Sangram... retweetledi

सम्राट अशोकांचे गुरु कोण होते?
अलेक्झांडरचे गुरु कोण होते?
नेपोलियनचे गुरु कोण होते?
न्यूटनचे गुरु कोण होते?
आईन्स्टाईनचे गुरु कोण होते?
रवींद्रनाथ टागोरांचे गुरु कोण होते?
महात्मा गांधींचे गुरु कोण होते?
बाजीराव पेशव्यांचे गुरु कोण होते?
यावर कधी चर्चा झाल्याचे आठवते का?
ते जाऊ द्या—इतिहासात कोण कोणाचे गुरु होते यावर कधी चर्चा झाल्याचे आठवते का?
वरील सर्व आणि अन्य महान व्यक्ती त्यांच्या गुरूंमुळे घडल्या, अशी चर्चा कधी ऐकली आहे का?
नाही ना?
……मग
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण, यावर चर्चा का?
वारंवार चर्चा का?
वारंवार—“महाराजांचे गुरु कोण?”,
“गुरूंमुळे काय झाले?”,
“गुरूंनी काय उपदेश केला?”,
“गुरूंची भेट कधी झाली?”—
अशा प्रश्नांचीच पुन्हा पुन्हा उजळणी का?
उद्देश काय?
छत्रपती शिवाजी महाराज या महान मानवी आविष्काराला गुरूंच्या अनाठायी चर्चेत का ओढले जाते?
ही बाब तुम्हाला, हो तुम्हाला 🫵🏻अस्वस्थ करीत नाही का?
तुमच्या, हो तुमच्या 🫵🏻 संवेदना मेल्या आहेत का?
महाराजांचा पराक्रम, त्यांच्या राज्यकारभारातील लोकाभिमुख मूल्ये यांची चर्चा होण्याऐवजी, विषय अशा वळणावर का नेला जातो?
हे थांबवा…
छत्रपती शिवाजी महाराज हे आभाळाएवढ्या उंचीचे—स्वकर्तृत्व, अतुलनीय पराक्रम, अभूतपूर्व कौशल्य, मुत्सद्दीपणा आणि प्रचंड जोखीम पत्करून जीवाची बाजी लावणारे एकमेवाद्वितीय योद्धे होते.
इतिहासात त्यांच्या जवळ जाणारे अन्य कोणी आहे का?
नाही ना?
मग त्यांच्या गुरुंबाबतची ही चर्चा पुन्हा, पुन्हा उकरून काढू नका!
-महेश झगडे

MR



























