पुस्तकायन 📚

838 posts

पुस्तकायन 📚 banner
पुस्तकायन 📚

पुस्तकायन 📚

@pustakaayan

📖। वाचन 🍁। कविता ✒️। लेखन 📚। गाथा पुस्तकांची..!!!

Katılım Şubat 2023
299 Takip Edilen2.7K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
पुस्तकायन 📚
पुस्तकायन.. गाथा पुस्तकांची.. प्रत्येक पुस्तकातल्या कथे मागे अनेक कथा असतात.. अनेक हेतू असतात. असेच पुस्तकांचे अंतरंग उलगडून दाखवण्यासाठी पुस्तकायन कडून हा प्रयत्न..!! ___________________________________ #पुस्तकायन #म #मराठी
पुस्तकायन 📚 tweet media
MR
2
1
46
11.6K
|ग्रं|थो|पा|स|क|
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) गेल्या दशकात अनेक देशांमध्ये गृहयुद्धं भडकली. गावांवर, शहरांवर बॉम्बहल्ले झाले, तर कुठे भीषण नैसर्गिक संकट आली... तिथल्या माणसांना जीव वाचवण्यासाठी अंगावरच्या कपड्यांनिशी देश सोडावा लागला... आणि मग सुरू झालं एक नष्टचर्य... तापलेल्या वाळवंटातून, हाडं गोठवणाऱ्या थंडीतून, दाट जंगलांतून, खवळलेल्या समुद्रातून माणसं जिवाच्या आकांताने निघाली. वाटेत किती मेली, परागंदा झाली याची गणतीच नव्हती. उरलेल्यांच्या वाट्याला रेफ्युजी कॅम्प्समधलं किडा-मुंगीचं जिणं आलं... आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिकेतले लाखो लोक असे देशोधडीला लागले... या गोष्टी आहेत त्यांच्या ससेहोलपटीच्या... आपल्याला आणि आपल्या मुलाबाळांना सुरक्षित जगता यावं या साध्या इच्छेपोटी माणसाने सोसलेल्या अनन्वित हालअपेष्टांच्या, टोकाच्या परिस्थितीतही तग धरून राहण्याच्या... आणि त्यांचं जगणं सुसह्य करण्यासाठी धडपडणाऱ्यांच्या सुद्धा... विश्वाला व्यापून असलेल्या रेफ्युजी प्रश्नाचा मानवी चेहरा समोर आणणारं पुस्तक. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
|ग्रं|थो|पा|स|क| tweet media
MR
3
10
40
1.1K
पुस्तकायन 📚
@ksinamdar गूढकवी ग्रेस यांना साजेशी अशी आदरांजली.. धन्यवाद कौशल जी..
MR
1
0
1
83
पुस्तकायन 📚 retweetledi
Kaushal S Inamdar| कौशल इनामदार
आज ग्रेसचा स्मृतिदिन. आणि ग्रेसची स्मृतीही सायंकालीनच आहे. ग्रेसचा स्मृतिदिन. या दिवशी संध्याकाळीच पोस्ट टाकायची असते. #ग्रेस ग्रेसची कविता वाचली आणि मला जाणवलं की अर्थाच्या पलीकडे एक फार मोठी दुनिया आहे. ही दुनिया भासांची आहे, आभासांची आहे, सूक्ष्म जाणिवांची आहे, तीव्र भावनांची आहे, अनाहत नादांची आहे, अमूर्त आकारांची आहे, अनुभवाच्या पलीकडच्या अनुभूतीची आहे, रहस्यांची आहे, साक्षात्कारांची आहे. ग्रेसची कविता वाचली आणि जाणवलं की ही कळण्याची गोष्ट नसून जाणवण्याचीच गोष्ट आहे. ग्रेसची कविता वाचली आणि जाणवलं की “कवीला काय म्हणायचंय?” असा शाळेत विचारलेला प्रश्न निरर्थक असून खरा प्रश्न “कवितेला काय म्हणायचंय?” असा असायला