
.
23K posts






आतापर्यंत तीन वेळा लेऑफ मुळे माझा जॉब गेलेला आहे. पहिला जॉब गेला तेव्हा वडील दवाखान्यात अॅडमीट होते. संध्याकाळी ४ वाजता त्यांना डीस्चार्ज मिळणार होता. वर्क फ्रॉम होम असल्याने १०-१२ दिवस दवाखान्यातूनच काम करत होतो. कंपनीचं काम आणि डिस्चार्जची तयारी करत असताना एक वाजता एचआरचा कॉल आला. 'कंपनी आर्थिक संकटात असल्याने आम्ही काही कर्मचाऱ्यांना कमी करतोय, तुम्हाला एक महिन्याचा पगार देऊ, आजपासून तुम्ही काम थांबवू शकता, तुम्हाला थोड्या वेळात मेल येईल, त्याला अकनॉलेज करा, आम्ही दिलगीरी व्यक्त करतो,' असं बोलून तिने फोन ठेवला. मी फक्त ओके ओके बोलत राहीलो. थोडा वेळ काहीच समजत नव्हतं, काहीच प्रोसेस करता येत नव्हतं. एकाच वेळी डोक्यात अनेक प्रश्नांचं वादळ उठलं होतं. १५ दिवसांपूर्वी मॅनेजरने आणि एचआरने अप्रेजल फॉर्म भरून घेतला होता. हा फॉर्म भरायला जवळपास तीन तास लागलेले, सर्व गोष्टी आधी मॅनेजर, नंतर ऑपरेशन हेड आणि एचआरने बारकाईने तपासून घेतल्या होत्या. माझी संपूर्ण वर्षभरातली कामगिरी पहिल्या तीन मध्ये होती. मॅनेजरने देखील सर्वांसमोर अनेकदा कौतुक करुन त्याची दखल घेतली होती. आपल्याला चांगलं अप्रेजल मिळेल याची पूर्ण मला खात्री होती. पण आता अप्रेजल दूरच, पुढच्या २ महिन्यांनी आपली सॅलरी देखील येणार नाही हे आता नाईलाजाने स्विकारावं लागणार होतंं. एचआरने फोन ठेवला तसा धावत हॉस्पिटलच्या अॅडमिन कडे गेलो. मी काही विचारायच्या आधीच त्यांच्याकडून डिस्चार्जची तयारी पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं. 'मॅडम, इन्शुरन्स असला तरी काही गोष्टींचे एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतात असं तुम्ही सांगितलेलं होतं, तर ते किती झालेत सांगता का?' एचआरच्या फोननंतर माझ्या खोल गेलेल्या आवाजात मी अॅडमीन मॅडमला विचारलं. 'अरे.. काहीही नाही, टेन्शन घेऊ नको.. हॉस्पीटलने ते चार्जेस वेव ऑफ केले आहेत, नॉमिनल होते. संपूर्ण बील कॅशलेस आहे. तुला एक रुपयाही भरावा लागणार नाही.. ४ वाजता पप्पांना घेऊन जाऊ शकतो.' त्या मॅडमच्या या उत्तराने काहीसा धीर मिळाला. डिस्जार्जची सगळी प्रक्रिया पूर्ण केली. पहिल्या मजल्यावर वडिलांच्या रुममध्ये गेलो. तिथे माझ्याच वयाच्या तीन नर्स मुली वडिलांच्या हाताला लावलेल्या सुया आणि सलाईन काढत होत्या. मी जेवणाचे डब्बे, नातेवाईकांनी खायला आणलेल्या गोष्टी आणि कपड्यांची आवराआवर करुन बॅग पॅक केली. वडीलांना बेडवरून खाली उतरवलं, चक्कर येत नाही याची खात्री करण्यासाठी रुममध्येच २ मिनिटं ते चालले आणि नंतर आम्ही जिन्याने ग्राऊंड फ्लोअरला आलो. 