Mohan Joshi

3.7K posts

Mohan Joshi banner
Mohan Joshi

Mohan Joshi

@MohanJoshiINC

Vice President- Maharashtra Congress | UPA Candidate, Pune Lok Sabha 2019 | Ex - MLC, Maharashtra | Ex-President Pune Congress | Ex- President IYC, Maharashtra

Pune, India เข้าร่วม Ekim 2018
374 กำลังติดตาม2.4K ผู้ติดตาม
Mohan Joshi รีทวีตแล้ว
Harshwardhan Sapkal
Harshwardhan Sapkal@INCHarshsapkal·
कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते श्री. हनुमंत पवार यांना दैनिक पुढारी कार्यालय, मित्र मंडळ चौक पुणे येथे भाजप गुंड तुषार दामगुडे याने बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केली आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. देवेंद्र फडणवीस यांच्या आशिर्वादाने या मर्द मावळ्यांच्या महाराष्ट्रात गुंड मवाल्यांचं राज्य फोफावू पाहतंय. या महाराष्ट्र नासवणाऱ्या औलादींना अभय देण्याचे काम गृहमंत्री फडणवीसांनी करू नये, हा महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही, या गुंड प्रवृत्तीच्या तुषार दामगुडे ला लगेच अटक करून तुरूंगात टाकण्यात यावे, त्याची खरी जागा तीच आहे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
MR
55
130
457
20.7K
Mohan Joshi
Mohan Joshi@MohanJoshiINC·
दादा महाराष्ट्र आज स्तब्ध झाला.... शहराच्या सर्वांगीण विकासात ज्यांचे मोलाचे योगदान होते, प्रशासनावर घट्ट पकड ठेवून सामान्य माणसासाठी नेहमी धावून येणारे, स्पष्टवक्ते, कणखर पण मनाने अतिशय भावनाप्रधान असे आपले लाडके दादा आज आपल्यातून निघून गेले. लोकांची कामं म्हणजेच आपली जबाबदारी मानणारे, जनतेसाठी रात्रंदिवस झटणारे, खऱ्या अर्थाने आधारवड असलेले दादा आता आपल्यात नाहीत… ही वेदना कधीही भरून निघणार नाही. आज संपूर्ण महाराष्ट्र निशब्द आहे… डोळ्यात अश्रू आणि मनात फक्त आठवणी… भावपूर्ण श्रद्धांजली दादा. 🙏 आपली उणीव कायम जाणवत राहील…
Mohan Joshi tweet media
MR
1
0
7
147
Mohan Joshi รีทวีตแล้ว
Policenama
Policenama@Policenama1·
Harshwardhan Sapkal | 'वोट चोरी हा लोकशाही संपुष्टात आणण्याचा भाजपाचा कुटील डाव' - हर्षवर्धन सपकाळ @MohanJoshiINC @Policenama1 policenama.com/harshwardhan-s…
MR
0
1
0
109
Mohan Joshi
Mohan Joshi@MohanJoshiINC·
धार्मिक ध्रुवीकरण आणि मतचोरी करणे हा भाजपाचा मुख्य फंडा - माजी मंत्री बाळासाहेब थोरात लोकशाही वाचवण्यासाठी पुणेकरांनी पुढे यावे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आवाहन पुणे : सत्तेत राहण्यासाठी भाजपकडून कोणत्याही थराचे राजकारण केले जात असून ईव्हीएम प्रक्रियेबाबत गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत. धार्मिक ध्रुवीकरण आणि मतचोरी करणे हा भाजपाचा मुख्य फंडा बनला आहे. लोकशाहीचा मूलभूत ढाचा वाचवण्यासाठी सर्वांनीच पुढे येणे आवश्यक असल्याचे मत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात पुणेकरांचे मोठे योगदान आहे. आज लोकशाही वाचवण्यासाठी पुणेकरांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित ‘सेवा, कर्तव्य, त्याग’ सप्ताह कार्यक्रमात ‘लोकशाहीची हत्या व वोटचोरी’ या विदारक सत्यावर आधारित विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन थोरात यांच्या हस्ते झाले. या वेळी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख संजय मोरे, प्रदेश काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी, माजी नगरसेवक वीरेंद्र किराड, अविनाश बागवे, महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती