jayant garde
6.1K posts


Pratap Sarnaik | मराठी न आल्यास रिक्षा, टॅक्सीचे परवाना रद्द: परिवहन मंत्री सरनाईक pudhari.news/maharashtra/th…
MR

@MahaDGIPR @PratapSarnaik बहुदा ही कारवाई पुढच्या निवडणूकी पर्यंत चालेल, कारण काही तरी करतोय हे फक्त दाखवण्यासाठी.
आज सुद्धा रिक्शावाले सर्रास भाडे नाकारतात, गणवेश घालत नाहीत, प्रवाश्यांशी उद्धटपणे बोलतात,4 प्रवासी घेऊन जातात, या बाबतीत अधिक लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे, पण नेमकी तिकडे डोळेझाक करतात.
MR

१ मे पासून #रिक्षा व #टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
#मराठीभाषा
#महाराष्ट्र
#रिक्षाचालक
#टॅक्सीचालक
#परवाना
@PratapSarnaik

MR

@Marathi_Rash म्हणून तर याला राजकारण म्हणतात.
20 वर्षात मुंबईतील मराठी जनानी पाठिंबा दिला नाही, आणि आता अस्तित्वाचा प्रश्न आ वासून उभा राहिला, म्हणून चुलत भावाशी जुळवून घेण्याचा प्रसंग जेव्हा येतो, तेव्हा ती लढाई अस्मितेशी जोडणे हा ही संधीसाधू पणाचं झाला.
लोकांना मुर्ख समजू नका.
MR

@ShivSenaUBT_ ड्रग्स चे सेवन करा, असं महायुतीने सांगितले नव्हतं,
निदर्शने करणारे बेअक्कल आहेत.
MR

गोरेगाव पूर्व येथील नेस्को संकुल येथे झालेल्या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये अंमली पदार्थांच्या अतिसेवनाने झालेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनेमुळे मुंबईतील कायदे-सुवस्थेबाबत निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नांविरोधात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वनराई पोलिस ठाणे, गोरेगाव येथे आंदोलन करुन ह्या घटनेला जबाबदार आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. ह्यावेळी शिवसेना नेते विभागप्रमुख आमदार सुनिल प्रभू, शिवसेना उपनेत्या मुंबई महानगरपालिका विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, शिवसेना सचिव नगरसेवक साईनाथ दुर्गे, आमदार बाळा नर, युवासेना कार्यकारिणी सदस्य नगरसेवक अंकीत प्रभू, माजी उपमहापौर नगरसेवक सुहास वाडकर, नगरसेविका शिवानी परब, नगरसेवक तुळशीराम शिंदे, नगरसेवक जितेंद्र वळवी, नगरसेविका लोना रावत, नगरसेविका लक्ष्मी फाळके-भाटीया, नगरसेविका योगिता कदम, नगरसेविका पुष्पा कळंबे, नगरसेविका मानसी जुवाटकर, विभागसंघटक शालिनी सावंत, विभागसंघटक शुभदा शिंदे तसेच इतर नगरसेवक आणि पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.




MR

@oradlaski कोणतेही सरकार लोकसंख्या नियंत्रित करू शकत नाही.
हे सगळं नागरिक ठरवत असतात,एवढी पण अक्कल नाही.
MR

