|ग्रं|थो|पा|स|क|

17.5K posts

|ग्रं|थो|पा|स|क| banner
|ग्रं|थो|पा|स|क|

|ग्रं|थो|पा|स|क|

@granthopasak

#पुस्तकांची_ओळख 📚 #बेला_के_फूल 📻

Mumbai, India Katılım Aralık 2016
1.6K Takip Edilen5.6K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
|ग्रं|थो|पा|स|क|
#पुस्तकांची_ओळख ✍🏻✍🏻✍🏻✍🏻 ✍🏻✍🏻✍🏻 By #ग्रंथोपासक 😊 प्रत्येकच देशाच्या इतिहासात कित्येक दुर्दैवी घटनांच्या नोंदी सापडतात. काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित. नैसर्गिक आपत्तीला टाळता येणे अशक्य असले, तरी सोयीच्या दुर्लक्षामुळे, चुकांमुळे देशाला, एखाद्या समाजाला झालेले जबर नुकसान टाळणे मात्र शक्य असते. ३१ ऑक्टोबर १९८४ ला इंदिराजींची हत्या झाली त्याआधी त्यांचे अंगरक्षक बदलण्याच्या सूचना सुरक्षा यंत्रणांनी दिल्या होत्या. परंतु आपण शीख अंगरक्षक बदलले तर या समाजाबद्दल अविश्वासाचा वारा वाहील या कारणाने इंदिराजींनी त्यास नकार दिला (वाचलेलं). आणि शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. सुरक्षारक्षक सतवंत सिंग आणि बिअंत सिंग यांनी इंदिराजींच्या देहाची अक्षरशः चाळण केली. या हत्येचं कारण ठरलं सुवर्ण मंदिरात शिरलेले अतिरेकी हुसकावून लावण्यासाठी केंद्र सरकारने केलेली लष्करी कारवाई... ५ जून ते १० जून १९८४ या कालावधीतील सुवर्ण मंदिरातील लष्करी कारवाईचा आँखो देखा हाल म्हणजे "ऑपरेशन ब्लू स्टार, जसं घडलं तसं..." हे पुस्तक. ते ही खुद्द ऑपरेशन प्रमुख लेफ्टनंट जनरल के.एस. ब्रार यांच्याकडून, अगदी इत्यंभूत, तपशीलवार... भारत पाकिस्तान फाळणीतून हिंदू-मुसलमान राष्ट्रे निर्माण झाली खरी, पण या फळणीत अजून एक फाळणी दिसून येते ती पंजाबची. फळणीमध्ये पंजाबचेही दोन तुकडे झाल्यामुळे पंजाबवर वर्चस्व असणाऱ्या शीख समाजाला हिंदू नेत्यांबद्दल, हिंदू समाजाबद्दल अविश्वास वाटू लागला असावा (मत). १९४७ पासूनच पंजाबी बोलणाऱ्यांसाठी पंजाब हे स्वतंत्र राज्य असावं या मास्टर तारा सिंह यांच्या मागणीपासून, १९७० च्या दशकात स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्या अतिरेकी भिंद्रनवाले याच्या उदयापर्यंत, पंजाबचे धगधगते राजकारण, खदखदते समाजकारण लेखकाने थोडक्यात पण अगदी व्यवस्थित समजावून दिले आहे. पंजाब आणि पंजाबचे लोकमानस भिंद्रनवालेच्या ताब्यात गेलं आणि देशाच्या एकोप्याला आव्हान देणाऱ्या एका क्रूर अतिरेक्याचा जन्म झाला. अकाली दलाचा प्रभाव कमी करण्यासाठी सुरवातीला काँग्रेसनेही भिंद्रनवालेला ताकद दिली होती (वाचलेलं) आणि काही काळाने हाच भिंद्रनवाले काँग्रेस, अकाली दल, पोलीस, प्रशासन वैगेरे कुणालाही ऐकेनासा झाला. अनेक खून, असंख्य लुटी करून समांतर सरकार चालवणाऱ्या भिंद्रनवालेच्या मुसक्या आवळण्यासाठी केंद्र सरकार हालचाली करू लागल्यावर, त्याने शेवटी शीख समाजाची अस्मिता असणाऱ्या सुवर्ण मंदिरात आसरा घेतला. अनेक प्रशिक्षित अतिरेकी, सैन्य दलातील निवृत्त/ बडतर्फ अधिकारी, गुन्हेगार, अत्याधुनिक शस्त्र सामग्री वैगेरेंनी सज्ज असलेल्या भिंद्रनवालेशी लढताना, सुवर्ण मंदिरातील हरमंदिर साहिब (पवित्र स्थान) वर एकही गोळी चालवणार नाही अशी मनोमन शपथ घेऊन लढणारे आपले ८३ वीर सैनिक मृत्यूला सामोरे गेले. लेखकाने या लढाईची गरज, निर्णय, आखणी, हालचाल, वाटचाल, अफवा, गैरसमज, संग्राम आणि विजय वैगेरे या पुस्तकात व्यवस्थित रचून ठेवला आहे. प्रत्यक्षात कारवाई ५-६ दिवसरात्र चालली असली, तरी त्याचे परिणाम पुढील २५-३० वर्षे