@mybmc@mybmchealth
मी ही तक्रार D ward मधे केली होती पण त्यावर काहीच कारवाई झालेली दिसत नाही.. 7 महिने उलटून गेले. इतकी गंभीर बाब असूनही कारवाई ला इतका विलंब का?
कृपया चौकशी करून उत्तर कळवावे. 🙏
@MumbaiPolice@CPMumbaiPolice@DGPMaharashtra@MTPHereToHelp केलेल्या एकाही तक्रारीवर कारवाई होत नाही. मान्य आहे की राजकीय दबावामुळे पोलिसांना कधीच प्रामाणिकपणे त्यांचं काम करता येत नाही पण सामान्यांचे वाली तुम्हीच निदान त्यांना न्याय मिळत नसेल तर त्यांच्याशी चांगली वागणूक ठेवा साहेब.. सामान्यांच्या नजरेत खरे hero रहा 🙏
@MumbaiPolice@CPMumbaiPolice@DGPMaharashtra@MTPHereToHelp गेल्या काही वर्षांपासून मुंबई काय संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांचा दर्जा खालवला आहे. गुंडगीरी व जनतेची पिळवणूक पोलिसांद्वारेच जास्त होत आहे. पोलिसांचे कर्तव्य आहे ही नागरिकांना सुरक्षित ठेवावे पण आज पोलिसांकडूनच सामान्य नागरिक सुरक्षित नाही.
🔸As per the instructions of Hon. @CPMumbaiPolice Shri. Deven Bharti, Grievance Redressal Day was organised on 4th April 2026, Saturday across all police stations under the supervision of the Jt. CP (L&O).
On this occasion, Addl. CPs and DCPs also visited the Police Stations and guided them. All ACPs and Senior Police Inspectors addressed the complaints and took appropriate action on the registered cases and reported crimes.
In case of any crime against women, citizens are requested to contact our helpline number 1090 or Dial 100/112
🔸 दि. ४ एप्रिल २०२६ रोजी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये मा. @CPMumbaiPolice श्री. देवेन भारती यांच्या आदेशानुसार व पोलीस सह आयुक्त (का.व सु.) मुंबई यांच्या देखरेखीखाली महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी तक्रार निवारण दिवस आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त व पोलीस उप आयुक्त यांनी भेटी देऊन मार्गदर्शन केले. विभागीय सहायक पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तक्रारदरांच्या तक्रारी / तक्रार अर्ज/ दाखल गुन्हे यावर कार्यवाही करत निवारण केले.
महिलांविरुद्ध कोणतेही गुन्हे घडल्यास, नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांक १०९० किंवा १००/११२ डायल करून संपर्क साधावा.
#MumbaiPolice4All
@MTPHereToHelp एक विनंती आहे, तक्रार केल्यावर त्या तक्रारीवर काय कारवाई केली हे कळवावे जे ने करून आम्हा नागरिकांना प्रोत्साहन मिळेल आणि चुकीच्या गोष्टींना आळा घालता येईल.
@TV9Marathi@MTPHereToHelp
ही गाडी नेमकी भारत सरकारची की TV9 मराठी ची? की TV9 मराठी हा भारत सरकारचा channel आहे. नक्की काय समजावं? प्रसार मध्ये सरकारची की स्वतंत्रसंस्था ? Traffic यंत्रणा करवाई करेल का ह्या गाडीवर ?
@MumbaiPolice@mnsadhikrut
इतकी गंभीर दुखापत झाली असताना देखील तो अंगावर येऊन आमच्याशी भांडत होता.
कृपया अश्या मुजोर taxi चालकांवर कारवाईसाठी कठोर पावले उचला. मागेदेखील माझ्या भावाच्या बायकोला delivery साठी सकाळी 4 च्या सुमारास दवाखान्यात न्हेण्यास एकही taxi चालक तयार झाला नाही
वाळकेश्वर येथे कवळेमठ BMC शाळेसमोर हा taxi चालक medical emergency असताना भाडे नाकारतो. माझ्या मावशीला काल डोक्याला दुखापत झाली आणि डोक्यातून खूप प्रमाणात रक्त वाहत होते तरी हा दवाखान्यास न्हेण्यास नकार देत दादागिरी करत mobile वर timepass करत होता. @MumbaiPolice@mnsadhikrut
@MumbaiPolice@CMOMaharashtra@mybmc तक्रारीची दखल घेतली जाईल का नक्की?नाही तर दिखाव्यासाठी वर्दी घालू नका आणि ही तक्रार प्रणाली बंद करा. महाराष्ट्र पोलीस प्रशासन इतक निष्क्रिय झालंय की असून नसल्यागत आहे. मुंबईत ठीक ठिकाणी रात्री 12 नंतर पहाटेपर्यंत सररास फटाके फोडले जात आहेत.
@MumbaiPolice@mybmc महालक्ष्मी race course समोरील SRA च्या इमारतीतील परिसरात रात्री 2 वाजायला आले तरी जोर जोरात फटाके फोडले जात आहेत. फटाके फोडण्यावर ह्या परिसरात वेळेचे निर्बंध नाही का? घरात 3 महिन्याचे मुलं सारखं फटाक्याच्या आवाजाने डचकून घाबरून उठत आहे. कृपया कारवाई करा. 🙏
@mybmc@MoHFW_INDIA@DGPMaharashtra@MumbaiPolice@CMOMaharashtra
वाळकेश्वर येथील सार्वजनिक शौचालये नशेडी आणि दारुड्याचा अड्डा झाला आहे. वारंवार तक्रारी देऊन काहीच कारवाई होत नाही. काही ठराविक नशेड्यामुळे इतर नागरिकांना ही सुविधा घेता येत नाही. कृपया ह्यावर कायम तोडगा काढावा. 🙏
@MumbaiPolice@MalbarHillPS@CMOMaharashtra@mybmc@DGPMaharashtra@MoHFW_INDIA नशेड्याचा उपाद्रव वाढत आहे. इथे काही मुली आणून इतर गंभीर गोष्टी होऊ लागल्या आहेत. काही दारुडे दुरून येतात इथे रात्रभर blade-सुरे घेऊन बसतात, धिंगाने घालतात. पोलिसांनी काही दिवस खासकरून शनिवार रविवारीच्या संध्याकाळी 7ते रात्री 12 दरम्यान इथे अचानक येऊन petrolling करावी.
@MumbaiPolice@MalbarHillPS@CMOMaharashtra@mybmc@DGPMaharashtra@MoHFW_INDIA या आधी बऱ्याच call वर तक्रार दिलेली, पोलिस येत नाहीत. मी online तक्रारही दिलेली मुळात एकदा येऊन काही नाही पोलिस येत पर्यंत ते निघून जातात. पोलिसांनी काही दिवस इथे petrolling मोहीम राबवावी. अन्यथा BMC ने हे शौचालय तोडून टाकावे