मनसे पुणे अधिकृत

1.2K posts

मनसे पुणे अधिकृत banner
मनसे पुणे अधिकृत

मनसे पुणे अधिकृत

@mnspunecity

पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत ट्विटर खाते. Official Twitter Account of Maharashtra Navnirman Sena, Pune.

Pune, Maharashtra Katılım Eylül 2021
13 Takip Edilen4.7K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
मनसे पुणे अधिकृत
२०१२ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ज्यावेळी नाशिक महानगरपालिकेत सत्ता आली तेव्हा नाशिक शहराच्या पुढील २५-३० वर्षांच्या वाढीचा विचार करून मुकणे धरणातून शहरापर्यंत पाईपलाईन आपण करून घेतली. दुर्दैवाने पुणे शहरातील आजवरचे सत्ताधारी अशाप्रकारे भविष्यासाठी तजवीज करताना दिसत नाहीत.
Anil Shidore अनिल शिदोरे@anilshidore

पुण्यात आत्ता सकाळी “पाणी जपून वापरा” अशी घोषणा देत महानगरपालिकेची गाडी फिरत होती.. पुणं हे पाण्याच्या बाबतीत संपन्न शहर होतं. अशी घोषणा मी तरी पहिल्यांदा ऐकली. हे चांगलं चिन्ह नाही. आपण शहरं वारेमाप वाढवून ठेवली पण आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केलेल्या नाहीत.