हवा. ग्रेसची कविता वाचली आणि मला जाणवलं की दर वेळी उत्तरं मिळायलाच हवीत असं नाही, प्रश्नही रेंगाळू द्यावे मनात. ग्रेसची कविता वाचली आणि मला जाणवलं की ग्रेसच्या कवितेचे गूढरम्य प्रदेश फिरायचे तर हातात संगीताची मशाल हवी! संगीतकारांना ग्रेसच्या कवितेचं प्रचंड आकर्षण वाटतं याचं मला मुळीच आश्चर्य वाटत नाही. संगीतकारांना ग्रेस हा आपला कवी वाटतो कारण त्यांची कविता ॲब्स्ट्रॅक्शन्समधे संवाद साधते. ही ॲब्स्ट्रॅक्शन्स संगीतात अनुवादित करताना संगीतकाराचा कसही लागतो आणि अपार आनंदही मिळतो! म्हणून ग्रेसच्या काव्याला बहुतेक संगीतकारांनी दिलेल्या चाली उत्तमच वाटतात! हृदयनाथ मंगेशकरांपासून श्रीधर फडकेंपर्यंत आणि आनंद मोडकांपासून नरेन्द्र भिडेपर्यंत सर्व संगीतकारांना ग्रेसची मोहिनी पडलेली आहे. उन्हे उतरली एक सावली पुढे दिठीवर थेंब नवा या वळणाशी दुःख उराशी सूर वितळतो जणू भगवा ग्रेसच्या कवितेतली पहिली चित्तवेधक बाब म्हणजे चित्रमयता. उन्हं उतरणीला आगली आहेत आणि संध्याकाळीच दिसते अशी लांब सावली आपल्याला दिसतेच; पण पुढच्या तीन ओळी ॲब्स्ट्रॅक्ट असल्या तरीही ‘तो वितळणारा भगवा सूर’ आपल्याला अवकाशात दिसत राहतो. मला एक गंमत आढळली. मी केलेल्या ग्रेसच्या तीन कवितांच्या संगीतरचना करताना या तिन्ही कविता संध्याकाळच्या असूनही मी सकाळच्या रागांची धून वापरली आहे! हे असं अभावितपणे झालं असलं तरी त्याचं एक कारण आहे हे मला नंतर जाणवलं. ग्रेसच्या कवितेमध्ये एक अनामिक अशी बेचैनी आहे. बेचैनी जाणवते पण त्यावर बोट ठेवता येत नाही. आता संध्याकाळी तुम्ही मारवा किंवा पूर्वी ऐकलात तर तुम्हाला उदास वाटतं पण ही उदासी ‘डिफाइन्ड’ असते. त्यात संभ्रमावस्था नसते. परंतु संध्याकाळच्या वेळेला तुम्ही सकाळचा एखादा राग ऐका. तुम्हाला एक अनामिक बेचैनी जाणवेल. ते गलबलून येणं वेगळं असतं. ग्रेसच्या कवितेला चाल देणं म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग काढण्यासारखं आहे. जसं दिसतं त्याला महत्त्व नसून जे दिसतंय त्याची जाणीव रेखाटायची. स्वप्ने अपुली कुणी सजविली रंग तिरावर व्याकुळसा नाद उगाळून सांज बनातून कळप गुरांचा निघे जसा या कडव्याला चाल देताना मी फक्त सांगितीक रचनेचा फॉर्म डोक्यात ठेवला. तीन ओळींचा एक बंध – असे दोन बंध. पहिल्या तीन ओळींच्या बंधात मी आरोही सुरावट रेखाटली आणि पुढच्या तीन ओळींच्या बंधात त्याचीच मिरर इमेज असावी अशी अवरोही स्वराकृती रेखाटली आहे असं तुमच्या ध्यानात येईल. माझ्या वक्षी निजती पक्षी अतुल सुखाची ही धारा देह अनावर निज मातीवर हिम वर्षावित ये वारा आता लक्षात येतं की दिवसभराच्या कडक उन्हात प्रवास करून नंतर ही उन्हं उतरताना पाहिली आहेत. त्यामुळे कविता जे सांगते, तेच गाण्याची चाल परत सांगत नाही. चाल ही कवितेचा prequel आहे आणि sequel ही