दिसत होते... जसे इंदिराजींची हत्या, शीखांविरुद्धची दंगल, त्यावेळचे लष्कर प्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांची पुण्यात हत्या, शिवाय खुद्द लेखकावर लंडनमध्ये झालेला हल्ला... सुवर्ण मंदिरातील या लष्करी कारवाईच्या हेतूबद्दल प्रशासकीय अधिकारी कुलदीप नय्यर किंवा ज्येष्ठ साहित्यिक खुषवंतासिंग यांच्यासारख्या उच्च विद्याविभूषित लोकांचेच अगाध अज्ञान होते, तर सर्वसामान्य शीख समाजामध्ये लष्कराच्या या धाडसाविरोधात किती अफवा आणि किती गैरसमज पसरले होते याची कल्पना पुस्तक वाचताना येते. या विषयावरील आपल्या समजाचे, माहितीचे खुंटे हलवून पुन्हा बळकट करण्यासाठी नक्कीच #वाचावं_असं_पुस्तक #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #कम्फर्ट_झोन_बाहेरचं_पुस्तक #सबका_मलिक_एकच_पुस्तकं #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
|ग्रं|थो|पा|स|क| tweet media
|ग्रं|थो|पा|स|क|@granthopasak

#पुस्तकांची_ओळख ✍🏻✍🏻✍🏻✍🏻 ✍🏻✍🏻✍🏻 by #ग्रंथोपासक 😊 फॉर हिअर, ऑर टू गो? इतर देशांतून अमेरिकेत येणाऱ्या प्रत्येकाला कधी न कधी कळत नकळत कुत्सितपणे विचारला गेलेला हा प्रश्न... इथेच राहणार की गडगंज पैसा कमावून आपापल्या देशात निघून जाणार? हेटाळणीचे असे टोमणे झेलत १९६० च्या आसपास अमेरिकेत येण्यासाठी देश सोडलेले मराठी तरुण तरुणी, हे पुस्तक २००७ साली प्रकाशित झालं तेव्हा ६०-७० वर्षांचे सिनियर सिटिझन्स झाले असतील. त्यांच्या स्थलांतरित आयुष्यातील ४०-४५ वर्षांच्या हेलकाव्यांच्या लाटा, अपर्णा वेलणकर या कलंदर लेखिकेने या पुस्तकात कैद केल्या आहेत. कधी अक्राळ विक्राळ तर कधी संथ गंभीर अशा समुद्री लाटांच्या हेलकाव्यांमधून जशी लहान मोठी जहाजे आपापल्या वकुबाप्रमाणे मार्गक्रमण करत असतात, तशा काही मराठी माणसांच्या आयुष्याच्या जहाजांचे हे स्थलांतरित मार्गक्रमण... अमेरिकेच्या किनाऱ्याला लागणाऱ्या या मराठीजनांचे चार लाटांमध्ये वर्गीकरण करता येतील... भारतातील कारकुनी शिक्षण आणि संधींची उपासमार या तुलनेत अमेरिकेतील उच्च शिक्षण, स्वातंत्र्य आणि प्रगतीची संधी पाहून पहिल्या पिढीतील लोकांनी अमेरिकन भूमीवर पाय ठेवले ती स्थलांतरितांची पहिली लाट. जन्मापासून तरुणपणापर्यंतच्या आठवणी, माणसे, ठिकाणं हजारो मैल दूर ठेवून आलेल्या या पिढीला अमेरिकेत जम बसवण्यास प्रचंड संघर्ष करावा लागला आणि सुरू झाली शरीर-मनाची, भाव-भावनांची, अदृश्य असह्य घालमेल आणि तडफड. त्यातून काही अपयशी होऊन माघारी फिरले, तर काहींनी तग धरत आपल्या अर्धांगिनीला अमेरिकेत बोलवून घेतले. या "बेटर हाफ" म्हणजे अमेरिकेवर जाऊन धडकलेली दुसरी लाट. १९६०-७० च्या भरारी घेण्याच्या काळात अमेरिकेला मनुष्यबळाची बेसुमार आवश्यकता भासल्यामुळे "फॅमिली रियुनीफिकेशन" नावाखाली, तोपर्यंत अमेरिकेत स्थायिक झालेल्यांना आपल्या नातलगांना अमेरिकेत आणण्यासाठी मुभा देण्यात आली. या स्पॉन्सर स्कीममध्ये आलेले कुटुंब-नातलग, विशेष प्राविण्य नसताना देखील अमेरिकेत दाखल होऊ शकले ही तिसरी लाट म्हणता येईल. चौथी लाट मात्र स्थलांतरितांच्या या मराठी कुटुंबांमध्येच निर्माण झाली, ती म्हणजे त्यांची दुसरी पिढी. जी पिढी स्वतःला ना धड भारतापासून पूर्णपणे वेगळं करू शकली, ना धड अमेरिकेशी पूर्णपणे एकरूप होऊ शकली. या चारही लाटांनी कधी एकमेकांशी आदळत, कधी एकमेकांशी एकरूप होत, "अमेरिकेन ड्रीम"च्या किनाऱ्याला लागण्यासाठी चिवटपणे केलेल्या अविरत परिश्रमांचा मागोवा म्हणजे हे