MR
3
50
261
9.4K
मनसे पुणे अधिकृत
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील ४० एकर जमिनीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सखोल चौकशी व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर अजित पवार व पार्थ पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून आक्रमक आंदोलन करण्यात आले.
मनसे पुणे अधिकृत tweet mediaमनसे पुणे अधिकृत tweet mediaमनसे पुणे अधिकृत tweet mediaमनसे पुणे अधिकृत tweet media
MR
0
0
0
57
मनसे पुणे अधिकृत
पबमध्ये अल्पवयीन मुलांना मद्यविक्री होत असल्याचे पुणे मनविसेने उघडकीस आणल्यानंतर पबवरील निर्बंध कडक करण्यात आले आहेत.
मनसे पुणे अधिकृत tweet media
MR
0
6
26
357
मनसे पुणे अधिकृत retweetledi
साईनाथ बाबर Sainath Babar
सिंहगड रोड माणिकबागेतील उड्डानपूल बनवून तयार आहे पण सत्ताधारी मंत्र्याना वेळ मिळत नाही म्हणून पूल सुरू होत नाही यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde
MR
2
19
112
2.3K
मनसे पुणे अधिकृत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी पुणे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांना गुंड म्हणून, त्यांना धमकी देण्याची भाषा वापरणाऱ्या आयुक्तांचा जाहीर निषेध!
MR
0
6
60
665
मनसे पुणे अधिकृत retweetledi
Anil Shidore अनिल शिदोरे
पुण्याच्या पीएमपीएमएल - सार्वजनिक बससेवा - चे तिकीट-दर १ जूनपासून सुमारे ५०% नी वाढवले आहेत. तिकीट दर इतके का वाढवले, त्यामागचा तर्क काय ह्याबरोबरच तिकिट दर वाढवता आहात, मग सुविधांचं काय हा ही प्रश्न नागरिक विचारत आहेत. पुण्यात १,८८० बसेसनी दररोज साधारण १० लाख प्रवासी प्रवास करत असतात. त्यांना दर्जेदार सुविधा मिळणं हा त्यांचा हक्क आहे. बसेस सतत बंद पडतात, बसथांबे मोडकळीस आलेले आहेत, त्यांच्या जागा योग्य नाहीत, स्वच्छतागृहे नाहीत, बसेस बसथांब्यांवर थांबत नाहीत, चालक कंत्राटावर आहेत अशा अनेक समस्या आहेत. त्या तशाच ठेवून दर वाढवणं योग्य नाही. ह्यावर प्रश्न विचारण्यासाठी सभागृह चालू नाही. त्यामुळे नगरसेवक ह्यावर प्रश्न विचारू शकत नाहीत. जागरूक राजकीय कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी स्वतः आता ह्या विषयावर आवाज उठवला पाहिजे. धन्यवाद, @bharatkardak ह्या प्रश्नाकडे लक्ष वेधल्याबद्दल. #पुणे #खरेप्रश्न
MR
22
64
320
10.9K
मनसे पुणे अधिकृत retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
प्रति, मा.श्री.दादा भुसे शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य, सस्नेह जय महाराष्ट्र, गेले जवळपास २ महिने महाराष्ट्रात पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवणे यावरून सरकारकडून प्रचंड गोंधळ घालणं सुरु आहे. सुरुवातीला पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकवणार आणि त्यात हिंदी भाषा ही तिसरी सक्तीची भाषा असेल असं घोषित केलं गेलं. ज्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला, आणि ज्याच्यामुळे जनभावना तयार झाली. ती जनभावना इतकी तीव्र होती की सरकारने तिसऱ्या भाषेसाठी हिंदी भाषेची सक्ती केली जाणार नाही असं घोषित केलं. मुळात हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, देशातील इतर प्रांतातील भाषांसारखी एक भाषा. ती शिकण्याची सक्ती का केली जात होती ? कुठल्यातरी दबावाखाली सरकार घरंगळत का जात होतं हे माहित नाही. पण मुळात पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा मुलांना का शिकायला लावायच्या हा मुद्दा आहेच. मग त्याबाबत पण आपण घोषणा केलीत की महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील. पण या घोषणेचा लेखी अध्यादेश अजून का आला नाही ? माझ्या महाराष्ट्र सैनिकांची माहिती आहे की आधीच्या तीन भाषा शिकवणे आणि त्यात हिंदीचा समावेश असणे या निर्णयाचा आधार घेऊन, हिंदी भाषेच्या पुस्तक छपाईला केंव्हाच सुरु झाली आहे. आता पुस्तकं छापली आहेत मग पुन्हा आपल्याच निर्णयावर घुमजाव करायचं असं काही करण्याचा सरकारचा काही डाव तर नाही ना ? असं काही नसेल असं मी गृहीत धरतो, पण असं काही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे आंदोलन उभं करेल त्याला सरकार जबाबदार असेल. देशातील अनेक राज्यांनी इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा आणि हिंदीची सक्ती झुगारून दिली, याला कारण त्या त्या राज्यांची भाषिक अस्मिता. ( मंत्री महोदय आपण आपले सहकारी मंत्रिमंडळ हे देखील जन्माने मराठी आहात , आपण इतर राज्यातील हिंदीला विरोध करणाऱ्या शासनकर्त्यां सारखे कधी वागणार आणि आपल्या भाषेची अस्मिता कधी आणि कशी जोपासणार ? ) त्या इतर राज्यांसारखी तीव्र अस्मिता सरकार पण दाखवेल अशी अपेक्षा. त्यामुळे शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील ( मराठी आणि इंग्रजी ) या निर्णयाचा लेखी आदेश लवकरात लवकर जारी करावा. राज ठाकरे ।
