Angehefteter Tweet

गुंतणे आणि गुंफणे फरक फक्त एका शब्दाचा पण त्या एका शब्दाने अर्थ किती वेगळा होतो. मनातला गुंता सुटता सुटत नाही आणि जर नीट सुटला नाही तर तो सोडवताना तोडव्या लागणाऱ्या प्रत्येक धाग्या सोबत मनाला होणाऱ्या यातना कुठे तरी आत घर करून जातात आणि मनावर जन्मभरासाठी व्रण देऊन जातात. तेच गुंफताना आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक आठवणी मन रुपी दोऱ्यात अलगदपणे गुंफल्यावर जी माळ तयार होते ती शेवटी ईश्वर चरणी वाहताना एक वेगळाच आनंद मिळतो.
हे सगळं माहिती असूनही आपण मनुष्य गुंफण्या पेक्षा गुतण्यात आपलं आयुष्य घालवतो आणि मनाला त्रास करून घेतो.
#मन_वढाय_वढाय
#सहज
MR



