पुस्तक. ज्यामुळे आपल्या अमेरिकेत राहणाऱ्या मराठी कुटुंबीयांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात नक्कीच बदल होऊ शकतो. प्रयत्नांची पराकाष्ठा करून साधलेल्या प्रगतीमुळे अख्खा डोंगर विकत घेऊन राजवाड्यासारखे घर बांधणारं एखादं यशस्वी मराठी कुटुंब एकीकडे... तर जुजबी कौशल्यामुळे विशेष प्रगती न केलेले मुंबईतील चाळीतील घर भासावे अशा घरात राहणारे त्यामानाने अपयशी मराठी कुटुंब एकीकडे... जीवनमानाच्या या दोन टोकांवरील मधल्या अंतरात सापडणाऱ्या अनेक मराठी कुटुंबांच्या, त्यातील माणसांच्या संघर्षाची, प्रयत्नांची, सुख-दुःखाची, मान-अपमानाची, यश-अपयशाची, दुस्वास-जिव्हाळ्याची ही खरीखुरी कहाणी... प्रत्येकाने वाचलीच पाहिजे अशी... #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #कम्फर्ट_झोन_बाहेरचं_पुस्तक #पुस्तकांशी_सलगी #वाचावं_असं_पुस्तक #वाचन_शुभेच्छा 💐

MR
3
11
48
6.9K
|ग्रं|थो|पा|स|क| retweetledi
जमिर लांडगे
@letsreadindia @granthopasak @PABKTweets #mustreadbook #वाचायलालागतंय #पुस्तक #वाचन #नादपुस्तकांचा #वेडपुस्तकांचे #वाचतराहूयाशिकतराहूया #मराठी #अमीना #मोहम्मदउमर #उदयभिडे
जमिर लांडगे tweet media
QME
2
4
10
287
|ग्रं|थो|पा|स|क|
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) Twenty-two years after Ayatollah Khomeini's ascent to power in Iran, many aspects of his 1979 Islamic revolution remain obscure if not baffling. For instance, in November 1978 an offer was made to him in his Paris exile to return to Iran with international guarantees of freedom of speech and action. He refused and demanded the departure of the Shah. Americans put pressure on the monarch to leave the country. Khomeini arrived in Tehran in early February 1979, and he immediately demanded the return of the Shah and his trial before an Islamic tribunal! No one could give a valid explanation of this contradiction in Khomeini's conduct and demands. Many other mysteries in the unfolding of the revolution and the policies of the Islamic republic which replaced the monarchy have gone unexplained up to now. Scholars and experts in the West have offered the usual explanations for the Islamic revolution-corruption, deepening gaps between the rich and the poor, rapid industrialization, sky-rocketing inflation, westernizing policies that offended traditions, lack of democratic institutions, authoritarian rule, and on and on. But such characteristics which exist in other Muslim countries, especially in the Arab world, fail to clairify the particularities of the Iranian revolution. Indeed, as Ambassador Hoveyda points out, Iran is not an Arab country. It has kept alive its ancient mythological heritage which is not Islamic. It is an Indo-European nation with a recorded history of three thousand years! To understand the real causes of the 1979 revolution one must refer to the deep-rooted beliefs of Iranians and to their very rich mythology. One must also take into account the kind of Islam-shiism-Iranians have created and nurtured. In fact, Iran is a powerful example