Rajan Uthwal
2 posts


मुलुंड पश्चिमेस असलेल्या एम.टी. अग्रवाल रुग्णालयात विविध सेवा कंत्राटी तत्त्वावर चालवल्या जात असल्याने नागरिकांमध्ये पारदर्शकतेची मागणी वाढली आहे. रुग्णालय प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेने (BMC) कंत्राटी तत्त्वावर चालवल्या जाणाऱ्या सर्व सेवा आणि कर्मचाऱ्यांची स्पष्ट ओळख दाखवणारे फलक लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यामध्ये
१.डॉक्टर,
२.ICU कर्मचारी,
३.फार्मसी,
४.लॅबोरेटरी,
५.सुरक्षा रक्षक,
६.हाऊसकीपिंग
७.भोजन आणि अल्पोपहार, केटरिंग सेवा प्रदाता
८.रुग्णवाहिका सेवा तसेच इतर यांचा समावेश आहे.
रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना रुग्णालयातील कोणत्या सेवा थेट रुग्णालयाच्या देखरेखीखाली आणि कोणत्या खाजगी कंत्राटदारांमार्फत पुरवल्या जातात, हे जाणून घेण्याचा अधिकार आहे, असे समाजसेवकांचे म्हणणे आहे. "पारदर्शकता अत्यावश्यक आहे," असे एका स्थानिक समाजसेवकाने सांगितले, विशेषतः आरोग्यसेवेच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या सेवांचा खुलासा महत्त्वाचा आहे.
प्रस्तावानुसार, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची नावे सार्वजनिक फलकांवर दाखवणे अपेक्षित आहे, जेणेकरून नागरिकांना सेवा पुरवणाऱ्या कर्मचार्यांची माहिती मिळेल आणि पारदर्शकता राखली जाईल.
आरोग्य हे एक अत्यावश्यक सार्वजनिक सेवा क्षेत्र आहे. त्यामुळे, मुंबई महापालिका आरोग्य विभाग आणि भारतीय आरोग्य मंत्रालयाने त्वरीत कारवाई करून कंत्राटी तत्त्वावर असलेल्या सेवांचा योग्य खुलासा करावा, अशी नागरिकांतर्फे स्थानिक समाज सेवक “गोल्डी शर्मा” ह्यांनी मागणी केलि आहे. @mieknathshinde @Dev_Fadnavis @mulund_info @MulundMumbai @MulundOpinion @Mymulund_mumbai @mulundexpress @MulundMatterz @SDPatil_16 @RajoolP @rautsanjay61 @PatrakarNManiar

MR

@GoldySh65920213 @mieknathshinde @Dev_Fadnavis @mybmcWardT @SDPatil_16 @mulund_info Very good...lage raho
English

बीट नंबर १०५ मुलुंड ईस्ट , हुतात्मा चाफेकर बंधू मार्ग फूटपाथ का स्लॅब अँड वॉल नाही तोडा गाया है . जबकी वर्क ऑर्डर में लिया गाया है. येह सब की जिम्मेदारी किसकी.enquiry होनी चाईये. यह नुकसान की भरपाई कौन भरेगा ? @mieknathshinde @Dev_Fadnavis @mybmcWardT @SDPatil_16 @mulund_info




हिन्दी