📍 नागपूर
६९व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कार्यक्रमास वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, पोलीस महासंचालक सदानंद दाते, नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ब्रिटिशकालीन कायद्यांमध्ये बदल करून जनतेच्या सेवेसाठी फौजदारी कायदे तयार झाले. यामुळे देशात पोलीस व्यवस्था आणि अपराधिक न्याय प्रणालीत सुसूत्रता येऊन जनतेला जलद व योग्य न्याय मिळत आहे. सर्व राज्यांनी या कायद्यांची उत्तम अंमलबजावणी सुरू केली असून शासन व पोलिसांचे कार्य जनतेची सेवा करणे असल्याचे यातून अधोरेखित होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
६९व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजक पद महाराष्ट्राला व नागपूरला मिळाले आहे. तसेच देशात या मेळाव्याचे पहिले आयोजनही नागपूरमध्येच झाले याचे समाधान आहे. या मेळाव्यात गुन्हे शोधणात व्यावसायिक कौशल्य, न्याय वैदक विज्ञान, संगणक प्रणाली आणि श्वान प्रशिक्षण आदी विषयांवर चर्चा, परिसंवाद, स्पर्धा होणार आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
अखिल भारतीय पोलीस क्रीडा नियंत्रक मंडळ आणि आंध्र प्रदेश राज्य पोलीस विकास नियोजन परिषद यांनी यावर्षीच्या अखिल भारतीय कर्तव्य मेळाव्याचे आयोजक पद महाराष्ट्राला दिले असून नागपूर मध्ये हे आयोजन होत आहे या मेळाव्याची सुरुवात १९५९ मध्ये नागपूर मधूनच झाली होती.
#PoliceDutyMeet@Dev_Fadnavis@Ashishjaisw3Adv
१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत जमाबंदी आयुक्त कार्यालयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच सर्वोत्तम आयुक्त / संचालक गटातील ६८ सहभागींपैकी दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले. जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख संचालनालयाने (डीएलआर) डिजिटल युगाशी सुसंगत अशी व्यापक आणि प्रभावी कामगिरी नोंदवली आहे.
नागरिकाभिमुख सेवा, पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाधारित व्यवस्थापन यावर भर देत विभागाने राज्यातील जमीन नोंद प्रणाली अधिक सुलभ, वेगवान आणि विश्वासार्ह केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तत्कालीन जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे यांच्या कार्यकाळात ही उल्लेखनीय कामगिरी झाली आहे.
#ईगव्हर्नन्स
#सेवाकर्मी
#GoodGovernance
मॅक्ससिटी लिटरेचर फेस्टिव्हलचा दुसरा दिवस विविध विषयांवरील सखोल चर्चासत्रे आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यशस्वीरीत्या संपन्न झाला. दिवसभरात मार्गदर्शन, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी, लिंग समानता तसेच सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर विविध मान्यवरांनी विचार मांडले. डॉ.आकाश खुराना आणि निशा दासगुप्ता यांनी मार्गदर्शन विषयावर चर्चा केली, तर टॉम कूपर यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या विषयावर धोरणात्मक विश्लेषण सादर केले.
‘धुरंधर’ या विषयावरील चर्चेत प्रकाश बेलावडी, कर्नल अशुतोष काले आणि अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सशस्त्र दलांचा दृष्टिकोन मांडला. अमेरिका–इराण संबंधांवरील चर्चेत राजदूत टी.सी.ए. राघवन, मिन्हाज मर्चंट आणि प्रबळ दासगुप्ता यांनी सखोल विश्लेषण केले. ‘भारताची सभ्यता: अवकाश आणि काळाच्या पलीकडील प्रवास’ या सत्रात या पॅनेलमध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, लेखक व कथाकार राजेश एम. अय्यर, लेखक अजय चतुर्वेदी यांनी सहभाग घेत भारतीय सभ्यतेचे सातत्य आधारांवर प्रकाश टाकला.
६९व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे उद्घाटन झाले. महाराष्ट्र पोलिसांकडे देशातील सर्वात मोठे आणि आधुनिक पोलीस दल म्हणून पाहिले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
#PoliceDutyMeet@Dev_Fadnavis
डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी येथील मॅक्ससिटी लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये ‘भारताची सभ्यता: अवकाश आणि काळाच्या पलिकडील प्रवास’ या विषयावर सखोल आणि विचारप्रवर्तक चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या चर्चासत्रात भारतीय सभ्यतेची अखंडता, तिची तात्त्विक पायाभूत रचना, तसेच आधुनिक काळातील तिचे महत्त्व यावर विविध अंगांनी चर्चा करण्यात आली.
या पॅनेलमध्ये माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह, लेखक व कथाकार राजेश एम. अय्यर, लेखक अजय चतुर्वेदी आणि यांनी सहभाग घेतला होता तर कार्यक्रमाचे समन्वयन ऐका बॅनर्जी यांनी केले.
चर्चेदरम्यान मान्यवरांनी भारतीय सभ्यतेच्या सातत्याचा ऊहापोह करताना सांगितले की, भारत ही केवळ भौगोलिक संकल्पना नसून ती एक जिवंत चेतना आहे. इजिप्त, मेसोपोटेमिया यांसारख्या प्राचीन सभ्यता कालांतराने लोप पावल्या, मात्र भारतीय सभ्यता आजही अखंडपणे टिकून आहे, यामागील कारणे त्यांनी स्पष्ट केली.