of how mythologies remain alive and can account for the conduct of a whole nation. Hoveyda shows the influence of myths in history-in-the-making. Indeed, he has found in the Iranian revolution many points that can be clarified only by the impact of old mythology and mindsets. He provides a very original explanation of the events that led to the fall of the Shah and the ascent of Khomeini, changing the political and diplomatic situation in the Middle East, the Persian Gulf, and the Caspian Sea region. As such it will be of great interest to scholars, students, researchers, and foreign policy makers involved with the Middle East and Islamic fundamentalism. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
|ग्रं|थो|पा|स|क| tweet media
English
0
2
3
176
|ग्रं|थो|पा|स|क| retweetledi
|ग्रं|थो|पा|स|क| retweetledi
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
श्रद्धा कुंभोजकर @ShraddhaKumbhoj यांच्या पूर्व प्रकाशित लेखांचे लोकवांग्मय गृह प्रकाशित ' भूत, वर्तमान, आणि स्मृती ' हे पुस्तक सुजाण आणि सजग वाचकांच्या संग्रही असलेच पाहिजे व सहज मिळेल अशा जागेवर आपापल्या वाचनालयात ठेवावे असे आहे. संदर्भ समृद्ध सुंदर भाषा व विषयाचा उत्तम आवाका असल्याने वाचनीय तर आहेच पण छोट्या छोट्या लेखांमुळे वाचायला सोपे व लक्षात ठेवायला सुलभ . जरूर विकत घेऊन वाचा .
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर tweet mediaSanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर tweet media
MR
0
6
22
1.8K
|ग्रं|थो|पा|स|क|
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) गेल्या दशकात अनेक देशांमध्ये गृहयुद्धं भडकली. गावांवर, शहरांवर बॉम्बहल्ले झाले, तर कुठे भीषण नैसर्गिक संकट आली... तिथल्या माणसांना जीव वाचवण्यासाठी अंगावरच्या कपड्यांनिशी देश सोडावा लागला... आणि मग सुरू झालं एक नष्टचर्य... तापलेल्या वाळवंटातून, हाडं गोठवणाऱ्या थंडीतून, दाट जंगलांतून, खवळलेल्या समुद्रातून माणसं जिवाच्या आकांताने निघाली. वाटेत किती मेली, परागंदा झाली याची गणतीच नव्हती. उरलेल्यांच्या वाट्याला रेफ्युजी कॅम्प्समधलं किडा-मुंगीचं जिणं आलं... आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिकेतले लाखो लोक असे देशोधडीला लागले... या गोष्टी आहेत त्यांच्या ससेहोलपटीच्या... आपल्याला आणि आपल्या मुलाबाळांना सुरक्षित जगता यावं या साध्या इच्छेपोटी माणसाने सोसलेल्या अनन्वित हालअपेष्टांच्या, टोकाच्या परिस्थितीतही तग धरून राहण्याच्या... आणि त्यांचं जगणं सुसह्य करण्यासाठी धडपडणाऱ्यांच्या सुद्धा... विश्वाला व्यापून असलेल्या रेफ्युजी प्रश्नाचा मानवी चेहरा समोर आणणारं पुस्तक. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
|ग्रं|थो|पा|स|क| tweet media
MR
3
10
40
1.1K
|ग्रं|थो|पा|स|क|
