ॲड. सुनिल कोरपडे retweetledi
ॲड. सुनिल कोरपडे
10.8K posts

ॲड. सुनिल कोरपडे retweetledi

अवघ्या 20 मिनिटात या ताईनं डबघाईला आलेल्या महिलांच्या सुरक्षिततेबाबत फडणवीस अँड कंपनीचं
पितळ उघडं पडलं..!!
चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधामाला या अगोदर सुद्धा दोन वेळा अटक झाली असताना तो मोकाट सुटलाच कसा...???
#NasarapurCrime
MR
ॲड. सुनिल कोरपडे retweetledi

आता तरी सरकारचं डोकं ठिकाणावर येणार आहे की नाही?
नसरापूरमध्ये त्या चिमुरडीसोबत जे घडलं, ते ऐकून मन सुन्न झालंय आणि डोकं रागाने भणभणतय. सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या ३-४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली जाते? ही कोणती विकृती आपण आपल्या समाजात आणि राज्यात पोसतोय? महाराष्ट्रात आज माता-भगिनी सोडाच, पण लहान बाळंही सुरक्षित राहिलेली नाहीत, ही आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.
गेल्या काही महिन्यांतील घटनांची मालिका पाहिली तर अंगावर काटा येतो. नसरापूर, बदलापूर, ठाणे, पुणे, चाकण, महाळुंगे... अशा किती जागांची आणि किती निष्पापांची नावं आपण घ्यायची? प्रत्येक वेळी नवी घटना घडते, आपण दोन दिवस संताप व्यक्त करतो आणि तिसऱ्या दिवशी सगळं विसरून जातो. म्हणूनच पोर्शे अपघातात निबंध लिहून सुटका होते आणि नेस्कोमध्ये ओव्हरडोसमुळे जीव जाऊनही कोणतीच ठोस कारवाई होत नाही. ही व्यवस्थेची लाचारी नाही तर काय आहे?
माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं प्रशासन नक्की कोणासाठी काम करतंय? गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही, कारण त्यांना माहितीये की कोणत्या ना कोणत्या मंत्र्याचा वरदहस्त त्यांच्या पाठीशी आहे.
'शक्ती कायद्याच्या' गप्पा खूप झाल्या, पण तो कायदा प्रत्यक्षात राबवण्याचं धाडस हे सरकार का दाखवत नाहीये?
केवळ कागदावर कायदे करून किंवा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 'लाडकी बहीण' योजना जाहीर करून बहिणी सुरक्षित होत नसतात; त्यांच्या सुरक्षिततेसाठी गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा दरारा निर्माण करावा लागतो.
आज परिस्थिती इतकी भीषण आहे की, उद्या आपली मुलं घराबाहेर सुरक्षित असतील याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. सत्तेत बसलेले लोक १० दिवसांनी जुन्या घटना विसरून नवीन जाहिरातींमध्ये दंग होतात, पण पीडितांचे काय? माझं सरकारला पुन्हा सांगणं आहे, पोलिसांना फक्त २४ तासांचा 'फ्री हॅण्ड' द्या! आमचे पोलीस सक्षम आहेत, पण त्यांचे हात राजकीय हितसंबंधांनी बांधलेले आहेत.
लोकशाहीत आम्ही प्रत्येक गोष्ट सहन करतोय, पण हे सर्व सहन करण्याच्या पलीकडचे आहे. मी इथे एक 'नेता' म्हणून नाही, तर एक सामान्य 'माणूस' आणि एक बाप म्हणून जाब विचारतोय... आपल्या महाराष्ट्राला आपण कोणत्या थरावर नेऊन ठेवणार आहोत?
-अमित राज ठाकरे



