



Atul Kulkarni Journalist
11.9K posts

@kkatul
Editor @lokmat Mumbai | Award winning Journalist | Journalist with Mission to Connect People








ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या जाण्याने गेल्या 7 दशकांहून जास्त काळ गानरसिकांना भुरळ घालणारा जादुई आवाज शांत झाला आहे. लवचिकता हे आशाताईंच्या गायनाचे वैशिष्ठ्य. त्यांनी रोमँटिक, गझल, पॉप, कॅबरे, भक्तिगीते ते लोकसंगीत अशा विविध शैली सहजतेने हाताळल्या. प्रत्येक प्रकारात त्यांनी आवाजाची रंगत बदलत गाण्याला साजेसा भाव दिला. आनंद, विरह, खट्याळपणा किंवा शृंगार - प्रत्येक भावना त्यांच्या आवाजातून जिवंत झाली. कठीण ताल आणि वेगवान गाण्यांमध्येही त्यांची लयबद्धता अचूक असे. त्यांनी पाश्चात्य शैली, जॅझ, रॉक, कॅबरे अनेक नवे प्रयोग केले. म्हणूनच त्या भारतीय प्लेबॅक सिंगिंगच्या क्षेत्रात एक अजरामर दिग्गज ठरतात. आशाताईची मुलाखत घेण्याचा योग मला त्यांच्या जानेवारी २०१६ मधील छत्रपती संभाजीनगर भेटीदरम्यान आला होता. लोकमत भवन मध्ये आम्ही त्यांचे जोरदार स्वागत केले होते. आपल्या गाण्यामागच्या प्रेरणा, मेहनत, रियाझ तसेच जीवनातील अनेक कठीण प्रसंगांना त्या कश्या सामोऱ्या गेल्या याविषयी त्या भरभरून बोलल्या. एप्रिल २०१६ मध्ये लोकमतने त्यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्डने सन्मानित केले होते. त्यावेळी त्यांच्याशी झालेला संवाद मला अजूनही आठवतो. एक सदाबहार, आनंद, उत्साह आणि सकारात्मतेने भरलेली व्यक्ती म्हणजे आशाताई. त्यांच्या जाण्याने संगीतक्षेत्राचे झालेले नुकसान कधीही न भरून येणारे आहे. #AshaBhosale

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या जाण्याने गेल्या 7 दशकांहून जास्त काळ गानरसिकांना भुरळ घालणारा जादुई आवाज शांत झाला आहे. लवचिकता हे आशाताईंच्या गायनाचे वैशिष्ठ्य. त्यांनी रोमँटिक, गझल, पॉप, कॅबरे, भक्तिगीते ते लोकसंगीत अशा विविध शैली सहजतेने हाताळल्या. प्रत्येक प्रकारात त्यांनी आवाजाची रंगत बदलत गाण्याला साजेसा भाव दिला. आनंद, विरह, खट्याळपणा किंवा शृंगार - प्रत्येक भावना त्यांच्या आवाजातून जिवंत झाली. कठीण ताल आणि वेगवान गाण्यांमध्येही त्यांची लयबद्धता अचूक असे. त्यांनी पाश्चात्य शैली, जॅझ, रॉक, कॅबरे अनेक नवे प्रयोग केले. म्हणूनच त्या भारतीय प्लेबॅक सिंगिंगच्या क्षेत्रात एक अजरामर दिग्गज ठरतात. आशाताईची मुलाखत घेण्याचा योग मला त्यांच्या जानेवारी 2010 मधील छत्रपती संभाजीनगर भेटीदरम्यान आला होता. लोकमत भवन मध्ये आम्ही त्यांचे जोरदार स्वागत केले होते. आपल्या गाण्यामागच्या प्रेरणा, मेहनत, रियाझ तसेच जीवनातील अनेक कठीण प्रसंगांना त्या कश्या सामोऱ्या गेल्या याविषयी त्या भरभरून बोलल्या. एप्रिल 2016 मध्ये लोकमतने त्यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्डने सन्मानित केले होते. त्यावेळी त्यांच्याशी झालेला संवाद मला अजूनही आठवतो. एक सदाबहार, आनंद, उत्साह आणि सकारात्मतेने भरलेली व्यक्ती म्हणजे आशाताई. त्यांच्या जाण्याने संगीतक्षेत्राचे झालेले नुकसान कधीही न भरून येणारे आहे. #AshaBhosale

















आज ठाणे येथील ऐतिहासिक गडकरी रंगायतन नाट्यगृहात 'दैनिक लोकमत साहित्य पुरस्कार २०२६' वितरण सोहळ्यास उपस्थित राहिलो. साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या दिग्गजांचा गौरव करताना मनापासून आनंद झाला. याप्रसंगी ज्येष्ठ प्रकाशक आणि राजहंस प्रकाशनचे कणा असलेले श्री. दिलीपजी माजगावकर यांना 'जीवन गौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. सुमारे ८५० हून अधिक दर्जेदार पुस्तके प्रकाशित करून त्यांनी मराठी साहित्य विश्व समृद्ध केले आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे. तसेच उत्कृष्ट साहित्यनिर्मितीसाठी निवड झालेल्या ११ लेखकांचे व कवींचे देखील मी अभिनंदन करतो. वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन 'गाव तिथे ग्रंथालय' ही संकल्पना राबवत असून, त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या सोहळ्यात गौरवण्यात आलेल्या ११ पुस्तकांच्या प्रत्येकी ५०० प्रती ग्रंथालय संचालनालयाच्या माध्यमातून खरेदी करण्याची घोषणा करताना मला विशेष आनंद होत आहे. यावेळी लोकमत मीडिया ग्रुपचे एडिटर-इन-चीफ राजेंद्रजी दर्डा, संपादक विजयजी बाविस्कर, अतुलजी कुलकर्णी, अभिनेते मकरंदजी अनासपुरे, सचिनजी खेडेकर, विद्याधरजी अनास्कर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 📍२४ मार्च २०२६ - ठाणे #LokmatSahityaPuraskar #मराठीसाहित्य #ठाणे #RajhansPrakashan @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra @lokmat