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) #जयसिंगरावपवार #आदरांजली 💐 सांगली जिल्ह्यातील तडसर गावातील एका शेतकऱ्याचा मुलगा कोल्हापुरात शिकायला येतो आणि शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून इतिहास संशोधक-प्राध्यापक-लेखक होतो. इतिहास क्षेत्राबरोबरच सामाजिक, राजकीय क्षेत्रातील दिग्गजांशी त्याचा परिचय होतो आणि यशस्वीपणे त्याचं जीवन घडत जातं. हा जीवनप्रवास आहे नामवंत ज्येष्ठ इतिहास-संशोधक डॉ. जयसिंगरावपवार यांचा. या आत्मचरित्रातून त्यांचं शालेय, महाविद्यालयीन, कौटुंबिक जीवन उलगडतं. त्यांचा संशोधनाचा, लेखनाचा, प्राध्यापकीचा प्रवास तपशिलाने उद्धृत केलेला दिसतो. त्या-त्या वेळच्या महत्त्वाच्या घटना (उदा. जेम्स लेन प्रकरण, दादाजी कोंडदेव प्रकरण इ.) काही ठिकाणी तपशिलाने तर काही ठिकाणी संक्षिप्तपणे नोंदवल्या आहेत. फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीने प्रेरित या व्यक्तिमत्त्वाच्या या आत्मचरित्रातून सामाजिक, राजकीय परिस्थतीही उलगडते. त्यामुळे हे आत्मचरित्र म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरावा. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
|ग्रं|थो|पा|स|क| tweet media
MR
0
30
230
6.4K
|ग्रं|थो|पा|स|क|
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) "... कारण आकर्षक वाटणारं जगातलं एक अद्भुत सत्य आम्हाला सापडलं होतं. ते हातातून निसटू नये म्हणून आम्ही एकमेकांना सावध करत होतो... मानवी इतिहासातला नवा साक्षात्कार आम्हाला झाला होता आणि त्याच्या प्रकाशात आम्ही न्हाऊन निघालो होतो... नव्या युगाची सुरुवात आता नक्की होणार, अशी आम्हाला मनातून खात्री वाटू लागली होती. ...ऐन तारुण्यातली बंडखोरीची ऊर्मी, त्याला पुरोगामी जीवनपद्धतीची बैठक... आणि जोडीला समविचारी तरुण मित्रांचा गट... अशी सर्व पार्श्वभूमी असल्याामुळे आम्ही त्या काळात स्वतःला इतरांपेक्षा खूप वेगळे समजत होतो..." #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
|ग्रं|थो|पा|स|क| tweet media
MR
0
6
22
1.1K
|ग्रं|थो|पा|स|क| retweetledi
प्रविण कलंत्री 📚
ब्रम्हकन्या लेखक - डेमियन लुईस/झोया फान अनुवाद - श्रध्दा भोबड द लिटिल डाॅटर या पुस्तकाचा हा अनुवाद. ही गोष्ट आहे ब्रम्हदेशातील कारेन जमातीच्या पोमू सित उर्फ झोया या मुलीची. वयाच्या दुसऱ्या वर्षी तिने मृत्युला हुलकावणी दिली होती. 👇 @LetsReadIndia @PABKTweets @zoyaphan
प्रविण कलंत्री 📚 tweet media
MR
1
6
19
752
|ग्रं|थो|पा|स|क| retweetledi
पांडुरंग नऱ्हेगावकर
सभोवताली जेव्हा ढोंगी जनांची गर्दी वाढते. आध्यात्माच्या नावाखाली विकृतीचा बाजार मांडला जातो. तेव्हा मनातल्या कोलाहलाची उत्तरे वाचनातून मिळतात. विमलाजींनी विषद केलेला आत्मशोधाचा, मानवतेच्या कल्याणाचा मार्ग नवी ऊर्जा देतो. #मराठी @LetsReadIndia @granthopasak
पांडुरंग नऱ्हेगावकर tweet media
MR
0
4
22
472
|ग्रं|थो|पा|स|क| retweetledi
AAKASH PHADATARE
AAKASH PHADATARE@Ravsaheb_18·
माझ्या लेखणीला माझ्या भावनांची इतकी जाणीव आहे..की मला प्रेम लिहायचे असले तरी इन्कलाब लिहिलं जातं.. आजपासून सुरुवात. #भगत_सिंह #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #पुस्तकांशी_सलगी @LetsReadIndia @Gramayanofficia @granthopasak @pustakaayan
AAKASH PHADATARE tweet media
MR
0
5
12
334
|ग्रं|थो|पा|स|क|
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) थोर रशियन तत्त्वचिंतक टॉलस्टॉय याची Resurrection ही महत्त्वाची आणि अखेरची कादंबरी. वि. वा. शिरवाडकरांनी हे कथाबीज घेऊन 'चंद्र जिथे उगवत नाही' या नाटकाची रचना केली. यातून एका सामान्य स्त्रीच्या आयुष्यातील प्रचंड चढउतारांचे, त्यातील नियतीचे खेळ आणि मानवी मूल्ये यांचा मनोवेधक आलेख वाचकासमोर मांडला आहे. ही केवळ नियतीचे हेलकावे सहन करणारी प्रेमकहाणी नाही, तर पापपुण्याच्या कल्पनांचा पुनर्विचार करायला लावणारी, म्हटले तर नीतिकथा आहे. याची नायिका रूपा ही शिरवाडकरांच्या श्रेष्ठ व्यक्तिरेखांपैकी एक आहे. यात नाट्यप्रयोगाविषयी नाट्यकर्मी विनय आपटे आणि मधु कांबीकर यांनी लिहिलेली टिपणे दिली आहेत. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
