Santosh shinde संतोष शिंदे retweetledi

मुंबईची सेवा आणि संरक्षण करणाऱ्या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना मुंबईतच हक्काची घरे मिळावीत, ह्यासाठी आम्ही महाविकास आघाडीचे सरकार असल्यापासून प्रयत्नशील आहोत. जसं बीडीडी चाळींचं व तेथे राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचं स्वप्न आम्ही साकार केले; तसेच हे स्वप्न देखील नक्कीच साकार करू!
२०२२ मध्ये गद्दारांनी आमचं सरकार पाडण्याआधी आम्ही त्यादिशेने पावलं उचलण्यास सुरुवातही केली होती. गेली ४ वर्षे भाजप सरकार पोलीस कर्मचाऱ्यांना केवळ आश्वासन देत आहे. तारखेवर तारीख देत आहेत.
ह्याचसंदर्भात काल पोलीस पत्नींची शिवसेना भवन येथे बैठक घेऊन पुनर्विकासासंदर्भात चर्चा केली. तीस ते चाळीस वर्ष पोलीस दलासाठी आयुष्य झोकून काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांचं हक्काचं घर आम्ही मुंबईत मिळवून देऊच!


MR
















































