*पनवेल महानगरपालिका घेणार नागरिकांच्या सुरक्षितेसाठी ५५ मीटर व २८ मीटर अत्याधुनिक एरियल लॅडर*
*प्लॅटफॉर्म – उंच इमारतींमधील आग व आपत्ती नियंत्रणासाठी मोठे पाऊल*
पनवेल शहरात गेल्या काही वर्षांत वेगाने वाढ होत असून, लोकसंख्या, गृहनिर्माण प्रकल्प, व्यापारी संकुले, मॉल्स, रुग्णालये, हॉटेल्स तसेच उद्योगक्षेत्र यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासोबतच उंच इमारती, हाई-राईज रेसिडेन्शियल टॉवर्स, कार्यालयीन संकुले मोठ्या प्रमाणावर उभी राहत आहेत. या पार्श्वभूमीवर आगीच्या घटना व इतर आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आणि प्रभावी प्रतिसाद देणे आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार पनवेल महानगरपालिकेने ५५ मीटर व २८ मीटर उंचीपर्यंत कार्यक्षम अशा अत्याधुनिक एरियल लॅडर प्लॅटफॉर्म वाहनांची खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
सद्यस्थितीत पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडे उपलब्ध असलेली साधनसामग्री मर्यादित असून, विशेषतः उंच इमारतींमध्ये आग लागल्यास किंवा अडकलेल्या व्यक्तींना वाचवायचे असल्यास आवश्यक त्या उंचीपर्यंत पोहोचण्याकरिता आधुनिक एरियल लॅडर प्लॅटफॉर्मची आवश्यकता होती.
५५ मीटर एरियल लॅडर प्लॅटफॉर्म हे उंच इमारतींमध्ये (१५ ते २० मजले व त्यापेक्षा जास्त) पोहोचण्यासाठी उपयोगी ठरेल, तर २८ मीटर एरियल लॅडर प्लॅटफॉर्म मध्यम उंचीच्या इमारती, गृहनिर्माण संकुले, रुग्णालये, शाळा, हॉटेल्स आदी ठिकाणी बचावकार्यासाठी उपयुक्त ठरेल.
या खरेदी प्रक्रियेसाठी निविदा मागवण्यात आल्या असून, तांत्रिक निकषांनुसार पात्र कंपन्यांकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आवश्यक तांत्रिक वैशिष्ट्ये, सुरक्षितता मानके, कार्यक्षमता व दीर्घकालीन देखभाल खर्च यांची सखोल तपासणी करून योग्य तो प्रस्ताव निवडण्यात येणार आहे.
या संपूर्ण प्रकल्पावर सुमारे २२ कोटींहून अधिक खर्च (जीएसटीसह) येणार असून, ही गुंतवणूक शहराच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग अधिक सक्षम, आधुनिक आणि सुसज्ज होणार आहे.
महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांना अधिक सुरक्षित वातावरण मिळेल, तसेच भविष्यातील वाढत्या लोकसंख्या व उंच इमारतींशी संबंधित आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज राहील.
चौकट
"नागरिकांचे प्राण व मालमत्तेचे संरक्षण हीच महापालिकेची सर्वोच्च जबाबदारी असून, त्या दृष्टीने पनवेल महानगरपालिका सातत्याने आधुनिक सुविधा उभारण्याचा प्रयत्न करत आहे. ५५ मीटर व २८ मीटर एरियल लॅडर प्लॅटफॉर्मची खरेदी हा त्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे."
- श्री.मंगेश चितळे, आयुक्त तथा प्रशासक, पनवेल महानगरपालिका
या दोन आधुनिक यंत्रसामग्रीमुळे पुढील महत्त्वाची कामे अधिक प्रभावीपणे पार पाडणे शक्य होणार आहे –
उंच इमारतींमध्ये लागलेल्या आगिवर नियंत्रण मिळवणे
अडकलेल्या नागरिकांचे सुरक्षितपणे रेस्क्यू करणे
औद्योगिक व रहिवासी क्षेत्रातील दुर्घटनांमध्ये बचावकार्य करणे
नैसर्गिक आपत्ती व आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देणे
#PanvelMunicipalCorporation#panvel#firefighter#firesafety#firedepartment
*पनवेल महानगरपालिकेच्या वतीने बांधकाम स्थळांची पाहणी; निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई*
मुंबई उच्च न्यायालयाच्या हवा प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संवर्धनाबाबतच्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पनवेल महानगरपालिका प्रशासन सक्रिय झाले असून, त्यानुसार निरीक्षण, तपासणी आणि कारवाईची मोहीम राबविण्याच्या सूचना आयुक्त मंगेश चितळे यांनी दिल्या आहेत.