५४८ खासदार काम करून थकले म्हणून आता लोकसभेची संख्या ८५० करण्यात येत आहे. हे सगळे आपल्या कररूपी पैशातूनच होणार आहे.
ज्या राज्यांनी १९७१ पासून लोकसंख्या नियंत्रित ठेवली, शिक्षण-आरोग्यावर भर दिला आणि देशाच्या GDP मध्ये सर्वाधिक योगदान दिले, त्यांना आता मतदारसंख्येच्या नावाखाली कमी प्रतिनिधित्व मिळणार आहे.
वस्तुस्थिती अशी आहे:
➡️ एकूण खासदार: ८५०
➡️ साधे बहुमत: ४२५
बिमारू राज्यांचा प्रस्तावित वाटा (वाढीव आकडेवारीनुसार):
- उत्तर प्रदेश: १४३
• बिहार: ७९
• मध्य प्रदेश: ५२
• राजस्थान: ५०
• झारखंड: २४
• छत्तीसगड: १९
• उत्तराखंड: ७
एकूण बिमारू खासदार: ३७४
फक्त या गटाला साध्या बहुमतापासून ५१ खासदार कमी आहेत. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ किंवा कर्नाटकमधून ५०-६० खासदार मिळवणे यांना फार कष्टाचे ठरणार नाही. थोडे प्रलोभन, निधीचे आश्वासन किंवा राजकीय समझोता — आणि बहुमत पूर्ण.
प्रगत राज्यांनी लोकसंख्या नियंत्रण केल्यामुळे त्यांचा प्रमाणात वाटा कमी होईल. ज्या राज्यांनी उच्च जन्मदर कायम ठेवला, त्यांना अधिक खासदार आणि त्यानुसार अधिक केंद्रीय निधी, अधिक राजकीय वजन मिळेल.
महाराष्ट्र (सध्या ४८ जागा) आणि दक्षिण भारतातील राज्ये ज्यांनी जबाबदारीने विकास केला, त्यांना आता प्रगतीची किंमत चुकवावी लागेल. निधी वाटपातही “आखाडता हात” घेण्याची शक्यता स्पष्ट आहे.
बंगाल, तामिळनाडू, केरळसारख्या राज्यांना जिथे भाजपला सरळ बहुमत मिळत नाही, तिथे नियम बदलण्यात येत आहेत. लोकसंख्येच्या आधारे सत्ता केंद्रित करण्याचा हा थेट परिणाम आहे.
महाराष्ट्रात आज विरोधी आवाज जवळपास नाही. सगळे पक्ष आणि नेते यात दलाली करत आहेत. परिणामी, प्रगत राज्ये शांतपणे आपल्या प्रतिनिधित्व आणि भविष्यातील निधीचा वाटा गमावत आहेत.
ही केवळ आकडेवारी नाही.
ही राजकीय शक्तीचा दीर्घकालीन पुनर्वितरण आहे, ज्यात लोकसंख्या नियंत्रण करणाऱ्या राज्यांना शिक्षा मिळते आणि उच्च लोकसंख्येच्या राज्यांना बक्षीस.
महाराष्ट्राने याकडे दुर्लक्ष केले तर उद्या आपल्या करपैशाचा, विकासाचा आणि राजकीय वजनाचा मोठा भाग इतरत्र वळवला जाईल.
आकडे बोलतात.
आणि ते सांगत आहेत की, प्रगती करणाऱ्या राज्यांना आता कमी प्रतिनिधित्व आणि कमी निधी मिळेल.
#DelimitationDisaster #Delimitation

MR

ठाकरे सेनेत होणार #खांदेपालट
उद्धव ठाकरे स्वतःचं कार्याध्यक्ष पद आदित्य ठाकरेंना देणार.
केवढा मोठा बदल होणार आहे, बापरे!
👏👏😬
#UddhavThackeray
#adityathackeray

MR

@MadhavVaruna @memumbaikar2026 @Marathiwarrior7 @Marathi___ @shashankraut005 @Prashant_S6547 या गाढवाला मराठी पण वाचता येत नसावे. 2024 नंतर, आज 2026 चे जवळपास 4 महिने उलटलेत, हे ही याला कळत नाही.
MR

@_Sweet_Parul_ या वयात हा जर थोबाडावर आपटला तर उरलेलं आयुष्य, ज्या जखमा होतील, त्याचे दुखणे सहन करत घालवावे लागेल, कारण 3 वेळा संघावर बंदी घालण्यात आली आणि ती उठवावी लागली.
हा इतिहास बहुदा हा थेरडा विसरलेला दिसतोय.
MR

@Shankarbhau23 @OfficialAndhal1 @PratapSarnaik लोकशाही च्या नावाखाली ही थट्टा सुरु आहे.
सकाळ, संध्याकाळ दमून, भागून आल्यावर घरी वेळेवर परतण्यासाठी चाललेली ही मजबुरी आहे असे समजा, पण हेच वास्तव आहे.
आणि याचाच फायदा हे रिक्षावाले घेतात,कायद्याची अंमलबजावणी करणारेच भ्रष्ट असल्यामुळे हेच नंतर आपल्याच डोक्यावर मिऱ्या वाटतात.
MR

@JayantGarde @OfficialAndhal1 @PratapSarnaik ४ प्रवासी कां बसतात?
गणवेश नसलेल्याच्या आटोरिक्शात का बसतात?
प्रत्येक ठिकाणी पोलिस व प्रशासन हजर राहू शकत नाही.
उद्या पोलीसांनी कारवाई केली आणि आटोवाले घरी बसले तर हेच लोक बोंबा मारतील...
काय गरज होती?
गणवेश घातला तर अपघात होत नाही कां?
४ प्रवासी घेतले, तर भाडे कमी घेतात.
इ. इ.
MR

