𝓜𝓪𝓭𝓱𝓪𝓿
3.5K posts

𝓜𝓪𝓭𝓱𝓪𝓿
@smadhav_47
#maharashtradhram #nisargpremi #durgpremi #tweets personal.
marathwada Katılım Ekim 2015
699 Takip Edilen138 Takipçiler
𝓜𝓪𝓭𝓱𝓪𝓿 retweetledi

नवी मुंबई महानगरपालिकेच्या 80 शाळांपैकी जवळपास 80 टक्के शाळांची पटसंख्या अत्यंत उत्तम आहे; याचे आम्ही पुराव्यासह दाखलेही दिले होते. असे असतानाही त्या शाळा सरसकट बंद करून तिथे इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु करण्यामागचा नेमका हेतू काय? - गजानन काळे
#GajananKale #MumbaiNews #mumbai #PoliticalNews #marathinews #viral #thodkyaat

MR

🗓️ ३० एप्रिल २०२६ | 📍 लोणावळा
नाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच मिळाले पाहिजे!
आज सकाळी पुणे विभागातील लोणावळा बसस्थानकास भेट देऊन तेथील प्रवासी सेवा-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी बस डेपो कर्मचारी आणि प्रवाशांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या.
प्रवाशांशी संवाद साधला असता, बसस्थानकावर विक्री होत असलेली ‘नाथजल’ची एक लिटरची थंड पाण्याची बाटली २० रुपयांच्या वाढीव दराने विकली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. उन्हाळ्यात बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना ‘नाथजल’चे थंडगार पाणी केवळ १५ रुपयांना मिळाले पाहिजे. किंमत वाढवून विक्री करताना आढळल्यास संबंधितांचा विक्री परवाना रद्द केला जाईल, असा इशारा दिला. त्याचप्रमाणे, संबंधित विक्रेत्यास स्पष्ट दरफलक लावण्याच्या सूचना देखील दिल्या.
दरम्यान, लोणावळा बसस्थानकावर येणाऱ्या काही बसफेऱ्या बसस्थानकात न येता पुढे जात असल्याची तसेच काही बसेस जाणीवपूर्वक खाजगी हॉटेलांवर थांबत असल्याची तक्रार प्रवाशांनी यावेळी मांडली. या हॉटेलांवरील महागडे खाद्यपदार्थ प्रवाशांना परवडत नसल्यामुळे, वेळापत्रकातील सर्व बसफेऱ्या नाश्त्यासाठी लोणावळा बसस्थानकावरच थांबाव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली. त्यानुसार, कोणतीही बस खाजगी हॉटेलांवर न थांबता नियोजित वेळापत्रकानुसार लोणावळा बसस्थानकावरच थांबावी, असे स्पष्ट निर्देश एसटी प्रशासनाला दिले.
या पाहणीदरम्यान बसस्थानकातील स्वच्छता, प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधा, तिकीट व्यवस्था तसेच इतर मूलभूत सोयींचा सविस्तर आढावा घेतला. प्रवाशांना अधिक दर्जेदार व सुलभ सेवा मिळावी यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
@msrtcofficial
#PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #LonavlaBusDepot #inspection




MR
𝓜𝓪𝓭𝓱𝓪𝓿 retweetledi

सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत पोलिसांकडून डिसेंबर २०२४ रोजी खून झाला;
तेव्हा राज्य सरकारने मानव हक्क आयोगाच्या नियमानुसार १० लाखांची मदत सोमनाथच्या आईकडे सुपूर्द करण्यासाठी पाठवली.
तेव्हा त्या आईने मला पैसे नकोत माझ्या मुलाला न्याय हवा आहे म्हणत हि मदत नाकारली.
सोमनाथच्या आईने ना कुठले राजकारण केलं, ना तिच्या मुलाचा खून केलेल्या पोलिसांच्या जाती शोधून त्या जातीला लक्ष्य केलं किंवा गावोगावी फिरून पैसे गोळा केले. याउलट सोमनाथसाठी परभणी ते मंत्रालय जो मोर्चा निघाला तो मोर्चा सुरेश धसने नाशिकात जाऊन वापस पाठवला.
सोमनाथची परिस्थितीने गरीब असलेली आई स्वाभिमानी होती आणि तिने थेट हायकोर्टात दाद मागितली. हायकोर्टाने सोमनाथला मारहाण केलेल्या पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करायला लावला.
सोमनाथच्या आईने त्यानंतर कधी मिडियाला बाईट दिली नाही किंवा प्रकरण तापवून त्यातून पैसा कमावला नाही.न्याय मागणारे असे लोक क्वचितच असतात नाहीतर न्यायाचे भांडवल करून माया जमवणारे लोक तर फुटफुटावर दिसायला लागतात.ते दिसले की मला सोमनाथच्या लढाऊ आईचा चेहरा डोळ्यासमोर तरळून जातो.
© रविकुमार सुभाषराव.

