सुमित उदय पाटील retweetledi

भारतीय घटनेतील सहा (६) मूलभूत अधिकार:
१. समानतेचा अधिकार.
२. स्वातंत्र्याचा अधिकार (भाषण, हालचाल इ.).
३. शोषणाविरुद्ध हक्क.
४. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार.
५. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क.
६. घटनात्मक उपायांचा अधिकार.
घटनेतील कलम ३४३ जे केवळ हिंदी ह्या उत्तर भारतातील हिंदी लोकांच्या भाषेला केंद्राच्या अधिकृत भाषेचा दर्जा देते हे समानतेच्या अधिकाराच्या विरुद्ध नाही का? भारतातील सर्वच प्रमुख भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा देता येऊच शकतो. जर यूरोपीय संघ (European Union) त्यांच्या २२ भाषात काम करू शकते तर भारतीय संघराज्य का करू शकत नाही? हिंदी भाषेला पूर्वीपासून विनाकारण महत्व दिल्यामुळे हिंदी भाषिकांमध्ये फुकटची श्रेष्ठत्वाची भावना निर्माण झाली आहे. मातृभाषेचे संस्कार पुसट झाल्याने बौद्धिक क्षमता सुद्धा कमी झाली आहे, ज्यामुळे तिथे ना विचारवंत निर्माण होत आहेत ना समाजसुधारक, नुसतं राजकारण, धर्माधपणा, जातीयता, बकालपणा शुण्य नागरी संवेदना ह्या सर्वांचं मूळ म्हणजे फुकटचं श्रेष्ठत्व आणि भारताचे मालक आपणच असल्याची भावना, ज्यामुळे इतर राज्यात अरेरावी करतात आणि मार खातात. ह्यावर उपाय म्हणजे ह्या भाषेला कलम ३४३ नुसार दिले गेलेले अधिकार काढून सर्वच भाषांना अधिकृत भाषा म्हणून समाविष्ट करणे हाच आहे.
MR