|ग्रं|थो|पा|स|क| tweet media
MR
0
5
21
857
|ग्रं|थो|पा|स|क|
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) ✍🏻 प्रा. सुरेश द्वादशीवार इंदिरा गांधी आणि जयप्रकाश नारायण या आणीबाणीतील दोन प्रमुख नेत्यांचे चरित्र, चारित्र्य, स्वभाव, जवळीक, दुरावा आणि महत्त्वाकांक्षांचे द्वंद्व या साऱ्यांची ही विस्तृत कहाणी आहे. सत्ता आणि महात्म्य यातील चढाओढीची ही अभूतपूर्व गाथा आहे. व्यक्तिगत संबंधातला संशयास्पद गोडवा आणि राजकारणातील टोकाचा दुरावा यांची ही गोष्ट आहे. आणीबाणीचे समर्थन कुणी करणार नाही. मात्र ती लावली जाण्यामागची कारणे महत्त्वाची आहेत. राजकीय भ्रष्टाचार आणि बांगला विजयामुळे इंदिरा गांधींना मिळालेली राष्ट्रीय व जागतिक मान्यता आणि त्यावर उफाळलेला त्यांच्या स्वपक्षीय नेत्यांचा रोष या गोष्टी येथे लक्षात घ्याव्या अशा आहेत. महागाई व बेरोजगारीचे संकट, बँकांच्या राष्ट्रीयीकरणाने संतापलेले देशभरचे भांडवलदार आणि म्हातारपणाकडे झुकलेल्या काँग्रेसमधील पुढाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षा या गोष्टीही यात महत्त्वाच्या ठराव्यात. 'आणीबाणी हा नाइलाज आहे हे स्वतः इंदिरा गांधींनीच म्हटले आणि 'सरकारविरोधी आंदोलन करण्यात आपली चूक झाली' ही जयप्रकाशांनी विनोबांजवळ दिलेली कबुली साऱ्या घटनांवर वेगळा प्रकाश टाकणारी आहे. त्याच वेळी संघाचे सरसंघचालक देवरस यांनी इंदिरा गांधींना दोन पत्रे लिहून मागितलेली माफी; एकनाथ रानडे, दत्तोपंत ठेंगडी आणि भाऊराव देवरस यांनी संजय गांधींजवळ लिहून दिलेले 'शरणपत्र' (डॉक्युमेंट ऑफ सरेंडर) हेही यातच पाहावे असे आहे. मी स्वतः आणीबाणीत १४ महिने तुरुंगात होतो आणि वाजपेयींसारखा विरोधी नेता दीर्घ काळपर्यंत पॅरोलवर कसा राहिला, ही गोष्ट तेव्हाही आम्हा राजबंद्यांना कळली होती! या साऱ्या प्रश्नांमागे असलेली या दोन नेत्यांच्या मानसिकतेची आरंभापासूनची घडण, त्यांनी अनुभवलेल्या राजकीय आपदा व त्यासोबतच मिळवलेली अमाप लोकप्रियताही श्रीमंत माने यांनी प्रदीर्घ स्वरूपात लिहिली आहे. विसाव्या शतकाचा संक्षिप्त राजकीय इतिहास ठरावा, असे हे लिखाण आहे. त्यातल्या प्रत्येक विधानाची प्रमाणे त्यासोबत आहेत. त्यामुळे ती विश्वसनीय ठरणारीही आहेत. तात्पर्य, आणीबाणीबाबत प्रकाशित व अप्रकाशित, जाहिरात केलेल्या व दडवलेल्या सगळ्या घटनांचा यातील तपशील वाचकांना अभ्यासनीय वाटावा व या घटनाक्रमांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देणारा आहे. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
|ग्रं|थो|पा|स|क| tweet media
MR
1
8
26
785
|ग्रं|थो|पा|स|क|
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊)  जातव्यवस्थेवर उपरोधात्मक लिहिणाऱ्या तंजावूरच्या मराठा घराण्यातील राजपुत्रापासून ते हिंदू मंदिरातील मस्लीम देवतेपर्यंत... एक गणिका, जी योद्धा-राणी बनली, तिच्यापासून ते ग्रामोफोनवर गाणाऱ्या गणिकेपर्यंत, स्तनविहीन स्त्रीपासून ते तीन स्तन असलेल्या देवीपर्यंत आणि पवित्र संस्कृतची भक्ती करणाऱ्या ब्रिटिश माणसापासून ते व्हिक्टोरिया महाराणीपर्यंत... या पुस्तकातले विविध विषयांवरील निबंध