Sabitlenmiş Tweet

@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@DGPMaharashtra
@Navimumpolice
@112Maharashtra
Police Mahanagar Alert News :- व्हिडिओत कैद झाला अवैध मद्यविक्रीचा प्रकार? रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरातील धक्कादायक वास्तव || #Police_Mahanagar
नवी मुंबई : रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा, ऐरोली नाका आणि रबाळे एमआयडीसी परिसरातील झोपडपट्टी भागात कथित अवैध मद्यविक्री सुरू असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओंमध्ये काही ठिकाणी दिवसाढवळ्या मद्याची विक्री होत असल्याचे दिसून येत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे.
स्थानिकांच्या मते, संबंधित ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा परवाना नसताना मद्यविक्री सुरू असून त्यामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, सार्वजनिक ठिकाणी खुलेआम सुरू असलेल्या या कथित प्रकारामुळे महिला व नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी रबाळे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे केली आहे.
आता समोर आलेल्या व्हिडिओंची सत्यता पडताळून संबंधित यंत्रणा कोणती कारवाई करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
#RabalePolice
#AiroliPolice
#NaviMumbaiCommissiner
#IllegalLiquorSale #MIDC #ExciseDepartmentMaharashtra #BreakingNews
MR