@Brijeshbsingh
मॅक्ससिटी लिटरेचर फेस्टिव्हलचा दुसरा दिवस विविध विषयांवरील सखोल चर्चासत्रे आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यशस्वीरीत्या संपन्न झाला. दिवसभरात मार्गदर्शन, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी, लिंग समानता तसेच सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर विविध मान्यवरांनी विचार मांडले. टॉम कूपर यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या विषयावर धोरणात्मक विश्लेषण सादर केले.
‘धुरंधर’ या विषयावरील चर्चेत प्रकाश बेलावडी, कर्नल अशुतोष काले आणि अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सशस्त्र दलांचा दृष्टिकोन मांडला. अमेरिका–इराण संबंधांवरील चर्चेत राजदूत टी.सी.ए. राघवन, मिन्हाज मर्चंट आणि प्रबळ दासगुप्ता यांनी सखोल विश्लेषण केले. ‘भारताची सभ्यता: अवकाश आणि काळाच्या पलीकडील प्रवास’ या सत्रात या पॅनेलमध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, लेखक व कथाकार राजेश एम. अय्यर, लेखक अजय चतुर्वेदी यांनी सहभाग घेत भारतीय सभ्यतेचे सातत्य आधारांवर प्रकाश टाकला.
लोकसंख्येचे बदलते स्वरूप, असंसर्गजन्य आजार, डॉक्टर तुटवडा आणि शहरी-ग्रामीण दरी यांसारख्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राज्यनिहाय लवचिक धोरणे, डिजिटल हेल्थ, सार्वजनिक-खाजगी भागीदारी आणि आयुष-आधुनिक वैद्यकांचा समन्वय यावर भर देण्याची गरज मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथील पल्स वैद्यकीय परिषद २०२६ मध्ये ‘आरोग्य व्यवस्था आणि मनुष्यबळ’ या विषयावर झालेल्या पॅनल चर्चेत व्यक्त करण्यात आली.
सविस्तर वृत्त : mahasamvad.in/195886/
#पल्स२०२६
#पल्सवैद्यकीयपरिषद
#Pulse2026@Pulse_2026
वैद्यकीय प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी स्टार्टअप्स, सरकार आणि वैद्यकीय संस्थांमध्ये समन्वय वाढवणे गरजेचे असल्याचे मत 'वैद्यकीय प्रणाली व संशोधन अधिक बळकट करण्यासाठी स्टार्टअप्सची भूमिका’ या विषयावरील चर्चासत्रात तज्ज्ञांनी व्यक्त केले. #कृत्रिमबुद्धिमत्ता आणि डेटा-आधारित नवकल्पनांमुळे आरोग्य सेवा अधिक प्रभावी, सुलभ आणि परिणामकारक होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करताना प्रत्यक्ष अंमलबजावणी, कौशल्याधारित शिक्षण आणि मजबूत पायाभूत व्यवस्था यावर या चर्चासत्रात विशेष भर देण्यात आला.
सविस्तर वृत्त : mahasamvad.in/195889/
#पल्स२०२६
#पल्सवैद्यकीयपरिषद
#Pulse2026@Pulse_2026
कृत्रिम बुद्धिमत्ता (#एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे रिअल-टाइम विश्लेषण आणि ट्रॅकिंग करणाऱ्या राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (#एससीईआरटी) महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच सर्वोत्तम आयुक्त / संचालक गटातील ६८ सहभागींपैकी तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करुन एससीईआरटीला गौरविण्यात आले असून परिषदेच्यावतीने सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे आणि उपसंचालक ज्योती शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. परिषदेचे तत्कालीन संचालक राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शिक्षण व्यवस्थेत डेटा-आधारित निर्णयप्रक्रियेला मोठी चालना मिळाली आहे.
#ईगव्हर्नन्स
#सेवाकर्मी
#GoodGovernance
वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाने डिजिटल गव्हर्नन्समध्ये उत्कृष्ट कामगिरी करत १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कृती आराखड्याअंतर्गत ५७ शासकीय विभागांमध्ये ७ वा क्रमांक मिळविला आहे. हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी विभागाचे सचिव धीरज कुमार यांना प्रशस्तीपत्र देऊन विभागाच्या पारदर्शकता, कार्यक्षमता आणि नागरिक सेवांमध्ये केलेल्या उल्लेखनीय सुधारणांचा गौरव करण्यात आला.
व्हॉट्सअप आधारित चॅटबॉट, क्लिनीकल डिसीजन सपोर्ट सिस्टम (CDSS) साठी AI एजंट्स, छातीच्या एक्स-रेसाठी इमेज ॲनालिटिक्स, गर्दी व्यवस्थापन विश्लेषण, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, एमएमसी आणि एमएसडीसीसाठी सुरक्षित प्रमाणपत्रासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान या सर्व उपक्रमांमुळे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग हा महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात ई-गव्हर्नन्स परिवर्तनाचा एक आदर्श नमुना ठरला आहे. यासाठी विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी अभिनंदन केले आहे.
#ईगव्हर्नन्स
#सेवाकर्मी
#GoodGovernance
राज्यातील १० हजारपेक्षा जास्त मंजूर पदसंख्या असलेल्या शासकीय आस्थापनांच्या वर्गवारीतील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय या आस्थापनेने प्रथम स्थान प्राप्त केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमात या उत्कृष्ट कामगिरीसाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी व त्यांच्या चमूला प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
#ईगव्हर्नन्स
#सेवाकर्मी
#GoodGovernance