तुम्ही घेतलेल्या निर्णयाच स्वागतच आहे. पण परवाना फक्त मराठी माणसालाच मिळाला पाहिजे.
जे परप्रांतीय लोक आहे त्यांना परवाने देऊ नये. १०० % परवाने हे मराठी माणसालाच मिळालेच पाहिजे. परप्रांतीय माजुर्डे आहेत.
@PratapSarnaik
#रिक्षा_परवाना #मुंबई #मुंबई_टॅक्सी #mumbai

MR

@lokmat असे जर असेल, तर प्रचाराची गरजच काय?
आणि हा तर म्हणतोय, मी प्रचार करणार.
सवाई आजोबा होणार बहुतेक, पण याला दरवेळी पाठीशी घालायला ते अजून किती वर्ष सक्रिय असतील ते स्वतः आजोबा पण सांगू शकणार नाहीत.
MR

सुनेत्रा काकींच्या विरोधात उभे राहिलेले २२ लोक आहेत, त्यांना प्रत्येकाला एखादे दुसरे मत मिळाले तर आश्चर्य वाटायला नको. बाहेरून आलेले लोक आहेत, त्यांना शून्य मतदानही होऊ शकते. जेवढे मतदान जास्त होईल तेवढे सर्व मतदान ९९ टक्के सुनेत्रा काकींना होईल. मतदान होईल त्यातील ९९ टक्के मतदान अजितदादांच्या पक्षाला होईल, ते दादांकडे बघून होईल, असे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.
सविस्तर बातमी lokmat.com/maharashtra/ro…
Rohit Pawar urged Baramati voters to support Sunetra Pawar in the upcoming by-election, emphasizing Ajit Dada's legacy and contributions. He anticipates a landslide victory for Sunetra, fueled by respect for Ajit Dada.
#LokmatNews #MarathiNews #RohitPawar #Baramati #SunetraPawar

MR

@anilshidore साधा एक आमदार पण निवडून आणू शकले नाहीत, गप्पा मारत आहेत, खासदारकीच्या.
MR

दिल्ली सरकारनं प्रस्तावित केल्याप्रमाणे लोकसभेच्या खासदारांची संख्या वाढली तर हिंदी भाषिक राज्यांची देशाच्या कारभारावरची पकड अधिकच घट्ट होणार.
हिंदी भाषा नसलेल्या राज्यांची देशाच्या कारभारात फार डाळ शिजणार नाही.
लोकसंख्या हा निकष मानून लोकसभा मतदारसंघ ठरवले तर ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रित ठेवून देशाच्या विकासात हातभार लावला त्यांच्या खासदारांची संख्या कमी होणार. म्हणजे मुख्यत: बिगर हिंदी भाषिक खासदारांची.
ह्यामुळे देशाच्या राजकारणात तीव्र ताणतणाव निर्माण होणार ह्यात शंका नाही.
#fedaralism #संघराज्य
MR

@onkarjoshte22 @ShelarAshish आशाबाईंना माणसे चांगलीच ओळखता येत होती, उगा आपल्या बुडाची जळजळ करून घेऊ नका.
MR

@ShelarAshish तुझ्यासारख्या चोराला जवळ कसे केले मंगेशकरांनी
MR

आशाताईंच्या छायाचित्रांचे एक पुस्तक आम्ही तयार केले ते त्यांना खूप आवडले. या पुस्तकाचे प्रकाशन मा. अमितभाई शाह जी यांच्या हस्ते व्हावे अशी आमची सगळ्यांची इच्छा होती. तो योग जुळून आला. अमितभाई महाराष्ट्र दौऱ्यावर असताना आम्ही सह्याद्री अतिथीगृहावर हा योग जुळवून आणला. ताईंच्या गाण्यावर नितांत प्रेम करणारे अमितभाई आणि आशाताई जेव्हा भेटले तेव्हा या क्षणाचे आम्ही साक्षीदार आहोत...
गीत,संगीत आणि अनेक नामवंत गीतकार संगीतकार यांच्या असंख्य आठवणींचा संवाद या दोघांमध्ये झाला... आज तो संस्मरणीय क्षण पुन्हा आठवला.