MR

@amolmitkari22 स्वर्गीय अजित पवार यांच्यावर तुमच, जनतेच प्रेम आहे, तुम्हाला मोठ केलं, आमदार केलं..
इतपर्यंत ठीक पण आता एकाच घरात किती पदे असावी,
विधान सभा,राज्यसभा,लोकसभा, आणि आता विधानपरिषद सदस्य..
बस पुरे
एखाद्या गरीब कार्यकर्त्याला होऊ द्या आमदार..
MR

विधानपरिषदेवर जाण्यासाठी इच्छुक असलेल्या पक्षातील अनेक इच्छुक उमेदवारानी माझ्या मताला सहमती दाखवत मला संपर्क करून जय दादा यांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी पाठिंबा दर्शविला .फक्त माझी इतकीच विनंती की लिखित स्वरुपात त्यांनी तसा तो पक्ष श्रेष्ठीना द्यावा जेणेकरून आपल्या दादांना ती खरी आदरांजली ठरेल #विधान परिषद निवडणूक …
MR

'महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी शिकावंच लागेल. 1 मेपासून मराठी सक्तीची मोहीम सुरू राहणार असून, 15 ऑगस्टपर्यंत अप्रत्यक्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत आरटीओ अधिकारी अमराठी रिक्षा चालकांना मराठी शिकवणार'. - प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
.
.
.
#marathilanguage #maharashtra #businessrules #marathicompulsory #LanguagePolicy

MR
𝓜𝓪𝓭𝓱𝓪𝓿 retweetledi

@PratapSarnaik @msrtcofficial मराठी सक्तीचा निर्णय मागे घेऊ नका..
उत्तम निर्णय..
प्रत्येक बस स्थानकावर कर्मचाऱ्यांना असणाऱ्या विश्रांती गृहाची अवस्था खराब आहे.. प्रवाश्यांची प्रसाधन गृह यांची अवस्था देखील खराब आहे..याकडे देखील लक्ष देण्याची नितांत गरज आहे
MR

एसटीचा कायापालट; चालक करणार प्रवाशांचे स्वागत
१ मेपासून' आपली बस, आपली सेवा' मोहिमेस प्रारंभ
आजच्या वृत्तपत्रातील महत्वाच्या बातम्या 📰
@msrtcofficial
#PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #CourteousService #News




MR
𝓜𝓪𝓭𝓱𝓪𝓿 retweetledi

पक्ष फोडण्यात भाजपा हा आता इतका सराईत बनला आहे की तो आता पक्ष नव्हे लोकशाहीचा सिरीयल किलर झाला आहे
त्यात महाराष्ट्राच्या केसमध्ये पक्षांतर बंदी कायद्याबद्दल निकाल न देणाऱ्या चंद्रचूड यांचाही हातभार आहेच
पक्ष फोडणे, आमदार फोडणे ही जुनी गोष्ट
राज्यसभेत पक्ष फोडणे हा लोकशाहीचा डबल मर्डर आहे
कारण या खासदारांना पंजाब मधल्या आपच्या आमदारांनी निवडून दिले आहे
राज्यसभेत दोन तृतीयांश आप खासदार भाजपने पळवले पण आमदारांच्या मतालाही अप्रत्यक्षपणे हायजॅक केले
MR

@abpmajhatv सरकारची अशी कोणती नस दाबली गेली आहे..
की यांच्या विरोधात भारतातला कोणताच व्यक्ती बोलत नाहीये किंवा याची विधाने खोडून काढत नाहीये..सतत भारताचा अपमान करतो.
MR

Donald Trump: 'पोरं इथं जन्माला घालून नागरिकत्व मिळताच भारतासारख्या नरकातून इथं अख्खं कुटूंब घेऊन येतात आणि...' ट्रम्प यांची भारत आणि भारतीयांवर तळपायातील आग मस्तकात जाणारी वर्णभेदी टीका marathi.abplive.com/news/world/don…
MR

@PratapSarnaik फक्त निर्णय मागे घेऊ नका किंवा त्यात तडजोड करू नका
आहे त्या निर्णयावर ठाम रहा..मराठी न बोलणाऱ्याचे परवाने रद्द होऊन गावी गेले तरी काही हरकत नाही..राज्यात खूप बेरोजगार तरुण आहेत
ते रिक्षा, इतर वाहन चालवतील त्यांच्या हाताला तरी काम मिळेल..
MR

महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, तर मराठीचा वापर अनिवार्यच!
#Pratapsarnaik #Transportminister #compulsorymarathidecision #Autotaxi #Marathiabhyas
MR

@AsimSarode शिवसेनेने असल्या लोकांना मोठंच का केलं असाव..
पुस्तकाचे वाचन केले असते तर समजलं असतं
विरोध का करतोय
वरून जीवे मारण्याची भाषा .. न्यायालयाने किंवा सरकारनं परवाना दिला आहे का ?
MR

बुलढाण्यात लवकरच 'शिवाजी कोण होता' या पुस्तकांचे जाहीर वाचन. संजय गायकवाड काय करतो बघूया.
खालील ऑडिओ संवाद ऐका. आमदार संजय गायकवाड यांची भाषा बघा. 1988 मध्ये प्रकाशित शिवाजी कोण होता या गोविंद पानसरे सर यांच्या पुस्तकाच्या शिर्षकात 'शिवाजी कोण होता' असा एकेरी उल्लेख का? असा संजय गायकवाड चा आक्षेप आहे. व त्यासाठी त्याने पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आबी यांना फोन करून अत्यंत अश्लील, अर्वाच्य शिव्या दिल्या. त्याच भरात संजय गायकवाड असे म्हणाला कि, शिवाजी महाराज तुया मायचा नवरा होता असे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान केला.
सॅल्यूट केला पाहिजे प्रशांत आंबी या प्रकाशकाला कि भाषेचा स्टार, आवाजातील स्वर ढळू न देता अत्यंत संयमित पद्धतीने त्याने गुंड प्रवृत्तीच्या आमदार संजय गायकवाड याच्या सोबत संवाद केला.
आत्ताच माझे प्रशांत सोबत बोलणे झाले. संजय गायकवाड विरोधात लवकरच पोलिसांकडे तक्रार दाखल करणार. संजय गायकवाड आमदार आहे म्हणजे शिवीगाळ करण्याचे, कुणालाही मारहाण करण्याचे लायसन्स त्याला मिळालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या आई प्रमाण हृदयातील स्थान देऊन ' शिवाजी' म्हणणं म्हणजे महाराजांचा अपमान नाही. बरं संजय गायकवाड सारखे अशिक्षित, अडाणी प्रवृत्तीचे लोक पूर्ण पुस्तक वाचत शुद्ध नाहीत व इतरांना शिवीगाळ सुरु करतात. आता अश्या मूर्खतेला कायद्याच्या मदतीने नेहमीसाठी लगाम लावावा लागेल.
instagram.com/reel/DXdmHfJk-…
MR

Mumbai | Lady Viral Video | भाजपच्या मोर्च्यात स्थानिक महिलेचा आक्रोश
#mumbai #bjp #protest #angrylady #trafficjam #girishmahajan #ndtvmarathi
MR

@hemantdhome21 मराठीच्या मुद्द्यावर बोलणारे फक्त तुम्हीच एकटे कलाकार आहात जे सतत मराठीच्या बाजूने मत मांडत असता
बाकी कलाकार तर फक्त सिनेमा आला तेंव्हाच दिसतात
मराठी सिनेमा मराठी प्रेक्षक पाहत नाहीत, मराठी सिनेमा चालले पाहिजेत, सिनेमे कसे बनवायचे
फक्त ओरड..
MR

१५ लाख आहेत म्हणजे… मोठा आकडा आहे आणि या पंधरा लाखांना मराठी नकोय?
एक काम करा म्हणावं… जिथे जमणार आहात तिथुन तसेच आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा! तिथे कमवा आणि खा!
महाराष्ट्रात मराठी बोला! शिका, प्रयत्न करा!
Maharashtra Times@mataonline
मराठी सक्तीच्या विरोधात ४ मे पासून १५ लाख रिक्षाचालक संपावर जाणार ! #pratapsarnaik #Marathi #RikshaDriver #MarathiNews #news
MR

@TV9Marathi तुमच्याकडून पक्ष हिसकून घेतला, सध्या त्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत,
पक्ष व चिन्हाबद्दल सुप्रीम कोर्ट मध्ये तुम्ही एकमेकांविरोधात आहात..
कशाला लढत आहात कोर्ट मध्ये...केस मागे घ्या आणि व्हा विलीन पक्षात..
MR

