नगरचा राजा retweetledi

नागपूरमधील सावित्रीबाई फुले वसतिगृहात घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे.
एका शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनीने प्रचंड उष्णतेत जगण्यासाठी
कूलरसारखी मूलभूत सुविधा मागितली… एवढीच तिची चूक होती का?
विद्यार्थिनीने आपली समस्या थेट मुख्यमंत्री स्तरापर्यंत पोहोचवली आणि
त्यानंतर तिलाच वसतिगृहातून बाहेर काढण्याची नोटीस देण्यात आली,
ही बाब केवळ अन्यायकारक नाही तर लोकशाही व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह
निर्माण करणारी आहे.
लोकशाहीमध्ये नागरिकांनी आपल्या समस्या मांडायच्या नाहीत का?
विद्यार्थ्यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवायचा नाही का?
की फक्त शांत राहून त्रास सहन करायचा?
शिक्षणासाठी घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थिनींना सुरक्षित,
सन्मानजनक आणि मूलभूत सुविधा देणे ही शासनाची जबाबदारी आहे.
कूलरची मागणी ही कोणतीही चैनीची गोष्ट नसून उष्णतेच्या पार्श्वभूमीवर
एक आवश्यक गरज आहे.
आज प्रश्न फक्त एका विद्यार्थिनीचा नाही…
प्रश्न आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, विद्यार्थ्यांच्या हक्कांचा आणि सत्तेला
प्रश्न विचारण्याच्या अधिकाराचा.
जर समस्या मांडणाऱ्यांनाच शिक्षा दिली जाणार असेल, तर उद्या
कुणीही अन्यायाविरोधात बोलण्याचं धाडस करणार नाही. ही प्रवृत्ती
धोकादायक आहे.
विद्यार्थिनीला न्याय मिळालाच पाहिजे आणि या प्रकरणाची निष्पक्ष
चौकशी झाली पाहिजे. कारण लोकशाहीत प्रश्न विचारणे हा गुन्हा नसतो.
MR

