शिंदे, लता राजगुरू, कैलास गायकवाड, अनिल सोडकर, प्रथमेश आबनावे आणि चेतन अग्रवाल उपस्थित होते. आपल्या भाषणात थोरात म्हणाले की, २००४ ते २०१४ या काळात काँग्रेस सरकारने अन्न सुरक्षा कायदा, शैक्षणिक योजना, भू-अधिग्रहण कायद्यात सुधारणा, तसेच जागतिक स्तरावर गाजलेल्या पोलिओ निर्मूलन मोहिमेसह अनेक लोककल्याणकारी उपक्रम राबवले. मात्र २०१४ नंतर भाजपने तांत्रिक साधने, अफवा आणि जातीय ध्रुवीकरणाचा वापर करून सत्ता काबीज केली आणि देशाची दिशा भरकटवली. महाराष्ट्र हा संतांची परंपरा जपणारा प्रदेश असताना, आज धर्माचे उघडपणे राजकारण केले जात आहे. सोनम वंगचुक, हरियाण्यातील शेतकरी आंदोलन, महिला ऑलिम्पिक विजेत्यांचे आंदोलन, मुख्य न्यायाधीशांवर फेकलेला बूट—या घटनांनंतरही समाज उदासीन राहणे म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले की, मोदी सरकार मतचोरीच्या ठरावीक पॅटर्नवर सत्तेत आले असून ही जनतेची व लोकशाहीची मोठी फसवणूक आहे. निवडणुका झाल्यानंतर निकाल पुढे ढकलणे आणि नंतर ईव्हीएमच्या जोरावर सत्ता मिळवणे ही पद्धत लोकशाहीस घातक आहे. मोदी सरकारला रोखण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची वेळ आली असून सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले की, विविध राष्ट्रीय मुद्द्यांवर राहुल गांधी यांनी आवाज उठविल्यामुळे जनजागृतीला गती मिळाली आहे. आपले मत नक्की कुठे आणि कसे जाते याचा शोध घेण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून करण्यात आला असून आर्थिक भ्रष्टाचारासोबत मतचोरी ही भाजपची मोठी चाल असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. माजी महापौर प्रशांत जगताप यांनी म्हटले की, लोकशाहीची हत्या आणि मतचोरीचे विदारक वास्तव दाखवणारे हे प्रदर्शन लोकशाही रक्षणासाठी महत्त्वाचा उपक्रम आहे. केंद्र सरकारविरुद्ध लोकांमध्ये वाढता असंतोष दिसत असून मतचोरीची प्रक्रिया लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. मतदार याद्यांतील घोळही तातडीने दूर करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रम संयोजक मोहन जोशी म्हणाले की, पुण्याच्या सर्वांगीण विकासाचे श्रेय काँग्रेसचेच आहे. आजवर २५ पेक्षा जास्त प्रकल्प राबवून शहराचा विकास साधला. ‘सेवा, कर्तव्य, त्याग’ सप्ताहातून जनजागृती, सामाजिक बांधिलकी आणि लोकशाहीचे महत्त्व अधोरेखित करणे हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. अविनाश बागवे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रथमेश आबनावे यांनी केले, तर सुनील मलके यांनी आभार मानले. @bb_thorat @satejp @INCIndia @INCMaharashtra
Mohan Joshi tweet mediaMohan Joshi tweet mediaMohan Joshi tweet mediaMohan Joshi tweet media
MR
1
0
2
109
Mohan Joshi รีทวีตแล้ว
Policenama
Policenama@Policenama1·
Mohan Joshi Congress Pune | केंद्र सरकारच्या तुघलकी धोरणामुळेच विमान वाहतूक कोलमडली; लाखो प्रवाशांचे नुकसान - माजी आमदार मोहन जोशी @MohanJoshiINC @Policenama1 policenama.com/mohan-joshi-co…
MR
0
1
0
117
Mohan Joshi
Mohan Joshi@MohanJoshiINC·
सेवा • कर्तव्य • त्याग सप्ताह काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 21 व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या शुभहस्ते 🗓️ मंगळवार, २ डिसेंबर २०२५ ⏰ सायं. ५.०० वाजता 📍 एस. एम. जोशी हॉल, नवी पेठ, पुणे
Mohan Joshi tweet media
MR
0
0
2
82
Mohan Joshi รีทวีตแล้ว
The karbhari
The karbhari@TheKarbhariNews·
