
Swaraj Baraskar
47 posts










आतापर्यंत कुलर का लावले नाही? एक काम करा आधी तुमच्या कार्यालयातले फॅन आणि कूलर बंद करा,मग कळेल त्या मुली काय सहन करतायत – देवेंद्र फडणवीस नागपूरच्या बेसा येथील सरकारी मुलींच्या वसतिगृह.विदर्भाचा उन्हाळा काय असतो हे आपल्याला माहित आहे त्यात तापमान 40 ते 45 अंशांवर पोहोचलेलं.बाहेर अंगाची लाही लाही करणारी गरमी आणि आत वसतिगृहाच्या खोल्यांमध्ये अक्षरशः भट्टीसारखी परिस्थिती.त्या मुलींची मागणी कोणी ऐकून घेत नव्हते आणि टाळाटाळ करत होते मग त्या मुलींनी देवाभाऊ यांना फोन केला. देवाभाऊ यांच्या आवाजात प्रचंड संताप होता.समोर शांतता होती.अधिकाऱ्यांकडे उत्तर नव्हते पण त्या एका फोननंतर संपूर्ण यंत्रणा हलली.ज्या तांत्रिक अडचणी अनेक दिवस सुटत नव्हत्या,त्या काही तासांत सुटल्या. संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाचा निर्णय झाला,देवाभाऊ यांनी विचार केला की ही समस्या फक्त एका वसतिगृहापुरती मर्यादित कशी असणार ? त्यांनी तत्काळ निर्णय घेतला आणि एक-दोन नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व सरकारी वसतिगृहांसाठी कूलर्स उपलब्ध करून दिले.अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न देवाभाऊंच्या एका फोनमुळे सुटल्यामुळे त्या मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद भारी होता.त्यांनी देवाभाऊंना पत्र लिहून आभार व्यक्त केले. धन्यवाद देवाभाऊ ❤️ @Dev_Fadnavis







