'गेल्या सहा दशकांपासून बारामतीकर आणि पवार कुटुंबामध्ये एक वेगळंच, जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं आहे. यंदा बारामतीत एक नवा विक्रम प्रस्थापित होणार आहे. या भारत देशात सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा मान बारामतीला मिळणार आहे. खरं तर वहिनींची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी माझी इच्छा होती; मात्र आता विक्रमी मतदान नक्की होईल'. - सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी (शरद पवार गट)
.
.
.
#BaramatiNews #supriyasulefc #MaharashtraPolitics #election #NCP

MR
𝓜𝓪𝓭𝓱𝓪𝓿 retweetledi

@mohol_murlidhar @narendramodi @PMOIndia @BJP4India @Dev_Fadnavis @AshwiniVaishnaw @BJP4Maharashtra पुण्यावरून छ.संभाजी नगरला जाण्यासाठी फक्त एक गाडी तेही हडपसर ठिकाणाहून पुणे स्टेशन ला फ्लॅटफॉर्म उपलब्ध नाही म्हणून..किती गैरसोय प्रवाशांची
मराठवाड्याला जोडण्यासाठी नवीन गाडी चालू होणे गरजेच आहे.
नांदेड - पुणे वंदे भारत पुढे काय झालं कधी चालू होणार की कागदावरच धावणार..
MR

पाठपुराव्याला यश; पुण्यनगरी ते काशी विश्वनाथ नगरी ‘अमृत भारत’ एक्स्प्रेसला मंजुरी !
धन्यवाद, मोदी सरकार !
@narendramodi
@PMOIndia
@BJP4India
@Dev_Fadnavis
@AshwiniVaishnaw
@BJP4Maharashtra


MR

राष्ट्रवादी-शिवसेनेला धडा शिकवण्यासाठीच अशोक खरात प्रकरणाचा 'युद्धपातळीवर' तपास; श्याम मानव यांचा आरोप
marathi.abplive.com/news/politics/…
#shyammanav #AshokKharat #maharashtra #MarathiNews

MR

@PratapSarnaik वेटींग च्या मुलाला परत परत बोलण्यापेक्षा नवीन जाहिरात काढा
वेटींग पण किती वर्ष असावी याची कालमर्यादा असेल ना
1,2 वर्ष पण 2016,2019 च्या भरतीमधील उमेदवारांना देखील बोलावण्यात येत आहे..
किती दिवस तीच भरती चालू ठेवायची
यापेक्षा नवीन भरती काढा..
MR

🗓 १८ एप्रिल २०२६ | कोल्हापूर
“बापाच्या अश्रूंना न्याय; २४ तासांत बदलीचा आदेश!”
कोल्हापूर दौऱ्यावर असताना रुकडी फाट्यावर काही ग्रामस्थांसह उभ्या असलेल्या नायकू गवाणे यांनी आपला मुलगा एसटी चालक अमोल गवाणे याच्या बदलीसाठी कळकळीची विनंती केली. आपल्या उतारवयात आधार असलेला मुलगा जवळ असावा, ही साधी पण अत्यंत भावनिक मागणी त्यांनी यावेळी माझ्यासमोर मांडली.
ग्रामस्थांनी हात दाखवताच ताफा थांबवण्याचे आदेश दिले व भर उन्हात उभे असलेल्या त्या वृद्ध बापाची व्यथा जातीने ऐकून घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना फोन करून “ताबडतोब बदलीचे आदेश काढा” असा स्पष्ट निर्देश दिला.
संबंधित अधिकारी तातडीने कामाला लागले आणि या आदेशाची पूर्तता संध्याकाळी सहा वाजेपर्यंत झाली व संबंधित विभागाला बदली आदेश प्राप्तही झाला.
या आधीही खासदार धैर्यशील माने यांनीही एका पत्राद्वारे व फोन करून या प्रकरणी अमोल गवाणे यांच्या कौटुंबिक अडचणी लक्षात घेऊन सिंधुदुर्ग विभागातून कोल्हापूर विभागात बदली करण्याची मागणी केली होती. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयानुसार, श्री. अमोल नायकू गवाणे यांची बदली त्यांच्या विनंतीनुसार कोल्हापूर विभागात करण्यात आली आहे.
या संपूर्ण घटनेमुळे एका वडिलांच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू तरळले. अशा भावनिक प्रसंगांमधून जनतेचा प्रशासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ होतो. जनसेवेचे असेच कार्य सदैव घडत राहो अशी सदिच्छा.
#PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #PublicService #kolhapur
@msrtcofficial

MR




