pragmatic Indian أُعيد تغريده

#MPSC मधील मंत्रालयातील हस्तक्षेप थांबला पाहिजे याबाबत दुमत असण्याचे कारण नाही पण त्याचबरोबर आयोगाने देखील आपल्या कामात काळानुसार सुधारणा करणे गरजेचे आहे.
लेखी परीक्षांचा निकाल 8-8 महिने लागत नसतील तर त्यावर उमेदवारांच्या शंका वाढत आहेत (FSO आणि स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2023)
आयोगाच्या मुलाखत धोरणात सातत्य दिसून येत नाही. काही राज्यसेवा करणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती 5 मिनिटात संपल्या असे त्यांचे म्हणणे आहे. पुढील वर्षापासून राज्यसेवा मुलाखती 275 गुणांच्या आहेत त्यातून उमेदवारांचा संभ्रम वाढून यात असे प्रकार उमेदवारांच्या मनात नाहक शंका निर्माण करत असतात.
या सर्वावर एकमेव उपाय म्हणजे जसे केंद्र सरकार सातत्याने UPSC मधील सुधारणांसाठी DoPT च्या माध्यमातुन समित्या स्थापन करते त्याच धर्तीवर राज्यात सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून MPSC मधील सुधारणा, बदल आणि उमेदवारस्नेही धोरणासाठी समिती गठीत करणे काळाची गरज आहे. त्या समितीत मुख्य सचिव, GAD सचिव, विधी व न्याय विभागाचे सचिव यांचा समावेश करून घटनात्मक आयोग अधिक सक्षम बनवता येईल.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
MR
























