Ankit Goyal

914 posts

Ankit Goyal banner
Ankit Goyal

Ankit Goyal

@ankitgoyal_ips

Indori Engineer/Naturalised Marathi manus/Cop/प्रहरी Views Personal.

Gurdaspur Katılım Nisan 2017
251 Takip Edilen3.5K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Ankit Goyal
Ankit Goyal@ankitgoyal_ips·
Detailed video on the concept and implementation of Police Dadalora Khidki - single window system. #GadchiroliPolice पोलीस दादा लोरा खिडकी | एक खिडकी योजना | Single Window System by Gadchir... youtu.be/YRs1Wpx6FQo via @YouTube
YouTube video
YouTube
English
17
8
103
0
Ankit Goyal retweetledi
गडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE
09 वरिष्ठ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफ समोर केले आत्मसमर्पण गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलविरोधी कारवायांना मोठे यश मिळाले असून 03 एसीएम (Area Committee Member) पदावरील वरिष्ठ माओवाद्यांसह इतर 06 अशा एकूण 09 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफ समोर स्वेच्छेने आत्मसमर्पण केले आहे. महाराष्ट्र शासनाने या सर्व माओवाद्यांवर एकत्रितपणे 30 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आत्मसमर्पणावेळी दोन माओवाद्यांनी एक स्वयंचलित AK-47 रायफल व एक कार्बाईन शस्त्रांसह आत्मसमर्पण केले. गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ यांच्या संयुक्त आणि सातत्यपूर्ण कारवायांमुळे सन 2025 पासून आतापर्यंत एकूण 132 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जनजागृती, विकासात्मक उपक्रम आणि पुनर्वसन धोरणांमुळे माओवाद्यांचा मुख्य प्रवाहाकडे कल वाढताना दिसून येत आहे. तसेच, आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छत्तीसगड राज्यातून अग्निशस्त्रांसह इतर नक्षल साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला असून सुरक्षा दलांच्या कार्याला महत्त्वपूर्ण यश प्राप्त झाले आहे. गडचिरोली पोलीस दलाने आत्मसमर्पित माओवाद्यांचे शासनाच्या पुनर्वसन धोरणांतर्गत पुढील प्रक्रिया सुरू केली असून, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यात येणार आहे. @CMOMaharashtra @DGPMaharashtra @Dev_Fadnavis
गडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE tweet mediaगडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE tweet mediaगडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE tweet mediaगडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE tweet media
MR
1
2
6
314
Ankit Goyal retweetledi
गडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE
गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकारातून 14 आत्मसमर्पित माओवादी सदस्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. गडचिरोली पोलीस दल व सर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, मा. दंतेश्वरी रुग्णालय, चातगाव येथे दिनांक 21 मार्च 2026 रोजी “प्रोजेक्ट संजीवनी” अंतर्गत ही शस्त्रक्रिया पार पडली. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात आत्मसमर्पण केलेले 13 व गोंदिया जिल्ह्यातील 1 अशा एकूण 14 सदस्यांचा समावेश होता. आतापर्यंत गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने एकूण 50 आत्मसमर्पित माओवादी सदस्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुख्य प्रवाहात पुनर्स्थापना व सर्वसामान्य कौटुंबिक आयुष्य अधिक सुखकर व्हावे, यासाठी गडचिरोली पोलीस दल कटिबद्ध आहे. #GadchiroliPolice #ProjectSanjeevani #Rehabilitation #NewBeginning
गडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE tweet media
MR
0
3
8
354
Ankit Goyal retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
गडचिरोलीत दहशतीचे शेवटचे चिन्ह हटले गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक म्हणून उभारण्यात आलेली उरलेली शेवटची 44 स्मारके सुरक्षा दलांनी यशस्वीरित्या उद्ध्वस्त केली. याबद्दल गडचिरोलीतील धैर्यशील पोलीस दलाचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांची ही कारवाई केवळ भौतिक संरचना हटवण्यापुरती मर्यादित नसून, अनेक वर्षे जनतेच्या मनावर निर्माण झालेल्या भीतीच्या मानसिकतेवर लोकशाहीने मिळवलेला निर्णायक विजय आहे. माओवाद्यांकडून दुर्गम आणि अतिदुर्गम भागात ही स्मारके उभारली गेली होती, ज्यांचा उद्देश स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे आणि आपले अस्तित्व दाखवणे हा होता. मात्र, शासनाच्या सातत्यपूर्ण आणि ठाम माओवादविरोधी धोरणामुळे गडचिरोलीतील परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. सुरक्षा कारवाया, आत्मसमर्पण धोरण, विकास प्रकल्प आणि स्थानिक जनतेचा विश्वास वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर, गडचिरोली पोलीस दल, सी-60 कमांडो, सीआरपीएफ आणि विशेष पथकांच्या संयुक्त मोहिमेत सुमारे 800 जवानांनी नियोजनबद्ध शोध आणि तपासणी मोहीम राबवली. बीडीडीएस पथकाच्या तपासणीनंतर विविध जंगल परिसरातील ही 44 स्मारके नेस्तनाबूत केली. एटापल्ली, हेडरी, भामरागड, जिमलगट्टा, धानोरा आणि पेंढरी उपविभागांतील ही कारवाई विशेषतः संवेदनशील भागात पार पडली. जिथे पूर्वी दहशतीचे प्रतीक उभे होते, तिथे आता प्रशासनावरील विश्वास आणि विकासाची आशा निर्माण झाली आहे. ही कारवाई गडचिरोलीतील बदलत्या वास्तवाचे प्रतीक आहे. भीतीपासून विश्वासाकडे, हिंसेपासून विकासाकडे होणाऱ्या संक्रमणाचा हा निर्णायक टप्पा आहे. @SP_GADCHIROLI #Maharashtra #Gadchiroli #NaxalFreeMaharashtra
MR
119
178
335
7K
Ankit Goyal retweetledi
गडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE
माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफला मोठे यश मिळाले असून एकूण ७ जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. या कारवाईत पश्चिम सब झोनल ब्युरोचा प्रभारी डिकेएसझेडसीएम प्रभाकरसह सिवायपीसी कमांडर, पीपीसीएम, एसीएम दर्जाचे तसेच सदस्य पदावरील माओवादी ठार झाले आहेत. मृत माओवाद्यांवर महाराष्ट्र शासनाने एकूण ७१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गडचिरोली–नारायणपूर सीमावर्ती जंगल परिसरात तीन दिवस व तीन रात्री सतत माओवादविरोधी अभियान राबविण्यात आले. दिनांक ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी पहिली चकमक होऊन माओवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आला. दिनांक ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी तीन माओवादी ठार झाले तसेच शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. दिनांक ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी उर्वरित चार माओवादी ठार करण्यात आले. या कारवाईदरम्यान खालील शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे – ०३ एके ४७ रायफल ०१ एसएलआर ०१ .३०३ रायफल १७३ जिवंत काडतूस माओवादी साहित्य सी-६० व सीआरपीएफच्या जवानांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. सन २०२१ पासून आजपर्यंत गडचिरोली पोलीस दलाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ९९ कट्टर माओवादी ठार, १४० माओवादी अटक आणि १५३ माओवादी आत्मसमर्पण केले आहे. गडचिरोली पोलीस दल माओवादविरोधी अभियान अधिक तीव्र करणार असून उर्वरित माओवाद्यांना हत्यार टाकून आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. #GadchiroliPolice #C60Commandos #CRPF #AntiNaxalOperation #MaoistFreeGadchiroli #InternalSecurity #PoliceAction #NationFirst #LawAndOrder #PeaceAndDevelopment
MR
0
1
3
347
Ankit Goyal retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार विदीप जाधव यांचे कर्तव्यावर असताना झालेल्या अपघाती निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏻💐 #भावपूर्ण_श्रद्धांजली
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
375
1.3K
12.8K
184.8K
Ankit Goyal retweetledi
गडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE
पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांचा गडचिरोली दौरा गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा, विकास आणि लोकसहभागाचा मजबूत संदेश देणाऱ्या विविध कार्यक्रमांना पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य श्रीमती रश्मि शुक्ला यांनी भेट दिली. अतिसंवेदनशील पोमकें फुलणार कॅम्प भेट अभियानाची तयारी तपासून अधिकारी-अंमलदारांशी संवाद साधला. भव्य जनजागरण मेळावा पोलीस दादालोरा खिडकीद्वारे स्प्रे पंप, भांडी, शिलाई मशीन असे साहित्य वितरीत. ५००+ नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद. गर्देवाडा — ७४वे सार्वजनिक वाचनालय उद्घाटन "एक गाव, एक वाचनालय" उपक्रमांतर्गत वाचनालयाचे उद्घाटन व भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे लोकार्पण. ग्रंथदिंडी, पारंपारिक वेशभूषा, ढोल-ताशांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. भगवान बिरसा मुंडा पुतळा — लोकसहभागातून साकारलेले स्मारक उपपोस्टे लाहेरी — नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन अतिदुर्गम भागातील पोलीस अधिकारी-अंमलदार व नागरिकांना मोठा दिलासा देणारी सुविधा. गडचिरोलीत शांतता, विकास आणि पोलीस–नागरिक सहभागाची नवी दिशा.
