
U.S. Embassy India
1.6K posts

U.S. Embassy India
@USAndIndia
Official account of U.S. Embassy in India. RTs/links are not endorsement. Follow US Ambassador to India at @USAmbIndia. Terms of use: https://t.co/Hz0PCXRUZ7






#WATCH | Delhi: US Ambassador to India, Sergio Gor says, "... Investment flows are reaching new heights. Indian companies continue to expand in the United States, particularly in pharmaceuticals, manufacturing, and technology, while US firms are increasing their footprint in India’s fast‑growing market. I was thrilled to see Indian companies committing more than $20 billion in investments in the United States at the annual Select Investment Summit. Not only is $20 billion a significant figure, but all embassies compete to bring investment into the US — and we were proud that our embassy, working with partners in India, ranked first in the world, an incredible achievement."







महाराष्ट्र अणुऊर्जेच्या नेतृत्त्वासाठी सज्ज; अणुऊर्जा क्षेत्रात भारत-अमेरिका सहकार्याला नवी गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे 'यूएस न्यूक्लिअर एक्झिक्युटिव्ह मिशन टू इंडिया' अंतर्गत न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूट (NEI) आणि यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमच्या (USISPF) कार्यकारी शिष्टमंडळासमवेत बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जगभरात ऊर्जा संक्रमणाच्या प्रक्रियेत मोठे बदल होत आहेत. गेली अनेक वर्षे महाराष्ट्र सौर आणि पवन उर्जेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असला तरी कार्बनमुक्त आणि औद्योगिक स्तरावरील बेसलोड ऊर्जा पुरवठ्यासाठी न्यूक्लिअर ऊर्जा अत्यावश्यक ठरणार आहे. भारतातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी 40 टक्क्यांहून अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात येते. मुंबई आणि नवी मुंबई परिसरात देशातील जवळपास 60% डेटा सेंटर क्षमता केंद्रित आहे. सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता, लॉजिस्टिक्स आणि प्रगत उत्पादन क्षेत्रे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उभे राहत आहेत, त्यामुळे आगामी काळात वीजेची मागणी अनेक पटींनी वाढणार आहे. भारत हा आगामी अनेक दशकांत वेगाने वाढणारी वीज मागणी असलेला देश ठरणार असून महाराष्ट्र हा त्यातील सर्वात मोठा औद्योगिक घटक ठरणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. अणुऊर्जा (न्यूक्लिअर पॉवर) ही भविष्यातील औद्योगिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचे नेतृत्व करण्यास तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात अणुऊर्जा उत्पादन व प्रकल्प उभारणीसाठी पुढाकार घेतल्यास राज्य सरकारकडून औद्योगिक जमीन, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, संशोधन सहकार्य आणि उत्पादन क्लस्टर उभारणीसाठी मदत केली जाईल, सुरुवातीच्या टप्प्यातील उद्योगांसाठी अनुदान आणि विशेष सवलती देण्याची तयारी असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारताच्या अणुऊर्जा क्षेत्राच्या पुढील प्रवासात महाराष्ट्र केंद्रस्थान ठरणार असून महाराष्ट्राला केवळ आयात केलेल्या अणुभट्ट्यांचा ग्राहक म्हणून नव्हे, तर न्यूक्लिअर उत्पादन, तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार आहे. यासाठी राज्याकडे सक्षम औद्योगिक यंत्रणा, जागतिक दर्जाची बंदरे, लॉजिस्टिक सुविधा, तांत्रिक कौशल्य असलेले मनुष्यबळ, अभियांत्रिकी क्षमता आणि उद्योगस्नेही धोरणे आहेत. छोट्या स्वरूपातील स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्स (SMR) क्षेत्रातही महाराष्ट्र प्रारंभीचे केंद्र बनण्यास उत्सुक आहे. औद्योगिक अर्थव्यवस्थेच्या भविष्यातील गरजांशी एसएमआर तंत्रज्ञान सुसंगत असून पुढील पिढीच्या अणुऊर्जेसाठी महाराष्ट्र आदर्श प्रयोगभूमी ठरू शकतो. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आता तंत्रज्ञान, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुरवठा साखळी या क्षेत्रांत अधिक मजबूत होत आहेत. नागरी अणुऊर्जा सहकार्य हे या भागीदारीच्या पुढील टप्प्यातील निर्णायक क्षेत्र ठरू शकते. न्यूक्लिअर ऊर्जा ही केवळ वीज निर्मिती नसून औद्योगिक स्पर्धात्मकता, तांत्रिक नेतृत्व, ऊर्जा स्वायत्तता, हवामान बदलाची जबाबदारी आणि दीर्घकालीन विश्वासाशी संबंधित विषय असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. यावेळी न्यूक्लियर एनर्जी इन्स्टिट्यूट (NEI) अमेरिकेच्या अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया ग्रेस कोर्सनिक (मिशन लीडर) , सेंट्रस एनर्जीचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स उपाध्यक्ष डॅन लॅस्टिकोव्ह, क्लीन कोर थोरियम एनर्जीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, मेहुल शाह, कर्टिस-राइट कॉर्पोरेशनमधील न्यूक्लिअर विभागाच्या मेजर अकाऊंट्सचे उपाध्यक्ष गॅरी वोल्स्की, यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमच्या भारताच्या व्यवस्थापकीय संचालिका निवेदिता मेहरा, एडलो इंटरनॅशनल कंपनीचे अध्यक्ष जॅक एडलो , होलटेक एशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच होलटेक इंटरनॅशनलमध्ये अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे सल्लागार आणि स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप्स व कॅपिटल फॉर्मेशन विभागाचे प्रमुख, अनंत जैन यांच्यासह शिष्टमंडळामधील सदस्य आणि विविध अमेरिकन कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @NEI @USISPForum #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #USIndiaPartnership









Landed and looking stunning!✈️ The second made-for-Air India Boeing 787-9, bearing registration mark VT-AWB, just touched down in Delhi after a non-stop flight from Charleston, United States. This brand-new aircraft sporting Air India’s new livery is a part of our effort to upgrade our widebody fleet and deliver a world-class premium experience to our guests on long-haul routes. 📸taken moments before departure from Charleston #AirIndia