Raj Thackeray tweet media
MR
255
569
2.6K
132K
मनसे पुणे अधिकृत retweetledi
ॲड. सुनिल कोरपडे
आज खडकवासला मतदारसंघातील #मनसे उमेदवार #मयूरेश_रमेशभाऊ_वांजळे यांचा उमेदवारी अर्ज #शर्मिलावहिनी_राजसाहेब_ठाकरे यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला. त्यावेळी उपस्थित @RajThackeray साहेबांना मानणारा तरुण वर्ग आणि स्वर्गिय रमेशभाऊ वांजळे मित्र परिवार🚂🚂🚂
ॲड. सुनिल कोरपडे tweet mediaॲड. सुनिल कोरपडे tweet mediaॲड. सुनिल कोरपडे tweet media
MR
5
49
223
4K
मनसे पुणे अधिकृत retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
आज मुंबईत पक्षाच्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्याला संबोधित केलं. त्याची भाषणाची चित्रफीत.. youtu.be/kTzKKpEqyCY
YouTube video
YouTube
MR
34
110
704
37.2K
मनसे पुणे अधिकृत retweetledi
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा ! रविवार १३ ऑक्टोबर २०२४ सकाळी १० वाजता. हॉल नंबर ४, नेस्को, पाश्चिम दुतगती महामार्ग, गोरेगांव (पूर्व) #MNSAdhikrut #RajThackeray #पदाधिकारी_मेळावा
MR
2
71
299
7.9K
मनसे पुणे अधिकृत retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वर्धापनदिन. ९९ वर्ष पूर्ण करत शंभरीत या संघटनेने पदार्पण केलं. याबद्दल प्रत्येक संघ स्वयंसेवकाचं मनापासून अभिनंदन. भारताला आपली मातृभूमी मानणारे सगळे हिंदू आहेत आणि या हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे उद्दिष्ट घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व याचा अभिमान समाजामध्ये व्हावा यासाठी गेली ९९ वर्ष संघाने निःसंशय मोठं काम केलं आहे. संघाचं काम मला कायमच अचंबित करतं. देशात कोणीतही नैसर्गिक आपत्ती आली तर तिथे तात्काळ धावून जाण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अग्रेसर असतो, हे मी अनेकदा पाहिलं आहे. संघातील बर्‍याच स्वयंसेवक व प्रचारकांशी माझा संवाद आहे. देशाच्या दुर्गम भागांमध्ये जाऊन काम करणं, तिथे भारतीयत्वाची, राष्ट्रीयत्वाची भावना रुजवणं, यांसाठी त्यांना किती संघर्ष करावा लागतो याचा तपशील मला माहित आहे. मुळात एका विचाराला घट्ट धरून ठेवत, एखाद्या संघटनेने १०० वर्ष काम करावं हे सोपं नाही. जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना १०० वर्ष टिकली असेल आणि तरीही तिचा विस्तार सुरु असेल आणि ती कार्यशील असेल. ही संघटना कायम जागृत ठेवणाऱ्या सर्व संघ स्वयंसेवकांना माझ्या अतिशय मनापासून शुभेच्छा. हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व रुजवण्यासाठी धडपडणारा प्रत्येक घटक, विचार हा असाच तेवत राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. राज ठाकरे । @RSSorg #RSS100 #RSSFoundationDay #राष्ट्रीय_स्वयंसेवक_संघ
MR
249
1.9K
12.9K
373.8K
मनसे पुणे अधिकृत retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
आपणास दसऱ्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा.☘️ #दसरा #विजयादशमी #महाराष्ट्रधर्म
Raj Thackeray tweet media
MR
67
193
2.4K
80.1K
मनसे पुणे अधिकृत retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