MR
0
2
1
189
Ankit Goyal retweetledi
गडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE
गडचिरोलीत मोठी कारवाई — 11 वरिष्ठ माओवादी मुख्य प्रवाहात! पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य श्रीमती रश्मि शुक्ला यांच्या समोर एकूण 11 जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण 2 डिव्हीसीएम दर्जाचे वरिष्ठ माओवादी 3 पीपीसीएम, 2 एसीएम व 4 सदस्य एकूण 11 माओवादी आत्मसमर्पित महाराष्ट्र शासनाने या 11 माओवाद्यांवर घोषित केलेली एकूण रक्कम – 82 लाख रुपये 4 माओवादी गणवेशात शस्त्रांसह आत्मसमर्पण 2025 मध्ये आतापर्यंत 112 माओवादी आत्मसमर्पित — गडचिरोली पोलिस व CRPF यांच्या संयुक्त प्रयत्नांचा मोठा परिणाम! @neelotpal_IPS @DGPMaharashtra @ankitgoyal_ips @DIGGadchiroli @CMOMaharashtra @HMOIndia #GadchiroliPolice #MaoistSurrender #AntiNaxalOperation #C60Commandos #MaharashtraPolice #RashmiShukla #ProjectUdaan #GadchiroliUpdates #NaxalFreeGadchiroli #PeaceAndProgress #Mainstreaming #SecurityForAll #DevelopmentFirst #IndianSecurityForces #CRPF #SafetyFirst #OperationSuccess
MR
0
2
1
194
Ankit Goyal retweetledi
गडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE
पोलीत ब्युरो सदस्य व केंद्रीय समिती सदस्य मल्लोजुला वेनुगोपाल राव ऊर्फ भुपती ऊर्फ सोनूसह ०२ डिकेएसझेडसी सदस्य, १० डिव्हीसीएम दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह एकूण ६१ माओवाद्यांनी एकूण ५४ अग्निशस्त्रांसह माओवादी गणवेशात केले मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म. रा. श्री. देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis समोर आत्मसमर्पण महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकुण ०५ कोटी २४ लाख रुपयांचे बक्षिस गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सन २०२५ मध्ये आतापर्यंत एकूण १०१ माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण मान्यवरांच्या हस्ते आत्मसमर्पित माओवाद्यांना एस.आर.ई निधीतून धनादेशाचे वितरण आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनासाठी सर्व आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना एकत्रितपणे एकूण ३ कोटी ०१ लाख ५५ हजार रुपयांचे बक्षिस मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म. रा. श्री. देवेंद्र फडणवीस यांचेकडून गडचिरोली पोलीस दलातील सर्व अधिकारी व अंमलदार यांच्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल जाहिर केले एक कोटीचे बक्षीस #MaoiestSurrander #GadchiroliPolice #PoliceforPublic @DGPMaharashtra @CMOMaharashtra @AIRNewsHindi @airnewsalerts @HMOIndia
गडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE tweet mediaगडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE tweet mediaगडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE tweet mediaगडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE tweet media
MR
0
2
4
508
Ankit Goyal retweetledi
गडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE
25 ऑगस्ट 2025 रोजी गडचिरोलीत मोठी माओवाद विरोधी कारवाई... कोपर्शी जंगलात नारायणपूर सीमेवर माओवादी बसल्याची मिळाली होती माहिती... भर पावसातही अभियान न थांबवता पथकानी राबवली शोध मोहीम... 8 तासांच्या भीषण चकमकी नंतर... एकूण 4 माओवादी1 पुरुष 3 महिला यांना कंठस्नान घालण्यात आले... घटना स्थळावरून 4 अग्निशस्त्रांसह मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य जप्त केले... अभियाना दरम्यान दोन ठिकाणावरील माओवाद्यांचा तळ देखील उध्वस्त... #GadchiroliPolice #C60Commandos #CRPF #MaoistEncounter #AntiMaoistOperation #MaoistFreeGadchiroli #WarAgainstMaoism #Gadchiroli @CMOMaharashtra @DGPMaharashtra @DIGGadchiroli @neelotpal_IPS @ankitgoyal_ips @InfoGadchiroli @DM_GADCHIROLI @MahaDGIPR @HMOIndia @hmo_maharashtra @DDNewslive @airnewsalerts
MR
0
1
1
270
Ankit Goyal retweetledi
गडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE
गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ यांच्या माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत चार जहाल माओवाद्यांना कंठस्नान एक पीपीसीएम दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह तीन सदस्य पदावरील माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकूण 14 लाख रुपयांचे बक्षिस प्रतिकूल हवामानादरम्यान 48 तासांपेक्षा अधिक चाललेल्या अभियानात घटनास्थळावरुन 01 एस.एल.आर., 02 इन्सास व एक .303 रायफल असे एकूण 04 अग्निशस्त्रे जप्त सुमारे आठ तास चाललेल्या चकमकीनंतर महाराष्ट्र–नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर 01 पुरुष व 03 महिला असे एकुण 04 माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले. सदर चारही मृतक माओवाद्यांची ओळख पटली आहे. खालील प्रमाणे अग्निशस्त्रे व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. 1. SLR रायफल - 01 2. INSAS रायफल – 02 3. .303 रायफल – 01 4. जिवंत काडतूस – 92 5. वॉकी टॉकी – 03 #GadchiroliPolice #C60Commandos #CRPF #MaoistEncounter #AntiMaoistOperation
गडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE tweet media
MR
0
1
3
251
Ankit Goyal
Ankit Goyal@ankitgoyal_ips·
I think the batting depth is still not enough. Next match we should play 11 batters, who needs proper bowlers anyways. #INDvsENGTest
Ankit Goyal tweet media
English
3
1
21
2.5K
Ankit Goyal retweetledi
गडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE
शौर्याला सलाम! ०३ जुलै या दिवशी मौजा गट्टा (जां.) व गट्टा (फु.) येथे माओवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना विनम्र अभिवादन! जय हिंद! वंदे मातरम्! #Shaheed #MartyrsTribute #GadchiroliPolice #SaluteToHeroes #गडचिरोली_पोलीस #शहीद_जवान
गडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE tweet media
MR
0
1
3
306
Ankit Goyal retweetledi
गडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE
२ जुलै २००४ रोजी गडचिरोली पोलीस दलातील शहीद पो.शि./२४४० कोमल भानारकर यांना मौजा गट्टा (जां.) येथे माओवाद्यांच्या हल्ल्यात शौर्याने लढतांना शहीद झालेल्या वीर जवानास विनम्र अभिवादन! त्यांचे बलिदान अमर आहे... #Shaheed #MartyrsTribute #GadchiroliPolice #SaluteToHeroes
गडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE tweet media
MR
0
1
2
250
Ankit Goyal retweetledi
Ankit Goyal
Ankit Goyal@ankitgoyal_ips·
India-Pak conflict to Meghalaya murder to Gujarat flight accident. Some in TV news media keep sinking further every passing day. Invent facts; shove mike in the face of the grieving ; give out names and details; use AI to show faces of deceased. No low is too low. #planecrash
English
0
1
11
2.7K
Ankit Goyal retweetledi
गडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE
नवजीवनाची नवी सुरुवात... मा. मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत गडचिरोली विभागीय समितीचा प्रभारी, गिरीधर आणि ललीता यांच्यासह एकूण १३ आत्मसमर्पित माओवादी दाम्पत्य झाले विवाहबद्ध #NewBeginnings #SurrenderToPeace #GadchiroliTransformation #CM #MaoistRehabilitation #GadchiroliPolice
गडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE tweet mediaगडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE tweet media
MR
1
1
0
257
Ankit Goyal retweetledi
गडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE
माओवादविरोधी अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणारे अपर पोलीस अधीक्षक (अभियान) व सी-६० जवानांचा मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार #AntiNaxalOperation #GallantryInAction #C60Commandos #BraveheartsOfGadchiroli #APPAwardedForExcellence #SaluteToOurForces
गडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE tweet mediaगडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE tweet mediaगडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE tweet media
MR
0
1
3
298
Ankit Goyal retweetledi
गडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE
१२ जहाल वरिष्ठ माओवाद्यांनी मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या समोर गडचिरोली येथे आत्मसमर्पण केले. महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकुण ०१ कोटी १२ लाखाचे बक्षिस #GadchiroliPolice #Surrender #DevendraFadnavis
गडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE tweet mediaगडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE tweet mediaगडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE tweet media
MR
0
1
4
282