या मोहिमेचा एक भाग म्हणून आज दि. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी कामोठे आणि खारघर प्रभाग समिती क्षेत्रातील विविध बांधकाम स्थळांची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान उप आयुक्त मा. स्वरूप खारगे यांनी हवा प्रदूषण नियंत्रणासाठी उच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या १५ मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे बांधकाम स्थळांवरील उपाययोजनांची प्रत्यक्ष तपासणी केली.
तपासणीदरम्यान साइटवरील धूळ नियंत्रण, बांधकाम साहित्याचे संरक्षित साठवण, जिओ-फेंसिंग किंवा कव्हरिंग, रस्त्यांवर धूळ नियंत्रणाची साधने, पाणी मारण्याची यंत्रणा, डेब्रिज व कचरा व्यवस्थापन आणि कामगारांची सुरक्षा साधने (विशेषतः मास्क वापर) यांसारख्या बाबींचे निरीक्षण करण्यात आले.
पाहणीत काही बांधकाम प्रकल्पांनी मार्गदर्शक नियमांचे योग्य पालन केल्याचे आढळले; मात्र काही ठिकाणी मार्गदर्शक नियमांचे अंशतः पालन किंवा गंभीर त्रुटी जसे की धूळ नियंत्रण उपाययोजनांचा अभाव आणि बांधकाम साहित्य उघड्यावर ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. संबंधित बांधकाम प्रकल्पांना तत्काळ नोटिसा देण्याचे, दंडात्मक कारवाई करण्याचे आणि आवश्यक सुधारणात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले.
या पाहणीदरम्यान पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण, कामोठे प्रभाग अधीक्षक दिपक शिलकन, खारघर प्रभाग अधीक्षक जितेंद्र मढवी, लिपिक प्रवीण व्हळगल तसेच कर्मचारी स्वप्नील कांबळे उपस्थित होते.
पनवेल महानगरपालिकेने नागरिक आणि प्रकल्प विकासकांना पर्यावरण संरक्षणाबाबत जबाबदारीने वर्तणुक करण्याचे आवाहन केले असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
#PanvelMuncipalcorporation
महाड येथील भाजपा कार्यालयाला भेट देऊन भाजपा व महायुतीच्या उमेदवारांची सदिच्छा भेट घेतली व आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
विकासाच्या मार्गावर महाडचा वेग अधिक वाढवण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला.
#BJP#Mahayuti#Mahad#Election2025
देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या रेडीओवरील ‘मन की बात’ कार्यक्रमाचे श्रवण पनवेल येथील भाजपा कार्यालयात केले. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग यावेळी लाभला.
पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींचे राष्ट्रनिर्मितीचे विचार आम्हाला सतत प्रेरणा देत आहेत आणि समाजहिताच्या कार्यासाठी ऊर्जा देत आहेत.
#मनकीबात #BJP#Panvel#BJPPanvel#NarendraModi#NationFirst
AQI in Kharghar is getting worse every single day
AQI is crossing dangerous levels & still no action from authorities
Stone crushing machines near Owe Village are running openly, creating dust clouds & health hazards for every residents
@MahaEnvDept@PCDNaviMumbai@PanvelCorp
@RailMinIndia@IRCTCofficial@drmvaranasi I forgot my powerbank and charging cable near my pillow on Seat H1 20, Shiv Ganga Express (PNR 2544177966), arrived at Varanasi on 6 June at 5:45 am. Can you please help me retrieve it? Urgently needed. Thanks for your assistance!
Vendor like Vibgyor Info Pvt Ltd should be removed from the services and strict action should be taken for the worst service ever expected at the Nations Capital Railway Station @narendramodi@AshwiniVaishnaw@RailMinIndia@DRMDELHIDIVN
@nsitharaman As a customer when we are paying GST on railway ticket along with paying GST on the waiting charged who takes the responsibility of the quality of services which do matters. @RailwayNorthern@DRMDELHIDIVN
@AshwiniVaishnaw@RailMinIndia@PMOIndia India is growing and Delhi Junction Railway First Class looks like some slum yard where people are forced to sleep at Toilet doors. AC is not working and local vendors are enjoying the area dedicated for the travellers. @narendramodi
@RailwaySeva@drmjabalpur@drmhowrah Received the call from concerned person and the responsible guy came back with Toilet Cubes to refresh our compartment.
Great Scam going on in the name of Services.
Travelling to DDU to Itarsi in First AC in Train 12322 PNR 8403672252.
Our entire section is stinking and when we asked for the complaint book they asked they dont have complaint book with them instead they share feedback form to share the feedback @RailMinIndia@AshwiniVaishnaw
@RailwaySeva It’s unfortunate to see the same guys who created the issues coming back to me for tge update on the same. How can you expect the resolution from the Culprits?
@drmhowrah@drmddu@railwaySeva@railmadad