लातूर जिल्हा परिषदेत भाजपच्या मंडळींनी रडत-पडत आणि मित्र पक्षाची मनधरणी करत सत्ता मिळवली.
या सत्तेचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणे अपेक्षित असताना भाजपचे पदाधिकारी व गुत्तेदार यांना याचा अर्थपूर्ण फायदा होणार असल्याची झलक या व्हिडिओ मध्ये दिसत आहे.
रेणापूर येथे पराभूत भाजप उमेदवाराने नगरपंचायत निवडणूकीत “मला मतदान का केले नाही” या कारणावरून एका वृद्ध महिलेला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
ही घटना अत्यंत दुर्दैवी असून याचा #निषेध करावा तेवढा कमीच आहे. अशा प्रकारच्या घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आणि लोकशाही मूल्यांना घातक ठरणाऱ्या आहेत.
पोलीस प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी. सत्तेच्या जोरावर भाजपची मंडळी जर असे वर्तन करत असतील, तर जनता हे कदापि सहन करणार नाही.दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक शिक्षा करावी अशी ठाम मागणी मी करतो.
.
.
#Renapur#LaturGramin#Latur#Maharashtra
.
.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@INCMaharashtra@LaturPolice
#लातूर_ग्रामीण मधील #रेणापूर तालुक्यातील रामवाडी येथील श्री दत्ता शिंगडे यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेली #सिंचन_विहीर बांधली.
विहिरीचे काम करण्यासाठी त्यांनी व्याजी पैसे काढून खर्च केला मात्र आता कामाचे बिल काढण्यासाठी त्यांना अनंत अडचणी येत आहेत. ग्रामपंचायती कडून कसलेही सहकार्य मिळत नसून बील काढण्यासाठी अधिकची रक्कम मागितली जात असल्याने त्यांनी स्वतःची किडनी विकण्याचा निर्णय घेतला असून १४ ऑगस्ट पासून ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अमरण उपोषणासाठी बसले आहेत.
शेती करत असताना ती अधिक चांगली करता यावी म्हणून प्रयत्न करत असलेल्या शेतकरी बांधवास अशा प्रकारे अडचणी येत असतील व सत्ताधारी लोकप्रतिनिधी कडून सहकार्य मिळत नसेल तर ते योग्य नाही.
म्हणून संबंधित विभागाकडून सिंचन विहिरीचे व अन्य विविध योजनेतील प्रलंबित बीले तात्काळ काढून अशी दिरंगाई यापुढे होवू नये याची काळजी सरकारने घ्यावी अशी मागणी मी करतो.
.
.
#LaturGramin#Latur#Renapur#Farmers#DhirajDeshmukh#DhirajVilasraoDeshmukh #रोजगारहमीयोजना #Maharashtra
.
.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@ibharatgogawale@INCMaharashtra@atullondhe
आज सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहर व जिल्ह्यातून आलेले विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी, नागरिक यांनी राज्याचे माजी मंत्री आ. @AmitV_Deshmukh साहेब यांची भेट घेऊन मागण्या निवेदने सादर केली त्यावर साहेबांनी तात्काळ संबंधित विभागाला फोन करून कामासंदर्भाने सूचना केल्या
लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील #खाडगाव येथे मूलभूत सुविधा व इतर शासकीय योजना अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात आल्या आहेत, त्यामुळे गावाचे चित्र पालटले आहे, तसेच गावातील इतर समस्या सोडवण्यासाठीही तत्परतेने योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल. #AmitDeshmukh4Laturcity#Maharashtra
लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संघटना संस्थांचे
पदाधिकारी नागरिक यांच्या आज सकाळी बाभळगाव निवासस्थानी
भेटी घेतल्या. त्यांच्या समस्या, अडचणी समजून घेतल्या, निवेदनाचा स्वीकार केला. त्यासंदर्भात संबंधितांना आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या आहेत.
#AmitDeshmukh4Latur#latur#Maharashtra
#लातूर जिल्ह्यातही बोगस पीक विम्याचं रॅकेट.
शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पीक विमा मिळण्यासाठी वाट पाहत बसावी लागत असताना अशा प्रकारचा #कृषी खात्याचा भ्रष्टाचार समोर येताना दिसतो.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी लातूर शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने आयोजित आंदोलनात आज राज्याचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख साहेब यांनी खासदार डॉ शिवाजी काळगे माजी आमदार वैजनाथ शिंदे व पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सहभाग घेतला.
शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून, जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोटार सायकल वरून निषेध रॅली काढण्यात आली.
भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संसदेत चर्चा सुरू असताना ज्यांनी हे संविधान दिले त्या परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच संविधानिक पदावर म्हणजे केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत असलेल्या अमित शहा यांनी अवमानकारक वक्तव्य करणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे, आपल्या लोकशाही देशातील प्रत्येक नागरिकाला हीबाब कदापि सहन होणारी नाही. त्यामुळे त्यांना या पदापासून दूर करावे अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देशाच्या राष्ट्रपतींना पाठवलेल्या निवेदनात करण्यात आली आहे
#babasahebambedkar#IndianNationalCongress#Congress#maharashtra#INCMaharashtra
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब जी थोरात यांच्या समवेत आज पुन्हा मसाजोग ते जाऊन, अत्यंत अमानुषपणे खून झालेले सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची तसेच गावकऱ्यांची भेट घेतली, त्यांना धीर दिला, या खून प्रकरणातील सर्व आरोपींना अटक होऊन त्यांना कठोर शिक्षा होईपर्यंत काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही याप्रसंगी दिली.
@bb_thorat@INCIndia@INCMaharashtra
.
.
#IndianNationalCongress#INCMaharashtra#indian#Maharashtra#Beed
मराठवाड्यात ओढवलेल्या पूरस्थितीमुळे सामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदेड शहरातील पाकीजा नगर, बिलाल नगर, लक्ष्मी नगर, गौतम नगर, खडकपुरा या भागात गोदावरी नदीचे पाणी शिरून झालेल्या नुकसानीची पाहणी राज्याचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख साहेब यांनी यावेळी केली व अपघातग्रस्तांशी त्यांनी संवाद साधून सद्यस्थितीचा आढावा घेतला.
जिल्हा प्रशासनाने तातडीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. अपघातग्रस्तांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू असा त्यांनी नागरिकांना धीर दिला. आमचा या सरकारला एकच प्रश्न, आणखी किती दिवस मराठवाड्यातील सर्वसामान्यांना हा नाहक त्रास सहन करावा लागणार?
@AmitV_Deshmukh#Marathwadaflood#Flood#Maharashtrapolitics#FloodRelief#MarathwadaPolitics#DisasterManagement#ClimateCrisis#PoliticalResponse#FloodImpact#Marathwadapolitics
महाराज आम्ही या सरकारला माफ करू शकत नाही. तुमच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करून त्यांनी आमच्या मनाला नाही तर आत्म्याला वेदना दिल्या आहेत. ही #शिवद्रोही_महायुती आहे. आम्ही त्यांना जोडे मारणार.
लातूर येथे होणाऱ्या मराठवाड्यातील काँग्रेसच्या खासदारांच्या सत्कार सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा आज लातूर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार @MeDeshmukh साहेब यांनी घेतला