MR
ॲड. सुनिल कोरपडे retweetledi

प्रवीण तरडे हे एरव्ही भाजप किंवा युती सरकारचे उघड उघड समर्थक आहेत. पण त्यांचाही कालच्या नसरापूर प्रकरणाने संयम सुटलाय. जो त्या गुन्हेगाराला मारेल त्याला आमदार खासदार केला पाहिजे, कोपर्डी, दिवेघाट, मालेगाव अशा अनेक गुन्ह्यातले आरोपी आजही जिवंत आहेत, सरकार कायदा या गोष्टी लांबत जातात. त्यामुळे यांना लोकांनीच जागेवर ठेचलं पाहिजे असं ते म्हणाले.
कायदा-सुव्यवस्था, न्याय-न्यायालय, सरकार यावर इतका अविश्वास निर्माण व्हावा इतकी का वेळ आली असेल आपल्यावर?
@Dev_Fadnavis काहीतरी करा आणि परिस्थिती बदला!
MR
ॲड. सुनिल कोरपडे retweetledi
ॲड. सुनिल कोरपडे retweetledi
ॲड. सुनिल कोरपडे retweetledi

“मिसिंग लिंक" खरोखरच मिसिंग आहे!
“कालच मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालं आणि आज रस्ताच बंद ? घाट पुन्हा ट्रॅफिकच्या विळख्यात! कोणाला पोलीस स्टेशन माहित असेल तर सांगा, कारण मला 'मिसिंग लिंक'ची मिसिंग रिपोर्ट नोंदवायची आहे!”
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अभिजीत पानसे यांचा सरकारला मिश्किल टोला !
MR
ॲड. सुनिल कोरपडे retweetledi

हुतात्मा स्मारकाला नीट सजावट नव्हती, सगळा सरकारी अनुत्साह जाणवत होता. सरकारला आणि त्यांच्या विभागांना आपल्या महाराष्ट्र दिनाबद्दलची नक्की अनास्था कशातून आली आहे? वरती बसलेले वरिष्ठ ज्या राज्यातून येतात त्या राज्याच्या मनात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला याची सल आहे. त्यामुळे इथे गाजावाजा करत आनंद व्यक्त केला आणि वरिष्ठांची खप्पामर्जी ओढवली तर काय होईल, असा काही भाव सरकारच्या मनात आहे का? हाच दिवस जैन समूहाचा किंवा तत्सम समूहाचा असता तर सरकाने सर्वत्र गालिचे अंथरले असते, रोषणाई केली असती, तिथे कधीही हात आखडता घेतला नसता. पण महाराष्ट्र राज्यासाठी, मुंबईसाठी, इथल्या माणसांसाठी जो आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे, तिथे मात्र अगदी सुतकी पद्धतीने हा दिवस साजरा केला जातोय. - राज ठाकरे, मनसेप्रमुख
#RajThackeray #Maharashtra #MaharashtraDin #LatestNews
(Raj Thackeray, Maharashtra, Maharashtra Din, Latest News)

MR
ॲड. सुनिल कोरपडे retweetledi
ॲड. सुनिल कोरपडे retweetledi

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्या १०५ हुतात्म्यांना आणि थोर नेत्यांना मानाचा मुजरा!
ज्यांच्या त्यागातून, श्रमातून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला त्या मुंबईचं, आपल्या महाराष्ट्राचं महत्व उमजलं का ?
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#महाराष्ट्रदिन #कामगारदिन
MR

आता लोकांनी लक्ष ठेवायची वेळ आली आहे.. सरकार झोपायचे सोंग घेऊन बसले आहे..
Abhishek Somwanshi@abhisanket
पुणे. पुणे. पुणे. कालच एक व्हिडिओ पाहिला दिवेआगरचे पोलीस पुण्याहून येणाऱ्या गाड्या चेक करत होते कोयते वगैरे आहेत का बघण्यासाठी. कारण काय तर गेल्या ६ दिवसात पुण्याहून आलेल्या १५ जणांवर तिथे गुन्हे दाखल झाले. भांडण, मारामारी केली म्हणून. @Dev_Fadnavis लक्ष आहे का तुमचं?
MR
ॲड. सुनिल कोरपडे retweetledi

