
Onkar Jyotsna Parmod Honap
3.2K posts

Onkar Jyotsna Parmod Honap
@onkarhonap
Engineer, reader, Proud Hindu Atheist. Vande Mataram








@i_am_polytheist तसं पाहिलं तर भारतात अनेक महापुरुषांच्या नावावर अनेक ठिकाणे आहेत. पण सावरकरांचे जन्मस्थळ आणि राऊंची राजधानी यांना त्यांचे नाव नाही.












Daily Reminder : INDIA WAS, IS & WILL ALWAYS BE HINDU NATION.











हिंदूंना अडगळ म्हणणारे, एन्काऊंटर मध्ये मारलेल्या दहशतवाद्यांविषयी उमाळा फुटणारे, नक्षलवाद्यांचा उदो उदो करणारे आणि 'पुरोगामी' हे गोंडस नाव वापरून देवी देवतांचा अपमान करणारे टोळके सध्या खूप अस्वस्थ झाले आहे. या कथित पुरोगाम्यांच्या बुडाखाली जाळ लावणारा निकाल काल महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत लागला. लिब्रांडू कंपू जिवाच्या आकांताने लढला पण निवडणूक हारला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) निवडणुकीत साहित्य संवर्धन आघाडी विजयी झाली. उरी, दृश्यम व अनेक नामांकित चित्रपटात संस्मरणीय भूमिका साकारलेले अभिनेता, चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर, जगद्गुरू तुकोबाराया यांचे विचारदर्शन नाट्यकृतीतून घडवणारे ध्येयवादी कलावंत व लेखक योगेश सोमण यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदा साठी झालेल्या निवडणुकीत विजय झाला. प्रमुख कार्यवाह म्हणून श्रीमती स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष पदावर प्रदीप निफाडकर, स्थानिक कार्यवाह म्हणून सुनील महाजन, प्रसाद मिरासदार, श्री. संगमनेरकर, सौ. सुनेत्रा मंकणी असे सर्व सहकारी विजयी झाले. निकालाला 24 तास पूर्ण व्हायच्या आत पुरोगाम्यांचे अजीर्ण बाहेर पडू लागले आहे. लिब्रांडूंचे खरे दुःख कोणते ? तर त्यांना आता हिंदू विरोधी narrative पसरवण्यासाठी हाती असलेले व्यासपीठ गमवावे लागले आहे. यापुढे त्यांना SAVE GAZA ची बाजू कुठून मांडायची हा प्रश्न पडला आहे. खोमेनी साठी अश्रू ढाळणाऱ्या या कथित विचारवंतांचा महाराष्ट्रातील मसापच्या सुज्ञ मतदारांनी पराभव केला आहे. निकालाला 24 तास लागायच्या आत जळून खाक झालेल्या कंपूने पोस्ट व्हायरल करणे सुरू केले. साहित्य संवर्धन आघाडीचे योगेश सोमण आणि टीम निवडून आल्याच्या जळफळाट त्यात आहे. तिकडे विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदावर गिरीश गांधी विक्रमी मताधिक्याने विजयी झाले त्याही मिरच्या झोंबल्याचे पोस्ट वरून स्पष्ट दिसते आहे. भाजपने म्हणजेच संघाने हिरीरीने सर्व राजकीय फंडे वापरून महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक लढवली आणि जिंकलीही, असे सांगून संघ व भाजपावर टीका करण्याची संधी या लेखक महाशयांनी घेतली आहे. मसाप वर 'सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः' हे वैचारिक अधिष्ठान असलेल्या प्रखर राष्ट्रवादी विचारांची मंडळी आरूढ होताच साहित्यिकांचा दर्जा किती खालावलेला आहे, याचे दिव्यज्ञान लेखक महोदयांना प्राप्त झाले आहे. बऱ्या पैकी नाव असलेल्या व पुरोगामी बाजार बुणग्यांनी डोक्यावर घेतलेल्या या लेखक महोदयांनी एक काम चांगले केले. त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आजीव सदस्यत्वाचा तात्काळ राजीनामा दिला आहे. एकूणच यांच्या साहित्य दर्जाचा प्रत्यय यांनी मसापच्या निवडणूक निकालाच्या 24 तासांच्या आत दिला. गर्दीत हरवलेल्या माणसाला चेहरा नसतो. धर्म ही अफूची गोळी आहे. नक्षलवाद्यांची स्वतःची एक बाजू आहे, असे माओचे तत्वज्ञान समाजवादाचा बुरखा पांघरून, धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा लावून आणि पुरोगामीत्वाचा आव आणत सांगणारे लोक आता मसापवर नाहीत हे दुःख बिचारे लपवू शकत नाहीत. हिंदूंना अडगळ म्हणायचे आणि त्याचा डांगोरा पिटायचा हे मसापच्या मतदारांनाही आता मान्य नाही, हे यांना समजून सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच ! - शिवराय कुळकर्णी प्रवक्ता, भाजपा, महाराष्ट्र