Ballot Paper Election | भाजपला बॅलेट पेपर का नकोत ? | राज्यातील महापालिका निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या | माजी आमदार मोहन जोशी thekarbhari.com/ballot-paper-e… @MohanJoshiINC
MR
0
1
0
85
Mohan Joshi
Mohan Joshi@MohanJoshiINC·
तेलंगणाचे मुख्यमंत्री मा. रेवंत रेड्डी जींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉 आपले नेतृत्व, दृष्टी आणि जनतेशी असलेली नाळ सदैव प्रेरणादायी राहो. दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! Warm birthday wishes to Hon. Chief Minister of Telangana, Shri Revanth Reddy ji! 🎉 Your leadership and people-centric vision continue to inspire. Wishing you good health, happiness, and long life ahead. @revanth_anumula
Mohan Joshi tweet media
MR
0
1
1
85
Mohan Joshi
Mohan Joshi@MohanJoshiINC·
विरोधी पक्षनेते श्री. राहुल गांधी यांनी हरियाणामध्ये झालेल्या भयावह ‘मत चोरी’चा पुराव्यांसह खुलासा केला आहे. ‘मत चोरी’ ही लोकशाहीविरोधी कटकारस्थान असून संविधानावर थेट हल्ला आहे. ही जनता आणि त्यांच्या मतांचा अपमान करणारी, सत्ता चोरण्याची भाजपची चाल आहे. भाजप आणि निवडणूक आयोग एकत्र येऊन ‘मत चोरी’ची योजना राबवत आहेत, याचे पुरावे सातत्याने देशासमोर येत आहेत — आता जनता याचा हिशेब मागेल! 📍दिल्ली #votechori @RahulGandhi @ECISVEEP
Mohan Joshi tweet mediaMohan Joshi tweet mediaMohan Joshi tweet mediaMohan Joshi tweet media
MR
0
0
0
48
Mohan Joshi
Mohan Joshi@MohanJoshiINC·
मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी झिनत शबरीन यांनी शपथ घेतल्याने एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. आता नेतृत्व खर्‍या अर्थाने अर्ध्या आबादीच्या हातात आले आहे. हा बदल केवळ राहुल गांधी यांच्या नेतृत्वामुळेच शक्य झाला आहे — ज्यांनी राजकारणाला प्रतिनिधित्वाचा खरा अर्थ दिला आहे. या प्रसंगी भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. उदय भानू चिब तसेच इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. मीही या वेळी उपस्थित राहून नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या मार्गदर्शन केले. युवक काँग्रेसची ही नवी टीम म्हणजे नवे संकल्प, नवी ऊर्जा आणि नव्या दिशेचं प्रतीक आहे. #MumbaiYouthCongress #IndianYouthCongress #ZeenatShabreen #UdayBhanuChib #YouthPower #Congress @ShabrinZeenat
Mohan Joshi tweet mediaMohan Joshi tweet mediaMohan Joshi tweet mediaMohan Joshi tweet media
MR
0
0
1
45
Mohan Joshi รีทวีตแล้ว
Policenama
Policenama@Policenama1·
Mohan Joshi Pune Congress | माजी आमदार मोहन जोशी यांना राज्यातील महापालिका निवडणुकांची विशेष जबाबदारी; प्रदेश काँग्रेस अध्यक्षांची घोषणा @MohanJoshiINC @Policenama1 policenama.com/mohan-joshi-pu…
MR
0
1
0
85
Mohan Joshi รีทวีตแล้ว
Policenama
Policenama@Policenama1·
Mohan Joshi Pune Congress | महात्मा गांधींच्या विचारातूनच सदभावना निर्माण होईल - माजी आमदार मोहन जोशी @MohanJoshiINC @Policenama1 policenama.com/mohan-joshi-pu…
MR
0
2
1
55
Mohan Joshi
Mohan Joshi@MohanJoshiINC·