महाराष्ट्र दिनानिमिता हुतमता चौकात सुशोभीकरण करावं असं महापालिकेला वाटलं नाही.
कदाचित अदानी-अंबानी-लोढा यांनी महापालिकेला / राज्य सरकारला त्यासाठी परवानगी दिली नसेल.
१०७ मराठी प्रेमींनी, मराठी मुलुख एकत्र यावा यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकाला राज्य स्थापनेच्या दिनी तिथे कसलंही सुशोभीकरण न करणं, हा ठरवून केलेला निचपणा आहे. महाराष्ट्राचं महत्त्व कमी करणं, मराठी जणांच्या मनात मराठी भाषेविषयी, या राज्याविषयी असलेली आत्मियता नष्ट करणं, एकूण आपली भाषिक ओळख पुसून टाकणं हा संघ भाजपच्या हिंदुत्वाचा भाग आहे.
दिलीश्वरांना खुश करण्यासाठी प्रचंड भिकारडेपणा सुरू आहे.
मराठी लोकहो जागे व्हा... आधीच फार उशीर झालाय...
#महाराष्ट्रदिन #MaharashtraDay #Marathi #Maharashtra
MR
ॲड. सुनिल कोरपडे retweetledi
ॲड. सुनिल कोरपडे retweetledi

सस्नेह जय महाराष्ट्र,
सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
दरवर्षीप्रमाणे आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला जाऊन, या लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
हा दिवस या हुतात्म्यांच्या स्मरणाचा जसा आहे, तसा तो मुंबईसारखं शहर जे घडवण्यात मराठी माणसांनी स्वतःचा घाम, रक्त ओतलं आणि हे शहर आपल्याला मिळवण्यासाठी काय संघर्ष करावा लागला याचं स्मरण करण्याचा दिवस आहे.
पण मला गेली अनेक वर्ष एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे ती म्हणजे, सरकार जसे औपचारिकता म्हणून अनेक दिवस साजरे करतं तसा हा अजून एक सरकारी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आहे. या स्मारकाला नीट सजावट नव्हती, सगळा सरकारी अनुत्साह जाणवत होता. सरकारला आणि त्यांच्या विभागांना आपल्या महाराष्ट्र दिनाबद्दलची नक्की अनास्था कशातून आली आहे ?
वरती बसलेले वरिष्ठ ज्या राज्यातून येतात त्या राज्याच्या मनात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला याची सल आहे. त्यामुळे इथे गाजावाजा करत आनंद व्यक्त केला आणि वरिष्ठांची खप्पामर्जी ओढवली तर काय होईल असा काही भाव सरकारच्या मनात आहे का ? हाच दिवस जैन समूहाचा किंवा तत्सम समूहाचा असता तर सरकाने सर्वत्र गालिचे अंथरले असते, रोषणाई केली असती, तिथे कधीही हात आखडता घेतला नसता. पण महाराष्ट्र राज्यासाठी, मुंबईसाठी, इथल्या माणसांसाठी जो आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे, तिथे मात्र अगदी सुतकी पद्धतीने हा दिवस साजरा केला जातोय.
मला तर असं पण वाटून गेलं की सरकारची इच्छा लवकरात लवकर मराठी माणसाला या स्मारकाचा विसर पडावा अशी आहे की काय ?
बरं, सरकारकडून अपेक्षा आहेत पण त्या अपेक्षांची पूर्तता होणार नाही याची जवळपास खात्री पटली आहे.
पण मराठी माणसाला काय झालं आहे? मुंबईतील हुतात्मा स्मारक हे फक्त मुंबईतील नाही तर राज्यातील तमाम मराठी जनांसाठी अभिमानाचे प्रतीक असायला हवे. खरंतर या स्मारकाला एखाद्या तीर्थक्षेत्रासारखी गर्दी व्हायला हवी. इथे मराठी माणसांच्या झुंडीच्या झुंडी फक्त मुंबई आणि आसपासच्या परिसरातून नाही तर राज्यभरातून धडकायला हव्यात. मिरवणुका निघायला हव्या. पण सरकार इतकीच अनास्था मराठी माणसाच्या मनात उत्पन्न का झाली आहे ? मुंबई हा आपल्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा कणा आहे. हे शहर आपण मराठी माणसांनी घडवलं, याला आकार आपण दिला आणि आपण ते लढून मिळवलं. पण हे सगळं आपण विसरलो आहोत.
माझी मराठी माणसाला हात जोडून विनंती आहे की संयुक्त महाराष्ट्रचा लढा विसरू नका, आपलं हुतात्मा स्मारक विसरू नका. या हुतात्मा स्मारकाच्या आसपासची जी गगनचुंबी मुंबई दिसते ती हे शहर या राज्याचा भाग होतं म्हणून झाली आहे हे विसरू नका आणि याची जाणीव इतरांना देखील जास्तीत जास्त करून द्या. आणि याचा अभिमान बाळगा. मुंबई आणि आसपासच्या शहरांमधल्या मराठी माणसांनी पुढच्या वर्षी आवर्जून १ मे ला इथे येऊन हुतात्म्यांना वंदन करा आणि राज्यातून मुंबईत येणाऱ्या मराठी माणसांनी देखील जरूर भेट द्या. हे झालं तर सरकारला पण दखल घ्यावी लागेल.
मी गेली अनेक वर्ष जे सातत्याने सांगतोय तेच पुन्हा सांगतो, जर आपण आपल्या भाषेचा, संस्कृतीचा, आणि प्रांताचा जाज्वल्य अभिमान बाळगला तर आणि तरच बाहेरचे आपल्या भाषेचा आणि प्रांताचा सन्मान करतील.
राज ठाकरे ।