'काका काळजी घ्या,' असं म्हणून १०-१२ दिवस वडीलांची मनापासून काळजी घेणाऱ्या त्या मुलींनी आम्हाला निरोप दिला. वडिलांनी कृतज्ञता म्हणून १००-१०० रुपये त्या मुली नको-नको म्हणत असताना त्यांच्या हातात दिले. मी बाईकवर आलेलो. मित्राला त्याची फोर-व्हिलर घेऊन बोलावलेलं. तो खाली येऊन थांबला होता. ऑगस्ट महिना असल्याने पाऊस पडत होता, तो दारापर्यंत छत्री घेऊन आला, वडीलांना गाडीत बसवलं, मी ओलं झालेलं बाईकचं सीट पुसून किक मारली आणि त्यांच्या गाडीमागे निघालो. दवाखाना ते घर - १२ किलोमीटरचं अंतर होतं. नोकरी गेल्याचा विचार, भविष्याची अनिश्चितता, घरी कसं सांगायचं, कोणाला सांगायचं, ते काय रिअॅक्ट करतील, घरच्यांना काय वाटेल, वडील आताच बरे होऊन घरी चाललेत, त्यांना कळलं तर ते काय विचार करतील, मित्रांना सांगितलं तर ते समजून घेतील की हसं करतील, पुढे काय करायचं, नोकरी मिळेल की नाही, कधी मिळेल, लेऑफ झाला म्हणून दुसऱ्या कंपनीत घेतील का असे अनेक प्रश्न तोंडावर लागणाऱ्या पावसाच्या थेंबांप्रमाणे बोचत होते. घरी पोहचलो तसे शेजारी राहणारे भाऊबंद आणि चुलत्यांच्या घरातील माणसं वडिलांना भेटायला आलेले. मी ओले झालेले कपडे बदलून ५ मिनिटे चुलीसमोर बसलो. अंग आणि ओला झालेला मोबाईल सुकवला. घरात आता विविध विषयांवर चर्चा सुरु होती, दवाखाना, ICU, अमूक डॉक्टर आमच्या ओळखीचा आहे, तमूक डॉक्टर खूप पैसे घेतो, बरं झालं इन्शुरन्स होता नाहीतर आजकाल दवाखाने आवाक्याबाहेर गेले आहेत, आता पोटभर जेवत जा अशा सगळ्या चर्चा सुरु होत्या. वडील बरे होऊन घरी आले म्हणून घरात आनंदाचं वातावरण होतं. पाऊस उघडला होता, अधूनमधून झाडाच्या पानांमध्ये अडकलेला एखादा थेंब पत्र्यावर पडत होता. २-३ तास घरात कोंडलेली लहान मुलं बाहेर निघून खेळत होती, पावसामुळे खोळंबलेल्या शेतात गेलेल्या बायका गवताचे भारे घेऊन परतीच्या वाटेवर होत्या, चारा खाण्याची वेळ झाल्याने गोठ्यातून गाई हंबरत होत्या, गंगू-रंगू - आमच्या शेळ्या आणि त्यांची पिल्लंही आवाज देत होते, काळे ढग बाजूला सरुन हळूहळू कोवळं ऊन पडायला लागलं होतं, भेटायला आलेल्यांना चहा देण्याची आईची लगबग सुरु होती, वडीलांचं आजारपण आणि २-३ तास चाललेला पाऊस यामुळे थांबलेलं सगळं पुन्हा पूर्वपदावर येत होतं. मी मात्र एचआरचआरच्या थंड शब्दांनी आणि पावसामुळे भिजल्याने अजूनही गोठल्यासारखा एकटाच चुलीसमोर शांत बसलो होतो. - वैभव सानप


जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी Oracle ने आपल्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी सुमारे १८% (जवळपास ३०,००० कर्मचारी) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ मार्च २०२६ रोजी सकाळी अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याचे ईमेल प्राप्त झाले, ज्यामुळे टेक विश्वात खळबळ माजली आहे. Thread 🧵






खतरनाक वीडियो है 4 साल के बच्चे को उठाकर जमीन पर पटक दिया. ये महाराष्ट्र के वसई का वीडियो है. बच्चे को जमीन पर पटकने वाले का नाम संदीप पवार है. संदीप का बच्चे के पिता से विवाद चल रहा था, उसी दुश्मनी में ऐसा किया. बच्चा अस्पताल में भर्ती है, संदीप को पुलिस ने पकड़ लिया.











BREAKING: Oracle laid off 20,000-30,000 employees this morning with a single 6 am email.