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘आजचे शहरी राजकारण’ या विषयावर नागपूर येथे (दिनांक ४-५ ऑक्टोबर २०२५, नाग लोक, कामठी रोड) विचारमंथन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन दिनांक ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मा. प्रांताध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते झाले. उद्घाटन सत्रात श्री. प्रफुल्ल गुडदे, सचिव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी यांनी स्वागत केले, तर श्री. आशुतोष शिर्के, प्रमुख, प्रशिक्षण विभाग यांनी कार्यशाळेची माहिती दिली आणि श्री. संग्राम खोपडे यांनी सत्राचे संचालन केले. याच उद्घाटन सत्रात मला प्रास्ताविक करण्याची व मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. शहरी भागातील लोकशाही, वाढती आव्हाने, नागरिकांच्या मूलभूत सुविधा, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न आणि काँग्रेस पक्षाची लोकाभिमुख दिशा यावर मी माझे विचार मांडले. कार्यशाळेत उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमुळे हे सत्र अधिक समृद्ध झाले. ही कार्यशाळा काँग्रेस पक्षाच्या शहरी जनतेसाठीच्या बांधिलकीची दिशा स्पष्ट करणारी ठरली, असा मला विश्वास आहे. ✊ काँग्रेस पक्षच नागरिकांच्या विश्वासाचा खरा आधार आहे. #MaharashtraCongress #UrbanPolitics #Nagpur #VicharManthan #CongressForPeople #MPCC #MohandasJoshi
Mohan Joshi tweet media
MR
0
0
0
32
Mohan Joshi
Mohan Joshi@MohanJoshiINC·
'जाचक जीएसटीतून मुक्तता करण्याचे श्रेय राहुल गांधींनाच' - माजी आमदार मोहन जोशी भर पावसात असंख्य कार्यकर्त्यांचा आभार कार्यक्रमात सहभाग पुणे : जातीय जनगणनेची मागणी असो, नोटाबंदीचा मुद्दा असो, एच-१बी व्हिसाचा प्रश्न असो किंवा आता जीएसटीचा जाच — प्रत्येक वेळी राहुल गांधीच आधी आवाज उठवतात आणि सरकारला जागे करतात. 📌 पुण्यातून राहुल गांधींनी सातत्याने जीएसटीचा मुद्दा मांडला. २०१७ पासून २०२५ पर्यंत सर्वसामान्य नागरिकांकडून झालेली कोट्यवधी रुपयांची लूट त्यांनी उघड केली. अखेर त्यांच्या सातत्यपूर्ण संघर्षामुळे जनतेला दिलासा मिळाला. या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र साहित्य परिषद चौक, टिळक रोड, पुणे येथे विशेष आभार प्रदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष व माजी आमदार मोहनदादा जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले की – “जीएसटीत बदल घडवून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे श्रेय राहुल गांधींनाच द्यावे लागेल. मोदी सरकारने जनतेवर लादलेल्या गब्बर सिंग टॅक्सविरुद्ध राहुल गांधींनी सातत्याने आवाज उठवला. हजारो कोटी रुपयांच्या लुटीबद्दल प्रश्न विचारून जनतेचा आवाज बनले. आज जीएसटीतून मिळालेली मुक्तता ही त्यांच्या संघर्षाचीच देण आहे.” ✊ फलकावरील घोषणा कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी हातात फलक घेतले होते. त्यावर – “झुकता है नरेंद्र मोदी, जब बोलता है राहुल गांधी”, “गब्बरसिंग टॅक्स हटवल्याबद्दल राहुल गांधींना आभार”, “जीएसटीतून मुक्तता – श्रेय राहुल गांधींना आणि काँग्रेसलाच”, “जातीनिहाय जनगणनेला मंजुरी – राहुल गांधींमुळे”, “जीएसटीतून मुक्तता, आता पाळी मत चोरीची” अशा घोषणा लिहिलेल्या होत्या. 🛑 मोदी सरकारवर टीका मोदी सरकारने जीएसटी आणताना पाच स्लॅब लादले होते. त्यावेळीच राहुल गांधींनी याला “गब्बरसिंग टॅक्स” असे नाव देत तीव्र टीका केली होती. काँग्रेसने सुचविलेल्या जीएसटीमध्ये फक्त दोनच स्लॅब होते आणि जीवनावश्यक वस्तू त्यातून वगळलेल्या होत्या. मात्र मोदी सरकारने मनमानी करून जाचक कर प्रणाली लागू केली आणि जनतेची ८ वर्षे लूट केली, असा आरोप मोहन जोशी यांनी यावेळी केला. 