आहे. कविता सुरू होण्याआधी जे अस्तित्त्वात होतं आणि ती संपल्यानंतर जे अस्तित्त्वात राहणार ते गाण्यात आहे. ‘माझ्या वक्षी निजती पक्षी’ हे एका विलक्षण आत्मिक शांततेचं द्योतक आहे. ‘अतुल सुखाची ही धारा’ असं ग्रेस म्हणतात तेव्हा त्याला पहिल्या बंधातल्या ‘या वळणाशी, दुःख उराशी’ – त्या दुःखाची पूर्वपीठिका आहे हे लक्षात ठेवायला हवं. दुःख उरात ठेवून ते वळण पार केलं आणि एका प्रचंड मोठ्या प्रवासानंतर अनुभवलेली ही ‘अतुल सुखाची धारा’ आहे. हा प्रवास एका जन्माचा असेल किंवा अनेक जन्मांचा असेल. मला यात ‘धारा’ हा शब्दही महत्त्वाचा वाटतो. धारा ही वाहत असते. ती स्टॅटिक नसते. हे जिवंत, वाहतं सुख आहे. ‘निज मातीवर’ देह अनावर होतो आणि वारा हिम वर्षावित येणं म्हणजे सगळा दाह शांत होण्याचं प्रतीक आहे. त्यामुळे गाणं परत धृवपदावर न येता केवळ सूर राहतात आणि शब्द वितळतात! © कौशल इनामदार लिॅक पुढच्या पोश्टीत
MR
14
22
135
5K
पुस्तकायन 📚 retweetledi
पुस्तकायन 📚
व्याकुळ शब्दांचे आभाळ - ग्रेस नेहमीच गूढ, चटकन न समजणारी अन दुःखाची कारुण्य लकेर असलेली कविता ज्यांच्या लेखणीतून उस्फूर्तपणे कालपटावर उमटली ते कवी म्हणजेच माणिक सीताराम गोडघाटे उर्फ ग्रेस. आजच्या कविता स्मरणातल्या या सदरात कवी ग्रेस यांच्या काही आवडत्या कविता. #पुस्तकायन #ग्रेस
पुस्तकायन 📚 tweet mediaपुस्तकायन 📚 tweet mediaपुस्तकायन 📚 tweet mediaपुस्तकायन 📚 tweet media
MR
2
8
36
2.7K
पुस्तकायन 📚
डॉ. पवार यांनी आपल्या लेखनातून छत्रपतींच्या इतिहासाला नव्या दृष्टीकोनातून उलगडले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तसेच राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर त्यांनी सखोल व संशोधनपर लेखन केले. त्यांच्या पुस्तकांमध्ये ऐतिहासिक घटनांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण. 🔽
पुस्तकायन 📚 tweet media
MR
0
0
1
44
पुस्तकायन 📚
प्रख्यात इतिहास संशोधक व लेखक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन ही महाराष्ट्राच्या बौद्धिक व सांस्कृतिक क्षेत्रासाठी मोठी हानी आहे. मराठा इतिहासाच्या अभ्यासाला त्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली.. ✨ #जयसिंगरावपवार 🔽
पुस्तकायन 📚 tweet media
MR
3
7
21
594
पुस्तकायन 📚
त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी आहे; मात्र त्यांच्या लेखनरूप वारशातून ते सदैव आपल्या स्मरणात राहतील. #पुस्तकायन #मराठी #इतिहास #संभाजीमहाराज #शिवाजीमहाराज #म #जयसिंगरावपवार
पुस्तकायन 📚 tweet media
MR
0
0
2
24
पुस्तकायन 📚
.. आणि समाजजागृतीचा स्पष्ट दृष्टिकोन दिसून येतो. डॉ. जयसिंगराव पवार यांचे व्यक्तिमत्त्व साधे, अभ्यासू आणि समाजाभिमुख होते. त्यांच्या कार्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना व संशोधकांना दिशा मिळाली. 🔽
