Milind Patil
1.7K posts

Milind Patil
@MilindPatil0789
Milind Patil






उल्हासनगर शहरातील सुभाष टेकडी, कानसाई रोड येथील विशुद्धी आणि सम्यक सोनवणे या दोन भावंडांनी विमानशास्त्रासारख्या तांत्रिक क्षेत्रात करिअर घडवले आहे. कोरोना काळात वडिलाच्या निधनानंतर आई सुनिता यांनी नोकरी करून मुलांना शिकवले. दोघांनीही खडतर परिस्थिती असतानाही मेहनत घेत आईच्या कष्टाचे चीज केले. उल्हासनगर कॅम्प नं-४, सुभाष टेकडी परिसरातील सुनिता सोनावणे यांनी पतीच्या निधनानंतर मोठ्या हिंमतीने विशुद्धी व सम्यक या दोन मुलांना शिक्षण दिले. घरच्या परिस्थितीची जाणीव असल्याने दोन्ही मुलांनी जिद्दीने अभ्यास केला. बारावीनंतर विशुद्धीने एव्हिएशन इंजिनिअरिंग निवडले. तिच्या पावलावर पाऊल ठेवत सम्यकनेही हेच क्षेत्र निवडले. आर्थिक ओढाताण असूनही सुनिता यांनी हार मानली नाही. इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी मुलांचे स्वप्न पूर्ण केले. विशुद्धीने तुर्भे येथील इंडियन एरोस्पेस अँड इंजिनिअरिंग कॉलेजमधून अभ्यासक्रम पूर्ण करून बंगळुरूतील एअरवर्क्स कंपनीत ज्युनिअर टेक्निशियन म्हणून नोकरी मिळवली. तर सम्यकने मुंबईतील ठाकूर इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी संस्थेत शिक्षण पूर्ण करून हैद्राबादच्या टाटा अँडव्हान्स सिस्टिम्स लिमिटेडमध्ये रुजू झाला आहे. सविस्तर बातमी lokmat.com/thane/lost-fat… Despite their father's death during COVID, Ulhasnagar siblings Vishuddhi and Samyak Sonawane became aircraft engineers. Their mother, Sunita, worked tirelessly to support their education. Vishuddhi works in Bangalore, and Samyak in Hyderabad. They attribute their success to their mother's dedication and sacrifice. #Lokmatnews #Ulhasnagar #Successtories #Marathinews































