

Jay
15K posts














'मिसिंग लिंक'चे उद्घाटन १ मे २०२६ रोजी करण्यात आले. सर्व “इन्फ्रा वॉचर्स” आणि भाजप म्हणजे विकास ह्या भंपक गोष्टीवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी एक वास्तव... ह्या प्रकल्पाची किंमत हजारो कोटी रुपयांनी वाढवण्यात आली. हा पैसा गेला कुठे? पैसा जनतेचा... काँट्रॅक्टर्सची मजा आणि त्रास जनतेलाच! आता उद्घाटन आणि सर्व तपासण्या झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच येथे दरड कोसळली आहे आणि इतरही गंभीर समस्या समोर आल्या आहेत. की मग सेफ्टी चेक शिवाय उद्घाटन केले होते? मागच्या आठवड्यात इथे खड्डे पडल्याची बातमी देखील आली होती. जून महिन्यातच पुण्याला जाऊन परत येताना ह्या मार्गाचा वापर करताना माझ्या लक्षात आले आणि मी ते सार्वजनिकरित्याही मांडले होते, ह्या रस्त्याचा ५० फूटापर्यंतही एक सरळ आणि सपाट भाग नाही. संपूर्ण रस्ता उंच-सखल असून त्यावरून प्रवास करताना जणू काही बोटीत बसून लाटांवरून प्रवास करत असल्याचा अनुभव येतो. भ्रष्टाचार हेच भाजप आणि मिंधे सरकारचे पहिले नाव आहे, मग तो रस्त्यांमधला असो किंवा मंदिरातला.