MR
ॲड. सुनिल कोरपडे retweetledi

बोललं तर आवडत नाही, झोडलं तर राग येतो अशी स्थिती महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांची आहे. हम करे सो कायदा अशा न्यायाने सत्ताधारी वागत आहेत. यांच्या शहाणपणावर मला अनेकदा शंका येते. अधिकारी तर फक्त थुंकी झेलायला ठेवलेयत. कुण्या शहाण्याने यांना घाटात उद्घाटनाचा स्टेज बांधायला सांगितला त्याचा जोड्याने सत्कार करायला हवा. कार्यक्रम खालापूर च्या फूड मॉल ला करून तुम्हाला लाँग ड्राइव्ह करून उद्घाटन करता आलं असतं. इतक्या उन्हात लाखो गाड्यांना कोंडीत अडकवून काय मिळवलं? कित्येक गाड्या तापल्यामुळे बंद पडल्या आहेत. त्यांना मदत करण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही. तुमच्या नालायकपणामुळे या गाड्या बंद पडल्या आहेत, लोकांना त्रास झाला आहे. एखाद्या कार्यक्रमाचं ही आपत्तीत रूपांतर करणाऱ्या शासनाच्या संवेदनशीलतेबाबत मला शंका आहे.
* ज्या ट्रोल्स ना तुम्ही आता कामाला लावणार आहात, त्या ट्रोल्स ना ही माझं सांगणं आहे, चुकीच्या गोष्टींची सुपारी घेताना रेट दहापट वाढवून घ्या. स्वस्तात काम करू नका. #MumbaiPuneHighway #Traffic #MissingLink

MR
ॲड. सुनिल कोरपडे retweetledi

राज ठाकरे यांच्या राजकीय भाषणापेक्षा महाराष्ट्र, मराठी, संस्कृती, साहित्य, कला यावरचे भाषण सर्वोत्तम असते. काल वरुणराज भिडे पुरस्कार आणि आज वसंतव्याख्यानमालेतील भाषण जबरदस्त होते.
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंधेला अतिशय उत्तम व्याख्यान ऐकायला मिळाले.
@RajThackeray धन्यवाद 🙏


MR
ॲड. सुनिल कोरपडे retweetledi
ॲड. सुनिल कोरपडे retweetledi

राज ठाकरे ह्यांनी आजवरच्या महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची जणू उजळणीच घेतली. तुम्हाला राज ठाकरेंचे विचार पटो न पटो, परंतु प्रत्येक मराठी माणसांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत आजचं भाषण ऐकलेच पाहिजे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र दिनाचा सोहळा आज पुण्यात पार पडला. #Pune

MR





