District Information Office, Hingoli retweetledi

जनगणना २०२७ च्या अनुषंगाने सध्या सोशल मीडियावर एक अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो बनावट आणि अनधिकृत आहे.
#FactCheck
#DGIPRFactCheck
जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यांतर्गत, नागरिकांनी खालील दोन अधिकृत माध्यमांतूनच ३३ अधिसूचित प्रश्नांची माहिती देणे आवश्यक आहे.
१. स्व नोंदणी - नागरिक se.census.gov.in या संकेतस्थळावर माहिती भरू शकतात. फॉर्म सबमिट केल्यानंतर मिळालेला 'SE ID' त्यानंतर येणाऱ्या प्रगणक भेटीदरम्यान पडताळला जाईल.
२. थेट माहिती देणे - दि. १६.०५.२६ ते १४.०६.२६ या कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या अधिकृत प्रगणकांकडे प्रत्यक्ष माहिती देऊन नोंदणी करता येईल.
सोशल मीडिया किंवा इतर प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या कोणत्याही अनधिकृत अर्जांद्वारे, लिंकद्वारे किंवा अनोळखी व्यक्तींना आपली वैयक्तिक माहिती देऊ नका.
#जनगणना२०२७
#Census2027
#SelfEnumeration
#IndiaCensus2027

MR




































