह्यातील मतदारांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व सदस्यांना भरभरून मतदान केले आणि एक हाती सत्ता दिली. सोलापूरकरांच्या मत'रूपी कर्जाची विकासाच्या माध्यमातून उतराई होऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
@Dev_Fadnavis
@Jaykumar_Gore
@Kalyanshetti_S
#सोलापूर_कार्यकर्ता_मेळावा #सत्कार_सोहळा #विकासपर्व #भाजप_महाराष्ट्र_Solapur #DevendraFadnavis




MR

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहेब यांचे सारथ्य करण्याचे भाग्य लाभले..
@Dev_Fadnavis
@RaviDadaChavan
@Jaykumar_Gore


MR

#विजयी मेळावा #कृतज्ञता सोहळा
सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या अभूतपूर्व विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी *विजयी मेळावा* आणि आयटी पार्क, 1378 कोटींची समतोल पाणीपुरवठा योजना, MIDC मधील सुविधांकरिता 56 कोटींचा निधी, अभियांत्रिकी महाविद्यालयाला मंजुरी, उजनी धरण येथील प्रकल्पाकरिता एक लाख 28 हजार कोटींच्या गुंतवणुकीचा निर्णय घेणाऱ्या इन्फ्रामॅन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीत कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आपण सर्वांनी मोठ्या संख्येने वाजत-गाजत अवश्य यावे.
स्थळ - हरिभाई देवकरण प्रशाला मैदान, सोलापूर
वेळ - मंगळवार दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 वाजता.
स्वागतोत्सुक - भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर-जिल्हा
आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी
आमदार देवेंद्र दादा कोठे
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@cbawankule
@RaviDadaChavan
@MahaDGIPR
@tarunchughbjp
@PandeRajeshBJP
@Jaykumar_Gore
@Kalyanshetti_S




MR

सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक पंचायत समिती व नगरपंचायतींवर भारतीय जनता पक्षाला एक हाती सत्ता मिळाली, भारतीय जनता पक्षाला या मिळालेल्या यशाबद्दल मतदार बंधू - भगिनींचे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 28 एप्रिल रोजी सोलापूर येथे येत आहेत. या भव्य मेळाव्याचे आयोजन हरीभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात येणाऱ्या स्टेज आणि सभामंडप शामियान्याच्या जागेची पाहणी करण्यासाठी उपस्थित होतो.
यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे, मार्गदर्शक मोठे बंधू आमदार सचिन कल्याणशेट्टी, महापौर विनायक दादा कोंड्याल, भाजपा सोलापूर शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर , नगरसेवक प्रशांत पल्ली, नगरसेवक विजय चिप्पा उपस्थित होते.




MR

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका–महानगरपालिका निवडणुकांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील जनतेने भारतीय जनता पक्षाला भरभरून यश दिले आहे.
या विजयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व विजयी मेळाव्यानिमित्त महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दिनांक २८ एप्रिल रोजी सोलापूर येथे येत आहेत.
या मेळाव्याच्या अनुषंगाने हरीभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात येणाऱ्या स्टेज व सभामंडप परिसराची पाहणी करण्यात आली.
यावेळी माझे मार्गदर्शक मोठे बंधू आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार, भाजपा सोलापूर शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, गटनेते नगरसेवक नरेंद्र काळे, सुधाताई अल्लीमोरे उपस्थित होते..




MR