भारताच्या भूतकाळाकडे बघण्याची एक खिडकीच उघडतात. त्या खिडकीतून दिसणारे समृद्ध जग पाहून आपण थक्कच होतो. आणि विचार करू लागतो की, यातील कितीतरी गोष्टी आपण विसरूनच गेलो आहोत आणि कितीतरी गोष्टी आपण जाणूनबुजून पुसून टाकल्या आहेत. या निबंधांचे वाचन करताना आपण भारताच्या कहाणीत बुडून जातो. ज्या स्त्री-पुरुषांचे जीवन नाट्य आणि वेगवेगळ्या कृत्यांनी ओसंडून वाहते आहे, अशांच्या अनुभवांवर मनन-चिंतन करू लागतो. रेल्वे येथे कशी आली, भारतीय फुटबॉलचा इतिहास काय होता, ते यातून आपल्याला कळते. सर्वांनी ज्याचा तिरस्कार केला त्या लॉर्ड कर्झनने भारतातील ऐतिहासिक वास्तूंच्या जतनासाठी प्रयत्न केले होते, हे यातून आपल्याला कळते. जयपूरच्या महाराजांच्या फोटोग्राफीच्या कौशल्याची कहाणीही यातच समजते. समतोल विचारांच्या मनू पिल्लई यांच्यासारख्या इतिहासकार आणि कथनकाराच्या हातात आल्यावर या कहाण्यांतील स्त्री-पुरुष आपल्याला 'तेव्हा काय होतं' हे दाखवतात आणि 'काय असू शकलं असतं' हेही सांगतात. तसं करताकरता एकीकडे ते वर्तमान काळातील चिंता आणि दृष्टिकोन यांविषयीही भाष्य करतात, हे फारच विलक्षण वाटते. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे  #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी  #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
|ग्रं|थो|पा|स|क| tweet media
MR
2
13
66
3K
|ग्रं|थो|पा|स|क|
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) Since 1984, Nicholas Kristof has worked for The New York Times as a reporter, foreign correspondent, bureau chief, and now columnist, becoming one of the foremost reporters of his generation. Here, he recounts his event-filled path from a small-town farm in Oregon to every corner of the world. Reporting from Hong Kong, Beijing, and Tokyo, and traveling far afield to India, Africa, and Europe, Kristof witnessed and wrote about century-defining events: the Tiananmen Square protests and massacre, the Yemeni civil war, the Darfur genocide in Sudan, and the wave of addiction and despair that swept through his own town and a broad swath of working-class America. Fully aware that coverage of atrocities generates considerably fewer page views than the coverage of politics, he nevertheless continued to weaponize his pen against regimes and groups violating basic human rights, raising the cost of oppression and torture. Some of the risks he took while doing so make for hair-raising reading. Kristof introduces us to extraordinary people he has met, such as dissident he helped escape from China and a Catholic nun who browbeat a warlord into releasing schoolgirls he had kidnapped. These are the people, the heroes, who have allowed Kristof to remain optimistic. Side by side with the worst of humanity, Kristof shows us the best. This is a candid memoir of vulnerability and courage, humility and purpose, mistakes and learning—a singular tale of the trials, tribulations, and hope to be found in a life dedicated to the pursuit of truth. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
|ग्रं|थो|पा|स|क| tweet media
English
0
1
6
191