रतन टाटा यांचं निधन झालं. जवळपास १५६ वर्षांची परंपरा असलेल्या एका उद्योग समूहाला ज्यांनी खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकांत आणलं आणि 'टाटा' ही नाममुद्रा ज्यांनी जगभर नेली ती रतन टाटांनी. बरं, हे सगळं करताना एखाद्या योगी माणसाची स्थितप्रज्ञताच ठेवायची ही टाटा समूहाची शिकवण पूर्णपणे अंगीकारायची हे खरंतर कठीण, पण ते रतन टाटांना जमलं. रतन टाटांकडे टाटा समूहाची धुरा आलीच ती जेआरडींसारख्या एका अत्यंत प्रतिभाशाली उद्योजकाकडून. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन सरकारांशी आणि 'लायसन्स राज'शी झगडा करत जेआरडीनी टाटा उद्योगाचे पंख विस्तारले, आणि ते पंख मधून मधून छाटण्याचे उद्योग त्या त्या वेळच्या सरकारने केले. योगायोग बघा की 'लायसन्स राज' संपायला आला आणि उदारीकरणाच्या उंबरठ्यावर असताना रतन टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. भारतीय उद्योगाच्या पायातल्या शृंखला गळून पडल्या, पण पुरेशी ताकद आलेली नसताना ऑलिंपिक्स स्पर्धेत उतरल्यावर जे होईल तशी काहीशी अवस्था भारतीय उद्योग जगाची झाली होती. पण रतन टाटांना खऱ्या अर्थाने जागतिकरण, भारतीय मनांना कसं घडवेल याचा अंदाज होता, आणि भारतीय मनगटं जागतिक बाजारपेठ पेलायला कशी सक्षम आहेत हे देखील अचूक माहित होतं. त्यामुळे कॉफीपासून, हातातल्या घड्याळापर्यंत ते जगातील सगळ्यात मौल्यवान आयटी कंपनी टीसीएस बनवण्यापर्यंत ते ब्रिटिशांचा मानबिंदू असणारी जॅग्वार आणि लँड रोव्हर कंपनी ताब्यात घेण्यापर्यंत अनेक सीमोल्लंघने रतन टाटांनी साध्य केली. स्वतःच छोटेखानी घर असावं हे प्रत्येक भारतीयाचं स्वप्न, हे हेरून टाटा हाऊसिंगची सुरुवात करणारे रतन टाटाच आणि प्रत्येक भारतीयाला परवडेल अशी 'नॅनो' गाडीच्या निर्मितीचं स्वप्न वास्तवात उतरवणारे टाटाच. टेटली, कोरस स्टील, जॅग्वार यासारखे आंतरराष्ट्रीय ब्रँड ताब्यात घेणाऱ्या रतन टाटांना, सामान्य भारतीय माणसाची नस पण अचूक माहित होती. सगळं उभारायचं पण तरीही कशातच गुंतून न पडता, निर्विकार रहायचं हे कोणाकडून शिकायचं असेल तर रतन टाटांकडूनच. माझे आणि रतन टाटांचे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध होते आणि मी एखादी कल्पना त्यांच्यापुढे मांडली आणि रतन टाटांनी त्याला प्रतिसाद दिला नाही असं कधीच झालं नाही. आम्ही मांडलेल्या महाराष्ट्राच्या विकास आराखड्याबाबत त्यांनी केलेल्या सूचना असोत की नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्तेच्या काळात उभारलेल्या 'बोटॅनिकल उद्याना'साठी सीएसआरमधून दिलेला निधी असो, त्यांचा माझ्याबद्दलचा आणि पक्षाबद्दलचा जिव्हाळा अनेकदा दिसून आला. बोटॅनिकल उद्यानाच्या उभारणीच्या वेळेला, सुरुवातीला मंजूर झालेला निधी कमी पडला, पण कामाचा आवाका लक्षात घेऊन, आणि जीव ओतून आम्ही जे काम करत होतो ते पाहून त्यांनी कधीच निधीच्या बाबतीत हात आखडता घेतला नाही. इतकंच नाही ते उद्यान पूर्ण झाल्यावर, त्यांनी ते बघायला यावं अशी विनंती मी केली होती, ज्याला त्यांनी मान देऊन ते स्वतः नाशिकला आले होते. रतन टाटांची अजून एक गोष्ट मला प्रचंड आवडायची ती म्हणजे त्यांचं श्वान प्रेम. आमच्यातली ही एक समानता. ताज हॉटेल समूहाच्या परिसरात असू देत की 'बॉंबे हाऊस' हे टाटा समूहाचं मुख्यालय, तिथे भटक्या श्वानांची पण उत्तम काळजी घेतली जायची. रतन टाटांच्या श्वान प्रेमाबद्दलचा एक किस्सा मी एके ठिकाणी वाचला होता. रतन टाटांना त्यांच्या दातृत्वाचा गौरव करणारा एक खूप मोठा सन्मान लंडनमधल्या बकिंगहॅम राजवाड्यात होणार होता. पण अगदी ऐनवेळेला त्यांनी त्यांचा कार्यक्रम रद्द केला कारण त्यांच्याकडच्या 'टॅंगो' आणि 'टिटो' या दोन श्वानांपैकी एक, खूप आजारी होता. रतन टाटांनी प्रिन्स चार्ल्स यांना कळवलं की अशा स्थितीत मी माझ्या श्वानांना सोडून येऊ शकत नाही. रतन टाटा माणूस म्हणून किती मोठे होते हे या उदाहरणातून जाणवतं. आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला याचं दुःख आहेच, पण एकूणच भारताने कदाचित शेवटचा असा 'कर्तृत्ववान तरीही निर्लेप राहिलेला उद्योजक' गमावला, हे त्याहून मोठं दुःख. छत्रपती शिवाजी महाराजांशी या जगात कोणाचीच तुलना होऊ शकत नाही. पण समर्थ रामदास स्वामींनी महाराजांचं वर्णन जसं अचूक केलं आहे तसं इतर कुठे आढळत नाही. त्यात त्यांनी महाराजांना 'श्रीमंत योगी' म्हणलं आहे, रतन टाटांबद्दल विचार करताना, 'श्रीमंत योगी' ही उपमा तंतोतंत पटते. पण श्रीमंत असून देखील त्यांनी आपल्या श्रीमंतीचा तमाशा कधी मांडला नाही. असा माणूस पुढच्या पिढयांना पहायला न मिळणं ही अधिक दुःखाची बाब. रतन टाटांना माझी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली. राज ठाकरे ।
Raj Thackeray tweet mediaRaj Thackeray tweet mediaRaj Thackeray tweet mediaRaj Thackeray tweet media
MR
228
2K
24.6K
318.8K