
Adv.Swapnil Shelar
15.5K posts















शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला म्हणून फडणवीस सरकार ने बाळाचा वापर सुरू केला आहे. महामार्गासाठी जमीन देण्यास नकार दिला म्हणून शेतकऱ्यांना अक्षरशः उचलून नेले जात असून ही झुंडशाही सुरू झाली आहे का असा प्रश्न पडतो? . परभणीत जे घडत आहे, ते लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. आंदोलन करणे हा काही गुन्हा नाही तर संविधानाने दिलेला अधिकार आहे केवळ ५० शेतकरी शांतपणे आपल्या हक्कासाठी बसले असताना त्यांच्यासमोर ५०० पोलिसांचा फौजफाटा उभा करणे हा विकासाचा मार्ग नाही तर ही उघड दडपशाही आहे. शांततापूर्ण आंदोलनाला उत्तर म्हणून अटकसत्र, पोलीस बळ आणि दहशतीचे वातावरण निर्माण करणे, ही लोकशाहीची पद्धत नाही फडणवीस साहेब? हा कायदा-सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न नसून सत्तेची मग्रुरी दाखवण्याचा प्रकार आहे. शेतकऱ्यांचा आवाज ऐकून संवाद साधण्याऐवजी तो चिरडण्याचा प्रयत्न सुरू आहे. शासनाने तातडीने शेतकऱ्यांशी थेट चर्चा करून त्यांच्या शंका समजून घ्याव्यात, योग्य पर्यायांविषयी स्पष्ट भूमिका मांडावी आणि सर्वांना न्याय मिळेल असा तोडगा काढावा. @Dev_Fadnavis @supriya_sule @NCPspeaks #Parbhani #शेतकरी_संघर्ष #शक्तीपीठ_महामार्ग #लोकशाही_वाचवा #शेतकऱ्यांचा_आवाज












