Dheeraj Fartode retweetledi

सेव्ह लाईफ इंडियासोबत नागपूर ग्रामीण पोलिस राबवत असलेल्या 'झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट' प्रकल्पांतर्गत केलेल्या उपाययोजनांमुळे २०२५ मध्ये नागपूरच्या ग्रामीण भागात अपघात व मृत्यूंमध्ये घट होताना दिसत आहे. खरे तर, यावर्षी पावसाळा जास्त काळ टिकला व दक्षिण भारतातील सर्वच राज्यांमधून प्रयागराज कुंभमेळ्यासाठी होणारी सर्व वाहतूक नागपूर ग्रामीणच्या राष्ट्रीय महामार्गांवरून झाली. असे असूनही, २०२५ मध्ये अपघातांमध्ये घट झाली.
नागपूर ग्रामीण पोलिसांचे यासाठी कौतुक करतो. नावीन्य, सातत्य, प्रयत्न व सुरक्षेची हमी या चतुसूत्रीवर हा बदल होतो आहे. मी ग्रामीण पोलिस अधीक्षक श्री. हर्ष पोद्दार व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो.
पूर्वी नागपूर जिल्ह्याचा अपघातांच्या बाबतीत देशातील अव्वल जिल्ह्यांमध्ये समावेश होत असे. परंतु मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी व केंद्रीय परिवहनमंत्री मा. @nitin_gadkari जी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आणि इतर संस्थांनी केलेल्या कामामुळे, २०२४ आणि २०२५ मध्ये प्रथमच अपघातांमध्ये घट होऊ लागली आहे.
नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला याबदलाचा अभिमान तर आहेच, शिवाय नागपूर जिल्हा रस्ते वाहतुकीसाठी सुरक्षित ठरतो आहे, याचे समाधान आहे.
जय हिंद!
@CMOMaharashtra @DGPMaharashtra @NagpurPolice @savelifeindia @TheHitavada1911
#Maharashtra #Nagpur #ZeroFatalityDistrict #RoadSafetyFirst #NagpurRuralPolice #SavingLives

MR

