MR

अमरावती जिल्ह्यात परतवाडा येथे घडलेले प्रकरण अत्यंत घृणास्पद आहे. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करण्यात यावी अशी म्गगणी आम्ही पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
प्रत्येक प्रकरणात धर्म जात काढण्यापेक्षा गृहखात्याने सायबर सेलने अजून सजगपणे काम करणे गरजेचे आहे.
या ठिकाणी कारवाई करून घर तोडत आहेत, तर खरात प्रकरणात अशोक खरातचे घर का अजून तोडलेले नाही?
अशोक खरातचे घर देखील तोडले पाहिजे, खरातची पसार झालेली बायको तिला शोधून तुरुंगात डांबले पाहिजे. आणि खरातचे जे एजंट लोक आहेत त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे.
MR

@INCMaharashtra @INCHarshsapkal स्वतःच्या बुडात दम असेल तर सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस ने सत्ता मिळवून दाखवावी
आम्हाला सत्ता द्या, अशी भिक मागू नये.
उगा मिश्या वाढवून रुबाब करू नये.
दळभद्री कुठला.
MR

देवेंद्र फडणवीसांना गृहखातेच काय, महाराष्ट्राचा कारभारही झेपेना; जमत नसेल तर खुर्ची खाली करा पण महाराष्ट्राची ‘वाट’ लावू नका...
: मा.श्री. हर्षवर्धन सपकाळ
अध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
@INCHarshsapkal

MR

@LoksattaLive बघितलं, एकदा कॉलर धरल्यावर पोपट मिठूमिठू बोलायला लागला.
MR

Sanjay Raut : “पुढलं राजकारण तरुणांच्या हाती दिलं पाहिजे”, आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्षपद देण्याची चर्चा; संजय राऊतांच्या विधानाने वेधलं लक्ष!
loksatta.com/maharashtra/wi…
MR

@TheAnilkumarG94 शरद पवारांनी जेव्हा राजू शेट्टीची जात काढली होती, तेव्हा याची दातखिळी बसली होती.
MR

वारकरी संप्रदायात मनुवादी विकृतीची घुसखोरी, खपवून घेतली जाणार नाही! वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची केवळ धार्मिक परंपरा नाही ती संतांनी घडवलेली समता मानवता आणि सामाजिक एकतेची क्रांती आहे. ज्ञानेश्वर तुकारामांचा वारसा हा जात भेद आणि द्वेष यांना नाकारून समाज जोडणारा आवाज आहे.
पण आज हीच परंपरा गंभीर वळणावर उभी आहे.
ज्या प्रवाहाचा आत्मा एकत्र आणणे हा होता त्या प्रवाहात आता काही ठिकाणी विचारांची घुसळण होताना दिसते आहे आणि ती दिशा चिंताजनक आहे.
समतेच्या नावाखाली विभागणीचे संकेत भक्तीच्या आडून राजकीय छटा आणि संतविचारांपासून दूर जाणारी मांडणी हे सर्व मिळून मूळ परंपरेच्या आत्म्यावर प्रश्नचिन्ह उभे करत आहे. जाणीवपूर्वक धर्मांध लोकं घुसवली जात आहेत त्याला आळा घालणं हे महत्वाचं काम आहे. तुषार शाळीग्राम, संग्राम पठारे हे आणि यांच्यासारखे अनेक लोकं प्रतिगामी लोकांनी जाणीवपूर्वक वारकरी संप्रदायात घुसवले गेलेत हा मुद्दा साधा नाही. ही केवळ मतभेदांची गोष्ट नाही ही विचारसरणीच्या दिशेची लढाई आहे.
जर वारकरी परंपरेचा पाया असलेला समतेचा आणि मानवतेचा संदेश मागे पडू लागला तर ही फक्त परंपरेची हानी नाही तर महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्याला मोठा धक्का असेल.
आज गरज आहे ती स्पष्ट भूमिकेची
संतविचार जपण्याची मूळ मूल्ये टिकवण्याची आणि कोणत्याही स्वरूपातील द्वेष विभाजन किंवा विकृतीकरणाला ठाम विरोध करण्याची.
वारकरी परंपरा ही जोडण्यासाठी आहे तोडण्यासाठी नाही. आणि हा आत्मा वाचवणं हीच आजची सर्वात मोठी जबाबदारी आहे.

MR