पुस्तकायन 📚 tweet media
MR
1
0
2
44
पुस्तकायन 📚 retweetledi
Let's Read India
Let's Read India@LetsReadIndia·
मनाच्या कोपऱ्यात अलगद घर करणारे, साध्या शब्दांतून आयुष्याची सुंदर जाणीव करून देणारे, आणि प्रत्येक कथेतून जीवनाचं सार सांगणारे आपले लाडके लेखक व. पु. काळे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏 #वपुकाळे #मराठीसाहित्य #LetsReadIndia📚📚📚
Let's Read India tweet media
MR
1
6
21
1.1K
पुस्तकायन 📚 retweetledi
पुस्तकायन 📚
“ वपु ” एवढे दोनच शब्द महाराष्ट्राची साहित्यिक समृद्धी कथन करण्यासाठी पूरेसी आहेत.. सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनातून काहीतरी असामान्य टिपण्याची कला अवगत असलेले संवेदनशील लेखणीचे स्वामी.. #पुस्तकायन #मराठी #म #वपु #वपुकाळे #मराठीसाहित्य #वपुर्झा #वाचन #वाचनवेड @LetsReadIndia
पुस्तकायन 📚 tweet mediaपुस्तकायन 📚 tweet mediaपुस्तकायन 📚 tweet mediaपुस्तकायन 📚 tweet media
MR
2
8
53
4.2K
पुस्तकायन 📚
वेळेची सरमिसळ घडवून आणली आहे. संत परंपरेचा वारशाला नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देणारी ही कादंबरी मराठी साहित्याच्या वाटचालीत एक महत्त्वाचा टप्पा ठरते. ही कादंबरी वाचून एक प्रश्न कायम मनात राहतो - विठोबा खरंच हरवला आहे का, की आपणच त्याला आपल्या जीवनातून हरवून बसलो आहोत?
पुस्तकायन 📚 tweet media
MR
0
0
1
86
पुस्तकायन 📚
संत परंपरेने दिलेले नैतिक बळ, मानवतेचा दृष्टिकोन आणि सामाजिक समतेची जाणीव आजच्या काळात किती पोकळ झाली आहे, याचा हा प्रभावी दाखला आहे. विनायक होगाडे यांची लेखनशैली ही या कादंबरीची एक मोठी ताकद आहे. त्यांनी ऐतिहासिक आणि आधुनिक काळाची एकत्रित मांडणी करताना अत्यंत सहजतेने.. 🔽
पुस्तकायन 📚 tweet media
MR
1
0
3
90
पुस्तकायन 📚
विठोबा मिसिंग इन पंढरपूर - परंपरा, प्रश्न आणि समकाल यांचा धाडसी संगम।! विठ्ठल - रखुमाई समस्त महाराष्ट्राचं श्रद्धास्थान.. गेली २८ युगं पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर विठ्ठल उभा आहे अशी विठ्ठलाची मिथककथा एवढ्यावर येऊन थांबते. विठोबा विटेवर स्थिरावल्यावर पुढे काय झालं? #पांडुरंग 🔽
पुस्तकायन 📚 tweet media
MR
1
6
59
1.9K
पुस्तकायन 📚 retweetledi
पुस्तकायन 📚
जागतिक कविता दिन.. कविता म्हणजे अनुभूती.. कविता म्हणजे हळवे क्षण, कविता म्हणजे संघर्ष, कविता म्हणजे मृगजळ, कविता म्हणजे कट्यार.. जीवनाचे सांस्कृतिक, सामाजिक, मानसिक असे विविधांगी चित्रण माफक शब्दात करण्याऱ्या कलाकृती म्हणजे कविता.. जागतिक कविता दिनाच्या शुभेच्छा! #पुस्तकायन #म
पुस्तकायन 📚 tweet mediaपुस्तकायन 📚 tweet mediaपुस्तकायन 📚 tweet mediaपुस्तकायन 📚 tweet media
MR
2
8
32
2.5K