👥 कार्यक्रमात उपस्थित मान्यवर व कार्यकर्ते भर पावसातही असंख्य कार्यकर्त्यांनी ठामपणे सहभाग नोंदवला. त्यामध्ये – संजय बालगुडे, सुनील मलके, प्रशांत सुरसे, सौरभ अमराळे, प्रथमेश आबनावे, यशराज पारखी, स्वाती शिंदे, चेतन अगरवाल, आयुब पठाण, सुरेश कांबळे, प्रवीण करपे, शाबीर खान, भोला वांजळे, संकेत गलांडे, हसीना सय्यद, इंद्रजीत केंद्रे, गोरख पळसकर, अश्पाकभाई शेख, अनिकेत सोनावणे, अक्षय कांबळे, विकास सुपनार, मंगेश थोरवे, महेश विचारे, राजेश अल्हाट, महेंद्र चव्हाण, अविनाश राठोड, गणेश उबाळे, बाबा शिरसागर, महेश हराळे, विशाल मलके, अनिल आहेर आदी कार्यकर्त्यांचा सहभाग होता. @INCIndia @INCMaharashtra @RahulGandhi @kharge @kcvenugopalmp @gurdeepsappal @INCHarshsapkal
Mohan Joshi tweet mediaMohan Joshi tweet mediaMohan Joshi tweet media
MR
0
1
3
56
Mohan Joshi
Mohan Joshi@MohanJoshiINC·
Rahul Gandhi Gets Credit for Relief from “Draconian GST”: Congress Leader Mohan Joshi Pune: Whether it was the demand for a caste census, opposition to demonetisation, the H-1B visa issue, or now the rollback of draconian GST rules — Congress leader Rahul Gandhi has always been the first to raise his voice and force the government to act, said senior Congress leader and former MLA Mohan Joshi on Monday. Joshi was speaking at a special thanksgiving programme organised at Maharashtra Sahitya Parishad Chowk, Tilak Road, Pune, where scores of Congress workers stood firm in pouring rain to express gratitude to Rahul Gandhi. > “The credit for bringing relief to common citizens from GST lies entirely with Rahul Gandhi. He consistently exposed the ‘Gabbar Singh Tax’ imposed by the Modi government and became the voice of the people looted of thousands of crores over the last eight years. The recent changes are the direct result of his relentless struggle,” Joshi said. Placards and Slogans Congress workers carried placards that read: “Zhukta hai Narendra Modi, jab bolta hai Rahul Gandhi” “Thank you Rahul Gandhi for scrapping Gabbar Singh Tax” “Relief from GST – Credit goes to Rahul Gandhi and Congress” “Caste Census approved because of Rahul Gandhi” “GST rollback done, now stop electoral theft” Attack on Modi Government Joshi lashed out at the Modi government, recalling that when GST was introduced, five complex tax slabs were imposed, despite the Congress proposal for just two simple slabs and exemption for essential commodities. > “Instead of easing the tax burden, the BJP government imposed a draconian GST and looted citizens for eight years,” he alleged Leaders and Workers Present The thanksgiving programme saw heavy participation despite incessant rain. Among those present were: Sanjay Balgude, Sunil Malke, Prashant Surshe, Saurabh Amarale, Prathamesh Abnave, Yashraj Parkhi, Swati Shinde, Chetan Agarwal, Ayub Pathan, Suresh Kamble, Praveen Karpe, Shabbir Khan, Bhola Wanjale, Sanket Galande, Hasina Sayyed, Indrajit Kendre, Gorakh Palskar, Ashpakbhai Shaikh, Aniket Sonawane, Akshay Kamble, Vikas Supnar, Mangesh Thorwe, Mahesh Vichare, Rajesh Alhat, Mahendra Chavan, Avinash Rathod, Ganesh Ubale, Baba Shirsagar, Mahesh Harale, Vishal Malke, Anil Aher and many others. @INCIndia @INCMaharashtra @RahulGandhi
Mohan Joshi tweet mediaMohan Joshi tweet media
English
0
1
1
135